Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क तब्बल १०१ दिवस तुरुंगात असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. संध्याकाळी त्यांची आर्थररोड कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी कारागृहाबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राऊतांची सुटका झाल्याने ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे. गळ्यात भगवा गमछा परिधान करुन संजय राऊत आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले. यावेळी शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे कारागृहाबाहेरील परिसर कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला… अशा घोषणांनी दुमदुमून गेला होता. बाहेर येताच राऊत यांनी स्वागतासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना नमस्कार केला आणि गाडीत बसून गेले. यावेळी माध्यमांशी…
सुयोग्य व्यवस्थापन व तालुकास्तरीय शिबिरांच्या माध्यमातून समितीचे जलद कामकाज महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात १७ सप्टेंबर पासून जात वैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गंत राज्यात ८५,८८४ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यात सर्वाधिक ६३४४ प्रकरणे एकट्या अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने निकाली काढत राज्यात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय, सुयोग्य व्यवस्थापन, जलद निर्णय प्रक्रिया व तालुकास्तरावर घेतलेले शिबिरे या माध्यमातून अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केलेल्या कामकाजामुळे अहमदनगर जिल्हा समिती राज्यात अव्वल ठरली आहे. बार्टीने सेवा पंधरवडा कालावधी सुरू झाल्यापासून ते ८ नोव्हेंबर पर्यंत राज्यात निर्गमित करण्यात आलेल्या प्रकरणांची…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यभरातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयुक्त यु. पी. मदान यांनी जाहीर केला आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंच पदाच्या निवडणुकाही याच दिवशी होणार आहेत. ऑक्टोंबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदती संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची नोटीस स्थानिक ठिकाणचे तहसीलदार 18 नोव्हेंबरला प्रसिद्ध करणार आहेत. या निवडणुकीसाठीची आचारसंहिता आजपासूनच लागू झाली आहे. इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज 28 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर 2022 या दरम्यान दाखल करावयाच्या आहेत. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी 5 डिसेंबरला होणार असून 7 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत यांना अखेरीस आज विशेष पीएमएल न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले असून टायगर परत आलाय अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. खासदार संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत यांनाही मंजूर करण्यात आला आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर विशेष पीएमएल न्यायालयात सुनावणीचे काम पूर्ण झाले होते. न्यायालयाच्या दिवाळी सुट्टी अगोदर झालेल्या सुनावणी दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद करत लेखी म्हणणे देण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र जामीना संबंधीच्या याचिकेवरील आदेश 9 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाने राखून ठेवला…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक केले आहे. ‘उदारमतवादी अर्थव्यवस्थेमुळे देशाला नवी दिशा मिळाली. त्यासाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे’, अशा शब्दांत त्यांनी मनमोहन सिंग यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. दिल्लीत टॅक्स इंडिया ऑनलाईन पोर्टल आयोजित अवॉर्ड कार्यक्रमांमध्ये गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले, तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी 1991 साली सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताला एक नवी दिशा मिळाली. उदारमतवादी आर्थिक धोरण शेतकरी आणि गरिबांसाठी असते. उदारमतवादी आर्थिक धोरणामुळे एखाद्या देशाचा कसा विकास होतो, याचे उत्तम उदाहरण चीन आहे. मनमोहन सिंग यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे महाराष्ट्राचा मंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचे मंगळवारी संगमनेरमध्ये भव्य स्वागत करत समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केले. संगमनेरसह अकोले, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, नेवासे येथील शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शिवसेना पदाधिकारी निवडीवरून उत्तर नगर जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन गटात मोठे रणकंदन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख बबन घोलप आणि जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या समर्थकांमध्ये दोन गट पडले असून या दोन्ही गटांनी एकमेकांच्या नेत्याविरोधात आंदोलने केली होती. पक्षांतर्गत गटबाजी या निमित्ताने थेट पुणे प्रथमत:च समोर आली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडींना स्थगिती देण्यात आल्याने संगमनेरमध्ये जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले होते. त्यामुळे खेवरे समर्थकांनी पोलीस…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क फॉक्सकॉन, वेदांता सेमीकंडक्टर असे एका पाठोपाठ एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरणारी असून टेक्निकल शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी राज्यात रोजगार निर्मिती न होणे आणि येणारे उद्योग परराज्यात जाणे, यामुळे येथील बेरोजगारीत मोठी वाढ होणार असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले. सह्याद्री महाविद्यालयामध्ये झालेल्या युवक करिअर मार्गदर्शन मेळाव्यात आमदार डॉ. तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील होते. डॉ. बाळासाहेब वाघ, प्रा. शिवाजी नवले, प्रा. लक्ष्मण घायवट व्यासपीठावर उपस्थित होते. तांबे म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील एक प्रगतशील राज्य आहे. मात्र सध्या नव्याने सत्तारूढ झालेल्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क हिमाचलमधील काँग्रेसचे माजी सरचिटणीस धर्मपाल ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या सहवीस नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. या सर्वांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे हिमाचलमध्ये काँग्रेसला निवडणुकीपूर्वीच मोठा झटका बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका जाहीर झालेल्या असून येत्या चार दिवसात म्हणजेच 12 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होत आहे. तत्पूर्वीच या नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या माहोलमध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी सुधन सिंह यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आहे. यावेळी सिमला येथील भाजप उमेदवार संजय सुद हे देखील उपस्थित होते. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तब्बल 26 नेते काँग्रेस…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले टोल नाका प्रशासना विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेले उपोषण महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सोमवारी सायंकाळी मागे घेण्यात आले. 31 डिसेंबर पर्यंत आंदोलकांच्या मागण्या पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन प्राधिकरणाचे तांत्रिक व्यवस्थापक अनिल गोरड यांनी जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांना दिले. अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जाऊन देखील, शेकडो लोक जखमी होऊन देखील, महामार्गावरील खड्ड्यामुळे अनेकांना विकलांगपणा येऊन देखील जागे न होणाऱ्या हिवरगाव पावसा येथील टोल प्रशासनाकडून केवळ वाहनचालकांकडून टोल वसुली करणाऱ्या टोल प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले होते. पुणे नाशिक महामार्गावर हिवरगाव पावसाळ्यातील दोन प्रशासनाच्या कार्यालयासमोर सुरू…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी रात्री तेलंगणामधून महाराष्ट्रामध्ये पोहोचली आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात देगलूर मध्ये आली असताना या यात्रेचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. स्वागता दरम्यान यात्रेला महाराष्ट्रात देखील इतर राज्याप्रमाणे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. खासदार गांधी गुरुनानक जयंतीच्या पूर्वसंध्येला यादगार साहिबजादे बाबा जोरावर सिंहजी फतेहसिंहजी गुरुद्वारामध्ये पारंपारिक शिखांच्या वेशात पोहोचले. तेथे त्यांनी गुरुनानकांसमोर सौहार्द आणि समानतेसाठी प्रार्थना केली. त्यांच्यासोबत माजी मंत्री अशोक चव्हाण, नाना पटोले यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. देगलूर मध्ये मोठा उत्साह आणि वातावरण काँग्रेसमय ‘नफरत छोडो भारत जोडो’चा संदेश देणारी गांधी यांच्या नेतृत्वाखालील…
