Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि तीन सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या अपात्रतेच्या निर्णयाला नाशिकच्या अप्पर विभागीय आयुक्तांनी मंगळवारी (दि. २ जून) तात्पुरती स्थगिती दिली आहे. या स्थगिती आदेशानंतर सरपंच निर्मला राऊत यांच्यासह इतर सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या नियमित कामकाजाला पुन्हा सुरुवात केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ९ जुलै रोजी होणार आहे. घुलेवाडी ग्रामपंचायतीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. येथील लोकनियुक्त सरपंच निर्मला राऊत, तसेच सदस्य दत्तात्रय राऊत, सोनाली गिरी आणि अनिल राऊत यांनी गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्याचा वैयक्तिक लाभ उठवला, अशी तक्रार शिवसेना…
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांचं जोरदार वारं वाहात आहे. एकूण १७ जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत असून १८ जून रोजी या निवडणूक होत आहे. आज या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. ३ वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायचे होते. त्यानुसार, १७ पैकी अनेक मतदारसंघातील उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा सर्वाधिक समावेश आहे. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे अर्ज माघारी घेण्यासाठी तब्बल १५० कोटी खर्च केले असून एका उमेदवाराला माघार घेण्यासाठी २५ कोटी दिल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | मुंबई/बुलढाणा: भारतीय जनता पक्षाला देशात लोकशाही नको असून, ‘इलेक्शन सिस्टिम’ ऐवजी ‘नॉमिनेशन सिस्टिम’ आणायची आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाने सर्व नैतिक मूल्ये पायदळी तुडवली असून, चालू असलेल्या विधान परिषद निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विरोधी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडताना म्हटले की, विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे मर्यादित मतदार असतात. मात्र, या मर्यादित मतदारांच्या निवडणुकीतही सत्ताधारी महायुतीकडून ‘पैसा फेक तमाशा देख’ असा उघड खेळ सुरू आहे.…
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विविध मतदारसंघांत उमेदवारांनी माघार घेतल्याने काही ठिकाणी निवडणूक केवळ औपचारिकता राहिली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून महायुतीचे विक्रम काकडे बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थित उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यानंतर ही स्थिती निर्माण झाली. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले आहेत. मविआचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्याने तटकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात दुश्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | पुणे: पुण्यातील प्रमुख आयटी हब मानल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील एका नामांकित आयटी कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेल्या एका ४८ वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर लग्न करण्यासाठी आणि धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रचंड दबाव आणल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित महिला अधिकाऱ्याने पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत जाहीरपणे वाच्यता करत स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती हिंजवडीतील एका नामांकित आयटी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होती. याच कार्यालयात काम करणाऱ्या एका अन्य महिला कर्मचाऱ्याने तिच्यावर लग्न करण्यासाठी आणि धर्म बदलण्यासाठी वारंवार दबाव…
विशेष प्रतिनिधी | संगमनेर: शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणांवर पालिकेने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, या अधिकृत कारवाईदरम्यान शासकीय कामात अडथळा आणून पालिका कर्मचाऱ्यांना दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, पेटीट सर्कल परिसरातील भाजी व फळ विक्रेत्यांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. यावर तोडगा म्हणून नगरपालिकेने मेडिकव्हर हॉस्पिटलसमोरील जागेत शेड उभारून ३८ पदपथ विक्रेत्यांसाठी पर्यायी गाळ्यांची व्यवस्था केली होती. या गाळ्यांचे वाटप करण्यासाठी प्रशासनाकडून आधीच पूर्वसूचना व नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, काही विक्रेत्यांनी नव्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रित्या चालणाऱ्या मटका अड्ड्यांवर पोलिसांनी एकाच दिवशी मोठी धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या पथकाने १ जून रोजी ६ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी एकूण १० जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईत बागडपट्टी रोडवरील सदगुरू ऑटो सर्व्हिसच्या पाठीमागे नरेश नागेश यनगुल (वय ४५) आणि दिनकर मच्छिंद्र दोंडकर (वय ४०) यांना पकडण्यात आले. तसेच नवरंग व्यायामशाळेजवळील सटवाई मंदिराच्या मागे प्रदीप…
संपादकीय अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील घडामोडी वेगाने बदलत आहेत. अशा वेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेले “वाकचौरे आता थांबणार नाहीत” हे विधान केवळ एक राजकीय टिप्पणी नसून आगामी राजकीय समीकरणांचे संकेत देणारे ठरले आहे. राजकारणात नेत्यांची उपस्थिती आणि अनुपस्थिती यालाही अनेक अर्थ असतात. मंगळवारी (२ जून) खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डी मध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या बैठकीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची अनुपस्थिती होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी चंद्रकांत खैरे यांना छेडले असता त्यांनी केलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बद्दलचे वक्तव्य यामुळे चर्चांना अधिक उधाण आले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: दर्शन रोटरी आय केअर हॉस्पिटलमध्ये शनिवारी (दि. ३० मे) पार पडलेल्या या शिबिरात ११४ दिव्यांग लाभार्थ्यांना एकूण ११८ कृत्रिम अवयवांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जयपूर फूट, कृत्रिम हात आणि अत्याधुनिक ‘LN-4’ प्रोस्थेटिक हातांचा समावेश होता. या आधुनिक कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांगांना दैनंदिन कामे करणे अधिक सुलभ होणार असून, त्यांच्या स्वावलंबनाच्या प्रवासाला एक नवी बळकटी मिळाली आहे. रोटरी क्लब ऑफ संगमनेर, मुंबईचे रत्ननिधी फाऊंडेशन आणि रियांश मल्टिट्रेड लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी या सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला लाभार्थी आणि संगमनेरकर नागरिकांचा प्रतिसाद लाभला. यावेळी नगरसेविका रचना मालपाणी, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या आपण कौशल्याने पार पाडाल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती राहील, तसेच जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. आर्थिक क्षेत्रात केलेले जुने प्रयत्न आता यश देऊ लागतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज आपल्याला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. अडकलेली आर्थिक कामे मार्गी झाल्याने मनातील मोठी चिंता दूर होईल. व्यवसायात भागीदारांशी असलेले मतभेद संपुष्टात येतील आणि नवीन योजनांवर काम सुरू करता येईल. समाजात मानसन्मान वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. संध्याकाळचा वेळ कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींसोबत घालवणे…
