Author: अनंत पांगारकर
३७ पैकी थोरात गटाचे २६, विखे गटाचे ९ तर २ ठिकाणी अपक्ष सरपंच महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यामध्ये रविवारी ३७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. मंगळवारी झालेल्या मतमोजणीनंतर तालुक्याचे गाव कारभारी स्पष्ट झाले. तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही संगमनेरची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने नऊ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदी त्यांच्या गटाच्या उमेदवारांना यश मिळाले आहे. मतमोजणीनंतर मिळालेल्या माहितीनुसार 37 पैकी 26 ग्रामपंचायतीमध्ये राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाचे, तर नऊ ग्रामपंचायतीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आणि दोन ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष सरपंचांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज राष्ट्रीय पातळीवरील योगासन स्पर्धेच्या तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी संगमनेरला मिळाली आहे. २६ ते ३० डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत देशातील तीस राज्यांमधून एक हजारावर अधिक स्पर्धक, त्यांचे प्रशिक्षक व राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संगमनेरला पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला असून या माध्यमातून संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांनी दिली. मालपाणी म्हणाले, जिल्हा व राज्य पातळीवरील योगासन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता संगमनेरमध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलात पार पडत आहेत. या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमुळे योगासन स्पर्धेचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज महसूल खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या ‘रिटायर्ड रेव्हून्यू ऑफिसर’ या व्हाट्सअप ग्रुपवरील सदस्यांचा स्नेह मेळावा (गेट-टुगेदर) नुकताच अहमदनगरमध्ये पार पडला. सेवानिवृत्त झालेल्या जवळपास 90 अधिकाऱ्यांनी या स्नेह मेळाव्याला हजेरी लावली होती. सेवानिवृत्त नायब तहसीलदार शशिकांत मरकड यांनी ‘रिटायर्ड रेव्हून्यू ऑफिसर’ या नावाने महसूल खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचा एक व्हाट्सअप ग्रुप केला आहे. या ग्रुपवर अधिकाऱ्यांच्या विचारांची देवाण-घेवाण सुरू असते. यातूनच शालेय विद्यार्थ्यांच्या आणि नंतर नोकरी व्यवसायानिमित्त इतरत्र गेलेले लोक व्हाट्सअपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले. त्यांचे स्नेह मेळावे सुरू झाले. याच पार्श्वभूमीवर सेवानिवृत्तीनंतर एकमेकांच्या संपर्कात असलेल्या या ग्रुपच्या माध्यमातून स्नेहमेळावा घेण्याची कल्पना पुढे आली. लगेचच स्नेह मेळाव्याची तारीख आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील ३७ गावांचे गाव कारभारी ठरविण्यासाठी या गावांमध्ये रविवारी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घुलेवाडी, साकुर, जोर्वे या तुलनेने मोठ्या आणि संवेदनशील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. प्रशासनाने निवडणुकीची संपूर्ण तयारी केली असून शनिवारी रात्रीच निवडणूक कर्मचारी आपापल्या नेमून दिलेल्या केंद्रावर रवाना झाले. रविवारी सकाळीच मतदानास सुरुवात झाली असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे. रविवारी सकाळीच राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कुटुंबीयांसह जोर्वे येथे मतदान केले. निवडणुकीमुळे मतदान होत असलेल्या आणि त्या…
प्रवीण पूरो | रविवार विशेष सत्ता माणसाला जशी लाचार बनवते तशी ती घमेंड चढवते असं म्हणतात. जो या दोन्हीपासून स्वत:ला सावरतो तोच सत्तेवर स्वार होतो. ही सत्ता डोक्यात गेली तर त्याचं हसं होतं. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची स्थिती अशीच काहीशी झाली आहे. गेल्या आठवड्यात पाटलांनी टीव्हीचा पडदा आपल्याकडे खेचून घेतला होता. तो सकारात्मक मुळीच नव्हता. पाटलांमध्ये आलेल्या गुर्मीचा तो आखो देखा हाल होता. स्वत:ला संघाचा पायिक समजला जाणारा माणूस इतका खाली येऊ शकतो, याची लाज संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटेल इतका माजोरडेपणा पाटलांच्या नसानसात भिनलेला जगाने पाहिला. संघाचं लेबल लावलेली माणसं इतकी वाह्यात नसतात,…
महाराष्ट्र संवाद न्यूज बापलेकीच्या नात्याला काळीमा फासत आपल्या अल्पवयीन चौदा वर्षे वयाच्या मुलीवर बापाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माणुसकीला आणि नात्याला काळीमा फासणारी ही घटना नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. यासंदर्भात पीडित मुलीच्या तक्रारीवरून बापाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार, पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापाने दोनदा अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर 15 एप्रिल 2022 रोजी पुणे येथे अत्याचार करण्यात आला. त्यानंतर 12 जून 2022 रोजी सायंकाळी मामाच्या गावी सोडण्यासाठी घेऊन जात असताना कोल्हार घाट बहिरवाडी शिवार (ता. नगर) येथील जंगलात तिच्यावर अत्याचार केला. ही घटना घरी आई आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज धर्मांतराच्या कारणावरून संगमनेरच्या उपनगरामध्ये दोन गटांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. राजकीय हस्तक्षेपानंतर हे प्रकरण शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. दोन्ही गटाच्या आक्रमकतेनंतर शहर पोलिसांनी सामंजस्याचा मार्ग निवडत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रकरण निवळले. शहरातील उपनगरात काही लोकांना हेरून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याच्या संशयावरून काही तरुणांनी धर्मांतर करू पाहणाऱ्या लोकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता धर्मांतर करून घेऊ पाहणाऱ्या आणि त्यांना जाब विचारणारामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला. राहुरी येथील धर्मांतराचे प्रकरण ताजे असतानाच संगमनेर असा प्रकार घडत असल्याच्या समस्यावरून निर्माण झालेला दोन गटातील तणाव बराच काळ सुरू होता. उपनगरामध्ये दुसऱ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या माजी सहसचिव आणि अकोले तालुक्यातील इंदोरी येथील शेतकरी कन्या शर्मिला येवले हिने मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला. येवले यांच्यासोबत आणखी सोळा पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरली असल्याची माहिती मिळते. पक्षांतर्गत असलेल्या मतभेदांवर भाष्य करत येवले यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या दुसऱ्या पक्षात जाण्याची चर्चा सुरू झाली असताना त्यांनी वरून सरदेसाई यांच्या मध्यस्थीनंतर शिवसेनेतच म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात राहण्याला पसंती दर्शविली होती. मात्र त्यानंतर देखील येवले पक्षामध्ये फारशा सक्रिय राहिल्या नाही. मध्यंतरी त्या आपल्या काही सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात…
महाराष्ट्र संवाद न्यूज खंडणीसाठी धान्य व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली होती. नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडाचा शुक्रवारी न्यायालयाने अंतिम निवाडा केला आहे. विशेष मोक्का न्यायाधीश आदिती कदम यांनी आरोपींपैकी दोघाजणांना दोषी ठरविले असून त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर उर्वरित तिघा आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केले आहे. राज्यभर गाजलेल्या बहुचर्चित बाफना हत्याकांडा बाबत नासिक जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती. चेतन यशवंतराव पगारे (वय २५ वर्ष, रा. ओझर टाऊनशिप) व अमन प्रकटसिंग जट (वय २२ वर्ष, रा. केवडीबन, पंचवटी) या दोघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. तर संशयित आरोपी…
महाराष्ट्र संवाद न्यूज भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सार्वजनिक उद्योग विक्रीस काढले आहे. कामगार विरोधी धोरण राबवत असताना सरकारच्या भांडवलदारधार्जिने धोरणामुळे कामगारांनी यापुढील काळात संघर्ष आणि त्यागाची तयारी ठेवली पाहिजेत, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले. संगमनेर तालुका तंबाखू कामगार युनियन व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यावतीने संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे कामगार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर १० व ११ डिसेंबरला पार पडले. कांगो यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. कामगार व शेतकरी यांचे प्रतिक असलेल्या लाल झेंड्याचे ध्वजारोहण करत मानवंदना देण्यात आली. तसेच कॉ. सहाणे मास्तर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत दिप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.…
