Author: अनंत पांगारकर
दि. १६ मार्च संगमनेर विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा आणि काडतुसे कब्जात बाळगणाऱ्या संशयित आरोपीला घारगाव पोलिसांनी अटक केली आहे. अशोक दगडू खेमनर (वय २५ वर्ष, रा. हिरेवाडी, साकुर, ता. संगमनेर) असे पोलिसांनी अटक केलेले आरोपीचे नाव आहे. खेमनर हा आपल्या कब्जात विनापरवाना गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घारगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने मांडवे बुद्रुक गावच्या शिवारात असलेल्या अनिल शांताराम कढणे यांच्या शेतातील विहिरीजवळ असलेल्या कोपीमध्ये छापा टाकला. यावेळी पोलिसांना संशयित आरोपी अशोक दगडू खेमनर याने विनापरवाना स्वतःच्या कब्ज्यात गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे बाळगले असल्याचे आढळून आले. पोलिसांनी खेमनर याला अटक केली असून त्याच्या विरोधात घारगाव…
दि. १४ मार्च, संगमनेर राज्य शासनाच्यावतीने राबविल्या जात असलेल्या यशवंत पंचायत राज विकास अभियानात संगमनेर पंचायत समितीने बाजी मारली असून तिसऱ्या क्रमांकाचा सहा लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला आहे. याशिवाय पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी प्रदीप वर्पे यांनाही गुणवंत अधिकारी पुरस्कार देण्यात आला. महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यावेळी उपस्थित होते. संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. योजनांची अंमलबजावणी करून राज्याच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवून पंचायत राज्य संस्थेच्या कामगिरीनुसार त्यांना प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता राज्यात…
दि. १४ मार्च, संगमनेर शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. यासाठी दरवर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या कार्यकारी यांच्या अध्यक्षपदी सागर बागे याची तर उपाध्यक्षपदी सौरभ उमरजी यांचे निवड करण्यात आली आहे. ग्रामदैवत असलेल्या चंद्रशेखर चौकातील मारुती मंदिरात उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी केलेल्या प्रास्ताविकानंतर कार्यकारिणीची निवड सर्वांनुमते करण्यात आली. यावर्षी उत्सव समितीच्या माध्यमातून साजरा केला जाणारा कार्यक्रमांची माहिती पत्रकार मंगेश सालपे यांनी दिली. उत्सव समितीची कार्यकारणी पुढील प्रमाणे… सागर बागे (अध्यक्ष), सौरभ उमरजी (कार्याध्यक्ष), मयूर जाधव व सागर पगारे (उपाध्यक्ष), किरण…
दि. १४ मार्च, संगमनेर सहकाराच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्व आणि विचार घेऊन सहकार चळवळीत मोठे योगदान दिले. तालुक्याच्या विकासाची रचनात्मक पायाभरणी करताना त्यांनी समाज विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले असून त्यांचे जीवन कार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे अमृत उद्योग समूहाच्यावतीने आयोजित १४ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, सुधाकर जोशी,…
दि. १३ मार्च, नवी दिल्ली २०२४ च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ७२ उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहीर केली. या यादीत राज्यातील २० उमेदवारांचा समावेश असून बहुतांश उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर मधून उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्यासह पंकजा मुंडे बीडच्या उमेदवार असतील. तर अहमदनगर दक्षिण मधून उमेदवार बदलाची चर्चा सुरू असतानाच भाजपाने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजप उमेदवारांच्या यादीत डॉ. हिना विजयकुमार गावित (नंदुरबार), डॉ. सुभाष भामरे (धुळे), श्रीमती स्मिता वाघ (जळगाव), रक्षा खडसे (रावेर), अनुप धोत्रे (अकोला), रामदास तडस (वर्धा), सुधीर मुनगंटीवार…
दि. १३ मार्च, संगमनेर संगमनेरच्या शांततेला गालबोट लावणारे जोर्वेनाका येथील प्रकरण न्यायप्रविष्ट होत नाही तोच आता पुन्हा एकदा कोल्हेवाडी-दिल्ली नाका रस्त्यावर जमावाकडून चिमुकल्या लेकींसमोर पित्यासह तिघांना मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात दंगल नियंत्रक पथकाची कुमक देखील मागविण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर रात्री उशिरा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांचा मोठा जमाव जमला होता. घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत असून दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत दुपारपर्यंत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. राहुल सोपान गुंजाळ (वय ३८ वर्ष, रा. कोल्हेवाडी, ता.…
दि. १२ मार्च, नवी दिल्ली २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने ४३ उमेदवारांची आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नसून तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. आसाम मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथून सध्याचे खासदार नकुलनाथ यांना काँग्रेसने पुन्हा तिकीट दिले आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत, २००१-२०१६ पर्यंत आसामचे मुख्यमंत्री राहिलेले तरूण गोगई यांचे सुपुत्र गौरव गोगोई यांनाही काँग्रेसने आपल्या दुसऱ्या यादीत स्थान…
दि. १२ मार्च, संगमनेर शहरालगत असलेल्या लक्ष्मी नगरमध्ये मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जमावाने दोन जणांना शस्त्रांसह बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी जखमीच्या जबाबावरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. जमावाच्या मारहाणीत हुसेन बाबामियां शेख (रा. मालदाड रोड, तिरंगा चौक, संगमनेर) हा गंभीर जखमी झाला आहे. या संदर्भात मिळाली माहिती अशी, मित्राला होत असलेली मारहाण पाहून त्याला वाचवण्यासाठी हुसेन शेख मदतीला गेला आणि भांडणांमध्ये मध्यस्थी करू लागल्याने जमलेल्या तरुणांच्या जमावाने त्यालाही मारण्यास सुरुवात केली. तसेच या बेदम मारहाणीत त्याच्यावर कोयत्याने वार करीत…
दि. १२ मार्च, संगमनेर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ३ कोटी १५ लाख ८ हजार १०० रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी दिली. सरकारच्या माध्यमातून सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वर्गासाठी विविध योजना राबविल्या जातात. यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना अशा योजनांचा समावेश आहे. जानेवारी व फेब्रुवारी २०२४ चे संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत सर्वसाधारण ५२४८ लाभार्थ्याना १ कोटी ५५…
दि. ११ मार्च, मुंबई नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटना व तत्सम बाबींची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. या समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या विरोधात केलेल्या विधानांचे पडसाद उमटले होते. भाजपाचे आमदार आशीष शेलार यांनी विधानसभेत अंतरवली सराटी प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या हिंसक घटनांची चौकशी…
