Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी येथे झालेल्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या चार भावंडांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याची मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात रविवारी सायंकाळी सात वाजता ते मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्षात भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली.पाण्यात पडलेल्या उच्च दाबाच्या वीज तारेचा प्रवाह छोट्याशा तळ्यातील पाण्यात उतरल्याने संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील अनिकेत अरुण बर्डे (वय १२ वर्ष), ओंकार अरुण बर्डे (वय १० वर्ष), दर्शन अजित बर्डे (वय ८ वर्ष) व विराज अजित बर्डे (वय ६ वर्ष) या चार भावंडांचा शनिवारी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता.वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे…

Read More

महाराष्ट्राची राज्यसत्ता काबीज करण्याचं ईडीतंत्र आत्मसात झाल्यानंतर राज्यात होणार्‍या महानगर पालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थाही आपल्या ताब्यात आल्या पाहिजेत यासाठी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने आता पुन्हा रडीचा डाव सुरू केला आहे. सत्तेचा ताबा मिळवण्यासाठी केंद्रिय गृह खात्याच्या मदतीने राज्यात ईडी, सीबीआयचा उच्छाद सुरू असताना आता गल्लीतल्या सत्तेसाठी पोलिसांना कामाला लावण्याचं पाताळयंत्री कृत्य सुरू आहे. येत्या महिन्या-दोन महिन्यात राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या सार्‍या महानगरपालिका आपल्याच ताब्यात आल्या पाहिजेत, या आसुयेपोटी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचा फुटीर गट कामाला लागलं आहे. ज्यांची ताकद आहे, राजकीय शक्ती आहे, अशा कार्यकर्त्यांना वेचून त्यांच्या विरोधात पोलीस कारवाईचा सपाटा हेच सांगतं.यंत्रणांचा वापर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना फुटीनंतर राज्यात उद्भवलेला खरी शिवसेना कोणाची हा पेच कायम असतांना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठविण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे या दोघांनाही शिवसेना नांव वापरता येणार नसल्याचा निर्वाळा आयोगाने दिला आहे. पोटनिवडणूकीपुरता हा निर्णय असल्याचे सांगितले जाते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचीच खरी शिवसेना असल्याचा व धनुष्यबाण चिन्हदेखील त्यांच्याच गटाचे असल्याचा दावा केला होता. यामुळे राज्यात शिवसेनेत दोन गट पडले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या दोन गटात शिवसेना विभागली गेल्यामुळे शिवसेनेत अभूतपूर्व पेच निर्माण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क उच्च दाबाची वीजवाहक तार तुटून पडल्यामुळे या तारेचा धक्का लागून चार बालकांचा दुर्दैवी अंत झाला. सख्खी भावंडे यात मृत्युमुखी पडल्याने तालुक्याच्या पठार भागात शोककळा पसरली.संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या नांदूर खंदरमाळवाडी गावात ही घटना शनिवारी दुपारच्या वेळी घडली. ओमकार अरुण बर्डे (वय १० वर्ष’ अनिकेत अरुण बर्डे (वय १२ वर्षे) आणि विराज अजित बर्डे (वय ६ वर्ष), दर्शन अजित बर्डे (वय ८ वर्ष) अशी या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती मिळाली.महसूल प्रशासनाने या घटनेची दखल घेत तातडीने संबंधितांना सूचना केल्या घडलेला प्रकार महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना कळविण्यात आला…

Read More

मृतांचा आकडा १२ वर तर जखमींची संख्या ३८ बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचे निष्पन्न चोवीस तासाच्या आत बस पेटण्याची दुसरी घटना महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शनिवार नाशिककरांसाठी अपघातवार ठरला. बस पेटण्याच्या दोन घटना नाशिक शहर व जिल्ह्यात घडल्या. एका घटनेत मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली तर दुसऱ्या घटना मात्र सुदैवाने सर्व प्रवाशांचे प्राण वाचले आहे. नाशिकमध्ये नांदूरफाटा येथील घटनेत मृतांच्या संख्येत वाढ होवून ही संख्या १२ वर गेली तर ३८ प्रवासी जखमी असल्याचे समोर आले आहे. मृतकांच्या वारसांना पंतप्रधान निधीतून प्रत्येकी दोन लाख तर राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क : कमी पटसंख्येच्या मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील 17000 शाळा बंद होण्याची चिन्हे आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून या विरोधात छात्र भारतीने राज्यस्तरीय आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शनिवारी संगमनेरमध्ये शंभर एसटी बसेसला सरकारच्या निषेधाचे पोस्टर चिटकविण्यात आले आहे.दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने सरकारी शाळांना प्राधान्य देत या शाळांचा लौकिक जगभरात पोहोचविला आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने सरकारी शाळांना टाळे लावण्याचे धोरण अवलंबिले आहे. एकाच देशातील शिक्षणाचे हे चित्र विदारक आहे. कमी पट संख्येच्या राज्यभरातील जवळपास 17000 मराठी शाळांवर सरकारच्या या निर्णयामुळे गंडांतर येणार आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क : नासिकच्या औरंगाबाद रस्त्यावरील नांदूर नाका परिसरात मिरची चौकामध्ये शनिवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास खासगी लक्झरी बसला अपघातानंतर भीषण आग लागली. या आगीमध्ये दहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळी प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बस यवतमाळहुन मुंबईकडे चालली होती. मात्र शनिवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही बस नांदूर नाक्याजवळ मिरची चौकात आल्यानंतर चौफुलीवर एका टँकरला धडकली आणि अपघातानंतर लगेचच चिंतामणी ट्रॅव्हल्स या बसने पेट घेतला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे तीन-चार वाहने तसेच चार-पाच रुग्णवाहिका झाल्या होत्या. पेटलेली अपघातग्रस्त बस विजविण्याचा अर्धा तासाहून अधिक वेळ प्रयत्न सुरू होता. आग एवढी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर तालुक्यातील दोघा व अकोले तालुक्यातील एका सराईत गुन्हेगारांस प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी एक वर्षाकरिता हद्दपार केले असल्याची माहिती संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिली आहे. रमेश संतू पावसे (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर), सागर उर्फ शक्तिमान तुकाराम कोकण (रा. धांदरफळ खुर्द, संगमनेर) आणि ऋतिक किसन बांडे (रा. खडकी ता. अकोले) अशी या हद्दपार केलेल्या तिघा गुन्हेगारांची नावे आहेत. अकोले आणि संगमनेर तालुका पोलिसांकडून पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तसेच पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याकडे या आरोपी विरोधातील हद्दपारीचे प्रस्ताव पाठविले होते. मंगरूळ यांनी तीनही गुन्हेगारांना एक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क निळवंडे धरण आणि कालव्यासाठी अविश्रांत श्रम केल्यानेच ही कामे आज मार्गी लागली आहेत. ती आता कोणीही थांबवू शकत नाही. यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचा आम्ही सातत्याने उल्लेख करतो, मात्र या कामात तुमचे योगदान काय, समन्यायी पाणी वाटपावर होतात आम्ही संघर्ष करत असताना तुम्ही गप्प का होतात, असा थेट सवाल राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूलमंत्र्यांना नाव न घेता केला आहे. तालुक्यातील तळेगाव दिघे येथे विविध विकास कामांची उद्घाटने माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. संगमनेरच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग घडवून आणणाऱ्या आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार टीकेचे धनी ठरले. शिवसेनेतून 40 आमदारांना घेऊन बाहेर पडलेले आणि नव्याने शिंदे-फडणवीस सरकार बनविलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबतचे युती आपल्याला कधीच मान्य नव्हती, शिवसेनेने त्यांचे हिंदुत्व सोडले अशी टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ही युती कधीच मान्य केली नसती. असे देखील शिवसेनेतून बाहेर पडलेले अनेक नेते म्हणत आहेत. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. ज्या शरद पवारांवर आज टीका केली जाते त्या पवारांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षविरहीत राजकीय संबंध कसे होते हे…

Read More