Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यातील गायरान जमिनींवरील आक्रमणे काढण्याबाबत उच्च न्यायालयाने निर्णय घेतला असून ग्रामीण भागामध्ये गोरगरीब नागरिक गायरान जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. या नागरिकांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने ही कार्यवाही थांबवण्यासाठी तातडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.गायरान जमिनीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यभरातील ग्रामीण भागातील गोरगरीब व आदिवासी नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी एका पत्राद्वारे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क उत्तर नगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने राबविलेल्या ‘धन्यवाद मोदीजी’ अभियानाने राज्यात वरचे स्थान मिळविले आहे. अभियानात उत्तर नगर जिल्ह्याचा समावेश पहिल्या पाच जिल्ह्यात करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर नगर जिल्ह्यात ‘धन्यवाद मोदीजी’ अभियान कार्यक्षमतेने राबविले. अभियानाने राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यात स्थान प्राप्त केल्याने अभियानाचे संयोजक राजेंद्र सांगळे, सहसंयोजक अनिल भनगडे, अंकुश काळे यांच्यासह भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे यांच्यासह उत्तर नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन होत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात हे अभियान राबविण्यात आले. एकट्या उत्तर नगर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधी वक्तव्य केल्याने राज्यात विविध पक्ष त्यांचा निषेध करत असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या वादात ऊडी घेतली आहे. राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवा असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा उद्या शेगावमध्ये दाखल होत आहे. शेगावमध्ये त्यांच्या सभेचे आयोजन देखील करण्यात आले असून या सभेची जय्यत तयारी केली जात आहे. सावरकर विरोधी वक्तव्य करणाऱ्या गांधी यांना शेगावमध्ये जाऊन काळे झेंडे दाखवा, असे आदेश मनसे प्रमुखांनी दिल्याने उद्या शेगाव मध्ये मनसैनिक मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अवघ्या 18 जणांच्या साक्षीने प्रबोधनकारांच्या खोलीमध्ये शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसाचे हित जोपासण्यासाठी स्थापन झालेल्या या शिवसेनेची पाळेमुळे महाराष्ट्रभर रुजली आहे. शिवसेनेच्या जोरावर मोठी पदे मानसन्मान मिळविणाऱ्या अनेकांनी शिवसेना सोडत तिला कमकुवत करण्याचे प्रयत्न केले, मात्र प्रत्येक वेळी शिवसेना नव्या जोमाने उभी राहिल्याचे चित्र आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा या शिवसेनेचा आत्मा राहिला आहे. सामाजिक संघटना ते राजकीय पक्ष या शिवसेनेच्या इतिहासाचे अनेक जण साक्षीदार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात नसले तरीदेखील याच नावाभोवती समाजकारणच नाही तर सत्ताकारणही केंद्रीभूत झाल्याचे दिसते. दहा वर्षानंतर देखील या नावाची जादू अद्यापही ओसरली नाही उलट, हे नाव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बड्या राजकीय नेत्यांची धक्क्यांची मालिका संपण्याची चिन्हे नाहीत, आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अधिपत्याखाली असलेला जळगाव दूध संघ ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आले आहे. यामुळे दूध संघाची निवडणूक गाजण्याची चिन्हे निर्माण झाली असून वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे, चव्हाण यांच्या उमेदवारीला हरकत घेणारी ही याचिका फेटाळल्याने दूध संघाच्या निवडणूकीत खडसे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली असल्याचे मानले जाते. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे मुक्ताईनगर तालुक्यात सभासद नसतांना त्यांनी दाखल केलेली उमेदवारी रद्द करावी, या मागणीसाठी मंदाकिनी खडसे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क एकापाठोपाठ एक मोठे उद्योग राज्याबाहेर निघून गेल्यानंतर टिकेचे धनी बनलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने रोजगाराच्या प्रश्नात लक्ष घातले आहे. प्रकल्पाच्या प्रश्नावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये राजकारण रंगलेले असतांना आता सरकारने बेरोजगार युवकांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. राज्यातील कौशल्य विभागाच्या पुढाकारातून १ लाख २१ हजार बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सामंजस्य करार करण्यात आले आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार पार पडला. या सामंजस्य कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी. उद्योगांनी त्यांच्याकडे आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचे स्थानिकांना प्रशिक्षण द्यावे. यातून…

Read More

भाजपच्या भूलथापांना संगमनेरकर बळी पडणार नाही महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर विकासातून वैभवशाली शहर ठरले आहे. तत्कालिन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी त्यांच्या कार्यकाळातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून जागेचीही निश्चीती केली आहे. त्यामुळे शहरात लवकरच अश्वारुढ पुतळा उभारण्यात येणार असून यासंदर्भातत भाजपचे पदाधिकारी जनतेला भुलथापा देवून दिशाभुल करत असल्याची टीका कॉग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली. अश्वारूढ पुतळ्याबाबत बोलताना दिवटे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले आणि सय्यद जावेदभाई जहागिरदार यांनी आम्हाला सत्ता दिल्यास आम्ही छत्रपती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेरात स्थानिक पोलीसांच्या आशिर्वादाने सुरु असलेल्या अवैध धंद्यात आता हुक्का पार्लरचा समावेश झाला आहे. शहरालगत हाकेच्या अंतरावर असलेल्या गुंजाळवाडी शिवारातील हुक्का पार्लरवर नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संगमनेरात येत टाकलेल्या या छाप्यामुळे प्रतिष्ठीतांचे हुक्का पिण्याचे शौक समोर आले आहेत. पथकाच्या छाप्यात ५५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हाती लागला असून नऊ जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन नंतर आरोपींची मुक्तता करण्यात आली. शहरालगत गुंजाळवाडी शिवारात सुरु असलेल्या या हुक्का पार्लरकडे स्थानिक पोलीस दुर्लक्ष करत असतांना याची माहिती थेट नगरच्या गुन्हे विभागाला मिळाल्यावर त्यांचे पथकच मंगळवारी रात्री संगमनेरात दाखल झाले. या पथकाने हॉटेल ग्रीन लीप शेजारी असणाऱ्या पत्र्याच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सध्या मनी लॉन्ड्रीग प्रकरणी तुरुंगात असलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाशिम न्यायालयाने दिले आहेत. यामुळे मलिक यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्यात. एनसीबीचे मुंबई झोनलचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी मलिक यांनी कुटुंबियांची बदनामी केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज वाशिम सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने वाशिम पोलिसांना मलिक यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. मलिक यांच्या विरोधात वाशिम शहर पोलीस ठाण्यात उद्या हा गुन्हा दाखल होईल. वानखेडे यांच्या आयुष्यातील जुने फोटो आणि पुरावे मलिकांनी त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया वरून प्रसारित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाविकास आघाडीचे सरकारकडून मी बदला घेतला. अशी कबुली फडणवीस यांनी दिली आहे. ‘कटकारस्थानाचे महामेरू’ अशी पदवी उत्तम शोभू शकते त्यांना! अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेने आमच्या सोबत जी बेईमानी केली, त्या बेइमानाना त्यांची जागा दाखविण्यात आली. गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनामुळेच आज महाराष्ट्रात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे (शिंदे गट) सरकार सत्तेवर आले आहे. अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर सरकार पाडण्यामागे फडणवीसच असल्याची टीका सुरू झाले असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विटद्वारे त्यांच्यावर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये पटोले म्हणाले, मविआ सरकारकडून मी बदला…

Read More