Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शासनाने गौण खनिजा संदर्भात केलेल्या जाचक नियम आणि कडक निर्बंधांमुळे बांधकाम व्यवसाय कोलमडून पडला असून या व्यवसायावर अवलंबून असलेल्या पुरवठादार मजूर आणि कामगारांची मोठ्या प्रमाणावर उपासमार सुरू झाली आहे. त्यामुळे शनिवारी (ता. ७ डिसेंबर) या व्यवसायाशी निगडित पुरवठादार मजूर आणि कामगारांचा महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचे संपर्क कार्यालय असलेल्या यशोधन इमारतीपासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्र हे पायाभूत विकासाचे क्षेत्र आहे. मात्र याबाबत नगर जिल्ह्यात आणि विशेषत: संगमनेर तालुक्यात लावलेल्या कडक निर्बंधांमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाला असून या क्षेत्राशी निगडित असलेले कामगार, मजूर, पुरवठादार यांची गेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क छात्र भारती संघटना, परमपूज्य गगनगिरी विद्यालय आणि ग्रामपंचायतीच्यावतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातून रॅली देखील काढण्यात आली होती. गावातील शाळेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह महिला, गगनगिरी विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी गावातून काढलेली रॅली लक्षवेधी ठरली. विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल प्रेरणादायी घोषणा देण्यात आल्या.

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : भूमिगत गटार योजनेच्या चुकीच्या पद्धतीने केल्या गेलेल्या कामामुळे स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर गंगामाई घाटाकडे जाणारा पूल खचल्याने गेल्या सहा महिन्यांपासून हा पूल वाहतुकीस बंद आहे. या पुलाची दुरुस्ती तातडीने होणे शक्य नसल्याने जवळच कमी उंचीचा कॉजवे पूल दुरुस्तीसाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी संगमनेर भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महसूल मंत्री विखे पाटील यांची भेट घेत गणपुले यांनी ही मागणी केली आहे. स्वामी समर्थ मंदिरालगत असलेला हा पूल तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी नाबार्ड अर्थसहाय्य योजनेतून मिळविलेल्या निधीतून या पुलाची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर तालुक्यातील दोघा वाळू तस्करांना संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी एक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. सागर उर्फ शक्तिमान तुकाराम कोकणे (रा. धांदरफळ खुर्द ता. संगमनेर) आणि अरबाज करीम शेख (रा. जोर्वे रोड, संगमनेर) अशी या दोघा वाळूतस्करांची नावे आहेत. सातत्याने वाळू तस्करी करताना आढळल्याने संगमनेर शहर पोलिसांनी पोलीस उपाधीक्षकांमार्फत हे प्रस्ताव प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांच्याकडे कारवाईसाठी पाठविले होते. प्रांत अधिकाऱ्यांसमोर यासंदर्भातील सुनावणी झाल्यानंतर त्यांनी संबंधित दोन्ही वाळू तस्करांना एक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. राज्याचे महसूल मंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गेल्यानंतर जिल्ह्यात वाळू तस्करीला लगाम घालण्यासाठी प्रशासनाने पावले उचलले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : मन स्वास्थ्यासाठी योग व प्राणायाम अतिशय महत्त्वाचा आहे. योगमित्र डॉ. सुधाकर पेटकर गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने न थकता योगा व प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून तरुणांना लाजवतील असे महान कार्य करत असल्याचे गौरवोद्गार नासिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले. संगमनेरमधील भंडारी मंगल कार्यालयात २६ ते ३१ डिसेंबर दरम्यान श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था, योगवर्धिनी, आधार फाउंडेश, संगमनेर साहित्य परिषद, रोटरी क्लब, निमा आणि महेश ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या योग व प्राणायाम शिबिराच्या रोप्यमहोत्सवी समारोपावेळी आमदार सुधीर तांबे बोलत होते. यावेळी सेवाभावी क्षेत्रात काम करणारे ऋषिकेश मोंढे, प्रदीपभाई शहा, गणेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये मोठया प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून या वाढलेल्या चोऱ्यांसह वाढलेले सायबर क्राईम हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. पोलिसांनी याबाबत खंबीर भूमिका घेत तातडीने बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन अंतिम आठवडा प्रस्तावात बोलताना आमदार तांबे म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील प्रगतशील राज्य आहे. मात्र सध्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठे भितीचे वातावरण आहे. याकरता पोलिसांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस मित्र संघटनेची ही मदत घ्यावी तसेच गावागावातील तरुणांनाही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सरपंचाच्या घरी डल्ला मारत अज्ञात चोरट्यांनी तब्बल १४ लाख रुपयांची केबल चोरून नेल्याचा प्रकार तालुक्यातील निमोण येथे घडला आहे. सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. निमोणचे विद्यमान सरपंच संदीप भास्कर देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अक्षय संजय जाधव (वय २४ वर्षे रा. बालमटाकळी ता. शेवगाव) याच्यासोबत त्याच्या दोघा साथीदारांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील जाधव याला ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात आले. देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी मध्यरात्री सफेद रंगाच्या स्कार्पिओमधून (क्रमांक ८०५५ पूर्ण क्रमांक माहिती नाही) आलेल्या आरोपींनी घरासमोर ठेवलेली १४,१७,४१६/-रुपये किमतीचे पंधराशे मीटर लांबीचा एक पंचवीस स्वेअर्स एम.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या रस्त्यांच्या विविध कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तब्बल तीन कोटी दहा लाख रुपयांचा निधी संगमनेर तालुक्यासाठी मंजूर झाला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्य सरकारकडून थोरात यांनी मोठा निधी उपलब्ध करत तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर विविध विकासाच्या योजना राबविल्या आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून २०२२-२०२३ मधून येथील देखील तालुक्यासाठी तीन कोटी दहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची व यातून तालुक्यातील विविध रस्त्यांची कामे केली जाणार असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे. १७१…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : संगमनेर शहरालगत असलेल्या पावबाकी, सुकेवाडी येथे दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांपैकी दोघा दरोडेखोरांना पकडण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. असे असले तरी स्थानिक शहर पोलिस मात्र या दरोड्यासह खूनाच्या अन्य एका प्रकरणातील आरोपींचा शोध लावण्यात अपयशी ठरले आहेत. संगमनेरातील दरोड्याचा तपास लावण्यासाठी स्थानिक पोलिसांसह नगरच्या गुन्हे शाखेचे पोलीस पथक परिश्रम करत होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन सराईत आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले असून त्यांनी संगमनेरातील दरोड्याची कबुली दिली असल्याची माहिती मिळते. याशिवाय या गुन्हेगारांच्या टोळीने जिल्ह्यात अन्यत्र दरोडे घातल्याची माहिती पथकाला मिळाली आहे. नगर एलसीबीचे (स्थानिक गुन्हे शाखा) पोलीस निरीक्षक अनिल…

Read More

रविवार विशेष 🔹प्रवीण पूरो गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या मागे लागलेली इडीची पिडा आता संपायला हरकत नाही. खोट्याचं खरं फारकाळ होत नसतं. आणि सत्ताधार्‍यांच्या नादी लागून तर अजिबात नाही. लाज, लज्जा त्या विभागाची जात असते. घडवून आणणारा राजकारणी तिथेच असतो. इडीने आजवर केलेल्या कारवायांकडे पाहाता आता तरी इडीचे अधिकारी शहाणे होतील, अशी अपेक्षा.  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून जबाबदारीवर असलेल्या अनील देशमुख यांना ते मंत्री असताना इडीने ताब्यात घेतलं. त्यांच्यावरील आरोपाचे कोणतेही पुरावे नसल्याने इडीच्या जोखडातून न्यायालयाने त्यांना मोकळं केलं आहे. देशमुख यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने इडीविरोधात नोंदवलेल्या शेर्‍यांचा विचार करता यापुढे कोणालाही ताब्यात घेताना…

Read More