Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – राजकारणापलीकडे जाऊन जेव्हा समाजकारण केले जाते, तेव्हा सामान्यांचे प्रश्न कसे मार्गी लागतात, याचा प्रत्यय संगमनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये आला आहे. नगरसेवक योगेश (चिकू) जाजू यांच्या तत्परतेमुळे परदेशपुरा आणि जुम्मा मशीद परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ड्रेनेजचा प्रश्न निकाली निघाला असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. संगमनेरमधील परदेशपुरा आणि जुम्मा मशीद हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेजची मोठी समस्या निर्माण झाली होती. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत होती, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत होता. अनेकदा मागणी करूनही तांत्रिक कारणांमुळे हे काम रखडलेले होते. ३-४ दिवसांपूर्वी नगरसेवक…
संगमनेर, प्रतिनिधी – विषय समित्या हा खऱ्या अर्थाने नगरपालिकेचा आत्मा असून, गेल्या काही काळातील त्यांची मरगळ झटकून या समित्यांना अधिक शक्तिशाली आणि लोकाभिमुख करण्यावर आपला भर असेल, अशी ग्वाही आमदार सत्यजीत तांबे यांनी देत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संगमनेर शहराच्या आगामी विकासाची आणि प्रशासकीय शिस्तीची एक व्यापक दिशा स्पष्ट केली. संगमनेर नगरपालिकेच्या विशेष विषय समित्यांच्या सदस्य, सभापती निवडीचा कार्यक्रम सोमवारी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे उपस्थित होत्या. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या स्वागत समारंभावेळी आमदार तांबे बोलत होते. तांबे यांनी विषय समित्यांच्या घसरलेल्या प्रभावावर भाष्य केले. बजेट आणि अधिकारांच्या मर्यादांमुळे या समित्यांकडे दुर्लक्ष झाले होते,…
दैनिक राशीभविष्य: मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जावान आणि उत्साहाचा असेल. तुमच्या प्रलंबित कामांना गती मिळेल आणि नियोजित उद्दिष्टे वेळेत पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक होईल, मात्र घाईघाईत निर्णय घेणे टाळावे. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. आरोग्याच्या दृष्टीने आज दिवस चांगला असला तरी डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे वेळेवर विश्रांती घेणे आवश्यक आहे. वृषभ: आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अत्यंत फलदायी ठरेल. गुंतवणुकीचे जुने व्यवहार आज तुम्हाला नफा मिळवून देऊ शकतात. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील आणि व्यापारात वाढ होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवल्याने घरातील वातावरण आनंदी राहील. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे…
संगमनेर: प्रतिनिधी संगमनेर शहराची जीवनवाहिनी असलेल्या प्रवरा-म्हाळुंगी नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली. शांतीघाट परिसरात वाळू तस्करी सुरू असताना पथकाने छापा टाकला. यावेळी पळून जाणाऱ्या तस्करांचा थरारक पाठलाग करत दोघांना रंगेहात पकडण्यात आले, तर अन्य आठ जण उसाच्या शेतातून निसटले. या कारवाईत वाळूसह रिक्षा जप्त करण्यात आली असून १० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संगमनेरमधील शांतीघाट परिसरात रिक्षाच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत तहसीलदारांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार महसूल आणि पोलीस विभागाचे…
संगमनेर, प्रतिनिधी – थेट पालकमंत्र्यांनीच वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर महसूल प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. संगमनेर तालुक्यातील रायते शिवारात प्रवरा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या विरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत सुमारे २० लाख रुपये किमतीचे पोकलंड मशीन जप्त करण्यात आले असून, शासकीय कामात अडथळा आणून पळून गेलेल्या एका आरोपीविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध गौण खनिज चोरी रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष पथकातील ग्राम महसूल अधिकारी अविष्कार विश्वनाथ थोरात हे १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पथकासह गस्तीवर होते. तहसीलदार मांजरे साहेब यांच्या आदेशानुसार हे…
संगमनेर – अनंत पांगारकर संगमनेर नगरपालिकेचा कारभार संगमनेर सेवा समितीच्या हाती गेल्यानंतर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे आणि उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांनी पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये सत्ताधारी सेवा समितीच्या नगरसेवकांना सभापती पदाची संधी देतानाच, दोन अपक्ष आणि शिवसेनेच्या महिला उमेदवारालाही समित्यांमध्ये स्थान देऊन सर्वसमावेशक कारभाराचे संकेत देण्यात आले आहेत. सोमवारी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते. या बैठकीत सर्व निवडी बिनविरोध करण्यात…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील जोर्वे-रहिमपूर रस्त्यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास एक थरारक अपघात घडला. कोंबडी खताने भरलेला एक भरधाव आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट विहिरीत जाऊन कोसळला. सुदैवाने, हा टेम्पो महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला न धडकल्यामुळे एक मोठी वीज दुर्घटना टळली असून, टेम्पोमधील चौघेही जण बालंबाल बचावले आहेत. सटाणा तालुक्यातील देवळाभोर येथील आयशर टेम्पो (क्रमांक MH 41 AV 6183) कोंबडी खताच्या गोण्या घेऊन संगमनेर तालुक्यातील खांबा येथे आला होता. तेथे काही माल उतरवल्यानंतर, उर्वरित खत घेऊन टेम्पो आश्वी-रहिमपूर फाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होता. शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास जोर्वे-रहिमपूर रस्त्यावरील जाधव वस्तीनजीक असलेल्या धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहर आणि तालुक्याच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या ‘अत्याधुनिक ट्रक टर्मिनस’चे काम सध्या प्रगतीपथावर आहे. संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून तब्बल ७.५ कोटी रुपयांच्या निधीतून हे भव्य टर्मिनस साकारले जात असून, अशा प्रकारच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा असणारे हे महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्यातील पहिलेच ट्रक टर्मिनस ठरणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी दिली. आज आमदार सत्यजीत तांबे यांच्यासोबत या ट्रक टर्मिनसच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकारी, परिसरातील ग्रामस्थ, ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील नामवंत व्यावसायिक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून संगमनेरच्या व्यापार आणि दळणवळण क्षेत्राला एक नवी ओळख मिळणार आहे. यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ.…
संगमनेर, प्रतिनिधी – गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ३७ वर्षीय तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी प्रवरा नदीपात्रात आढळून आल्याने संगमनेर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अभिजीत बाळासाहेब पाटील असे या मृत व्यक्तीचे नाव असून, ते एका खासगी एनजीओ संस्थेत प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. या घटनेत मृताची स्कुटी एका ठिकाणी आणि मृतदेह दुसऱ्या ठिकाणी आढळल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, हा प्रकार घातपात आहे की आत्महत्या, अशा दोन्ही बाजूंनी संगमनेर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत पाटील हे गुरुवारी (दि. १५) नेहमीप्रमाणे आपल्या ज्युपीटर स्कुटीवरून (क्र. एम.एच. १८. बी.वाय. ०७७६) कामावर गेले होते. मात्र, दुपारी जेवणासाठी ते घरी परतले…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील पठार भागातील शेळकेवाडी-अकलापूर परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री तब्बल सहा शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पंपांच्या केबल चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी घारगाव पोलिसांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात दीपक प्रताप भोर (वय ४८, रा. शेळकेवाडी अकलापूर) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोर हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या गट नंबर २३ मधील विहिरीवर सहा वर्षांपूर्वी त्यांनी शेतीला पाणी देण्यासाठी पानबुडी इलेक्ट्रिक मोटार बसवली होती. गुरुवारी १५ तारखेला त्यांनी मोटार चालवून संध्याकाळी बंद केली होती. मात्र,…
