Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : बहुचर्चित ठरलेल्या संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी संकेत नवले याच्या खून प्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही आरोपींना संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संशयित आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असून संगमनेर पोलिसांना अद्यापही संकेतच्या मारेकऱ्यांना शोधण्यात यश आलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अकोले येथील रहिवासी असलेला संकेत नवले हा विद्यार्थी संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. ८ डिसेंबर २०२२ रोजी त्याचा मृतदेह शहरालगतच्या सुकेवाडी रस्त्यावर असलेल्या पुनर्वसन कॉलनी जवळील एका नाल्यात आढळून आला होता. अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी त्याचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक : आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शासकीय कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही या वादातून आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच शिवीगाळ केली होती. यावर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुढील घटना थांबवली आणि कडू यांना ताब्यात घेतले होते. सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविला होता. या संदर्भात नाशिकच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. न्यायालयाने शासकीय कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात आमदार कडू यांना दोषी ठरवत न्यायालयाने हा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संगमनेरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने महिलांचा सन्मान करण्यात आला. महिला आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे. सर्वच छत्रपती महिलांनी अभूतपूर्व योगदान दिले आहे. देशात महिलांना समान हक्क दिल्याने महिला यशस्वी घोडदौड करत आहे. सर्वच क्षेत्रात नारीशक्तीची ताकद मोठी असल्याने अशा काही महिलांचा शिवसेनेच्या महिला संपर्क नेत्या शुभांगी पाटील, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बबन नाना घोलप, उत्तर नगर जिल्हा प्रमुख मुजीब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एमएसईबी मधील शमी गणपतीच्या प्रांगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख अमर कतारी यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विखे पिता पुत्रांनी घडवून आणलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर बँक महाविकास आघाडीच्या ताब्यातून निसटली आहे. अनपेक्षितपणे आघाडीच्या मतांची फोडाफोडी करत भारतीय जनता पक्षाने बँक आघाडीच्या ताब्यातून खेचून आणली. बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी बुधवारी संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. शेळके यांच्या रूपाने अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर माधवराव कानवडे यांच्या रूपाने उपाध्यक्षपद काँग्रेसकडे होते. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे बँकेवर वर्चस्व असल्याने शेळके यांच्या रिक्त जागी महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ॥ बाळासाहेब भोर संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक व नैसर्गिक महत्व लाभलेल्या पेमगिरीत १० मार्च रोजी शिवजयंतीनिमित्त दिवसभर विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहागड युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी पेमगिरीत शिवजयंती ही विविध सामाजिक उपक्रम तसेच पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी केली जाते. मागील वर्षी शिवजयंतीनिमित्त कुस्त्यांचा जंगी हंगामा मोठया दिमाखात पार पडला होता. सालाबादप्रमाणे शिवजयंतीच्या दिवशी रात्री शहागडावर शिवजन्मोत्सव सोहळा व फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. सकाळी संपूर्ण गावातून छत्रपतींची पालखी प्रदक्षिणा व महाआरती होईल व संध्याकाळी शिवशाहिर प्रा. अरविंद घोगरे (जालना) यांच्या भेदक पहाडी आवाजातील शिवकालीन पोवाडा, शिवगीते, शूरवीरांच्या पराक्रमाच्या कथा आपल्या मराठमोळ्या शाहिरी बाण्यातून सादर होणार आहेत.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : पुण्याच्या कसबा पेठ व पिंपरी चिंचवडच्या पोट निवडणुकांचे निकाल बघता जनतेने सत्ताधाऱ्यांना नाकारले आहे. राज्यात भाजपा आणि शिंदे गटाची झालेली युती जनतेला मान्य नाही, ही वस्तुस्थिती स्पष्ट दिसत असून सत्ताधाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची भीती वाटत आहे अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष निवडी संदर्भात शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या बैठकीनंतर पवार माध्यमांशी बोलत होते. सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करत पवार म्हणाले राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. आज परदेशात मुलींना फसवून नेले जाते. राज्यात अत्याचाराचे प्रकार वाढले आहे. श्रीरामपूरची घटना देखील ताजी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : कुटुंब म्हटलं की भांड्याला भांड लागतंच. पण आपण एकत्र लढलो तर निश्चितचं त्यांचा पराभव करु. कसबापेठ मतदारसंघात गेली २५ वर्षे भाजपचा उमेदवार निवडून येत होता. आता जनता त्यांना त्यांच्याच मतदारसंघात नाकारत आहे. त्यामुळे आपल्याला एकत्र होऊनच निवडणुका जिंकायच्या आहेत. तरीदेखील कसबा जिंकलो म्हणून हुरळून जाऊ नका. आपल्याला जनतेसोबत खांद्याला खांदा लावून काम करायच आहे, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिला. जिल्हा बँक अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मंगळवारी अहमदनगरमध्ये आले होते. तत्पूर्वी त्यांनी पाथर्डी येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अजित पवार म्हणाले, कोणी ताम्रपत्र घेऊन जन्माला येत नाही. आम्ही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज महिला दिनाचे औचित्य साधीत सामाजिक बांधिलकीतून स्त्रियांच्या आजारासाठी मोफत तपासणी व उपचार शिबिराचे बुधवारी ८ मार्चला संगमनेरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. स्त्रीरोगतज्ञ वैद्य स्मिता अतुल देशमुख यांनी यासंबंधी माहिती दिली. संगमनेरमधील श्री विश्वगंध आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटलच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिन महिलांसाठी हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन स्मिता देशमुख व अतुल देशमुख यांनी केले आहे. शिबिरामध्ये महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारी, अंगावरून जास्त जाणे, कमी जाणे, पाळी वेळेवर न येणे, लवकर येणे, पाळी दरम्यान ओटी, छाती, कंबर, पाय दुखणे. स्त्री बीजाची वाढ न होणे. गर्भ पिशवीला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ठाणे : राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे, ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झालेले असल्याने हवालदिल झालेल्या बळीराजाला मुख्यमंत्र्यांनी ग्वाही देत दिलासा दिला आहे. ते म्हणाले,” सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही” या संदर्भात त्यांनी प्रशासनाला निर्देशही दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये आपल्या कुटुंबीयांसह धुळवड साजरी करत असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करा, शेतकऱ्यांना मदत करा असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सकाळीच मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून अवकाळी पाऊस आणि गारपिटी संदर्भात परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने फेक पोस्ट केल्याप्रकरणी ठाकरे गटाचा आर्णी तालुका अध्यक्ष प्रवीण देशमुख याला नागपूर सायबर सेल पोलिसांनी ताब्यात घेत चौकशीनंतर त्याला सोडण्यात आले. कसबा निवडणुकीनंतर देशमुख याने नितीन गडकरी यांच्या नावाने फेक मॅसेज व्हायरल केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री नितीन गडकरी यांच्या नावे फेक पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपी हा ठाकरे गटाचा आर्णी तालुका अध्यक्ष असून प्रविण देशमुख असे त्याचे नाव आहे. आरोपी प्रवीण देशमुख नागपूर सायबर सेलच्या ताब्यात होता. नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने प्रवीण देशमुखची चार तास…

Read More