Author: अनंत पांगारकर

संगमनेर: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीचे चित्र आता अधिक स्पष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत सोमवारी (दुपारी तीन वाजेपर्यंत) असल्याने आता अवघे काही तास उरले आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी सात अर्ज दाखल झाले होते. महत्त्वाचे म्हणजे, रविवार सुट्टीचा दिवस असूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, आणि या दिवशी १३ इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले. यामुळे आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी एकूण २० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.…

Read More

संगमनेर – संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक आणि आचारसंहितेच्या काळात दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अक्षय दिलीप चिलप यांनी याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात १४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी अडीच वाजता तक्रार दाखल केली. दाखल झालेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने बोगस फेसबुक अकाउंट वापरून ‘Sangamner Politics’ या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून आमदार खताळ यांचा फोटो संपादित करून, बनावट आणि खोटी माहिती असलेली पोस्ट प्रसारित केली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ही पोस्ट पूर्णपणे चुकीची असून ती केवळ राजकीय हेतूने प्रेरित आहे. या पोस्टद्वारे आमदारांची बदनामी करणे, तसेच निवडणुकीच्या आचारसंहितेचे…

Read More

प्रचंड बोलबाला झालेली बिहारची निवडणूक एकदाची पार पडली. अपेक्षेप्रमाणे भाजप आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूला तिथे अनपेक्षित असं यश मिळालं. या दोन्ही पक्षांचं अभिनंदन. मात्र या विजयानंतरही मतचोरीचे प्रश्‍न तसेच आहेत. नव्हे ते अधिक गहिरे बनलेत. देशासह बिहारमध्ये झालेली मतचोरीे दुर्लक्षित करता येणार नाही. कालच्या बिहार निवडणुकीत सुमारे अडीच कोटी मतांची बेरीजच जुळता जुळत नाहीए. 6 आक्टोबरच्या दिवशी निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा या राज्यात 7 कोटी 23 लाख मतदारांची नोंद स्वत: ज्ञानेशकुमार गुप्तांनी जाहीर केली होती. तर अखेरच्या टप्प्याचं मतदान पार पडल्याच्या 11 नोव्हेंबरला आयोगाच्या वेबसाईटवर 7 कोटी 45 लाख मतदारांनी मतदान केल्याचं म्हटलं. मतदार संख्येतच 22 लाखांची तफावत. मतदानाची…

Read More

संगमनेर – म्हाळुंगी पुलाच्या कामातील अडथळ्यांवरून सुरू झालेल्या वादाने आता कायदेशीर वळण घेतले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांना थेट कायदेशीर नोटीस पाठवून १० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.  १५ नोव्हेंबर रोजी प्रकाशित बातमीत सूर्यवंशी यांनी तांबे यांच्यावर काँग्रेस पुरस्कृत आमदाराने म्हाळुंगी पुलाचे काम रखडवले, असा गंभीर आरोप केला होता. या संपूर्ण आरोपाला पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा ठरवत आमदार तांबे यांनी सूर्यवंशी यांना चार दिवसांत आरोप सिद्ध करण्याची किंवा बिनशर्त माफी मागण्याची मुदत दिली आहे. अ‍ॅड. अमोल कारभारी घुले यांच्यामार्फत पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये तांबे यांनी स्पष्ट केले आहे की,…

Read More

मेष (Aries) आजचा दिवस चांगला आहे, पण तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामासाठी छोटी यात्रा करू शकता आणि त्यात यश मिळेल. जर तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून रखडले असेल तर ते आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये आज एखाद्या अधिकाऱ्याशी तुमची थोडी वादावादी होऊ शकते, त्यामुळे शांतता ठेवणे गरजेचे आहे. शुभ उपाय म्हणून गाईंना गूळ खायला द्यावा. वृषभ (Taurus) आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. सर्व बाजूंनी मनःस्थिती चांगली ठेवणाऱ्या घटना आज घडतील. मनासारख्या अनेक ठरलेल्या गोष्टी आज पूर्ण होऊ शकतात. स्वतःला सर्जनशील (Creative) कामात गुंतवून घ्या. मिथुन (Gemini) आजच्या दिवशी क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. तसेच,…

Read More

संगमनेर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावान युवा कार्यकर्ते आणि युवासेना विधानसभा प्रमुख अमोल राजेंद्र डुकरे यांनी संगमनेर नगर पालिका निवडणूकीसाठी शनिवारी, (दि. १५) प्रभाग क्र. १३ (सर्वसाधारण पुरुष गट) मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. डुकरे हे संगमनेर शहराचा मानाचा पहिला गणपती असलेल्या श्री सोमेश्वर रंगारगल्ली मित्र मंडळाचे उपाध्यक्ष असून, माजी नगरसेवक स्व. दत्तात्रय डुकरे (पाथरवट) यांचे नातू आहेत. यामुळे स्थानिक नागरिक व युवा-वयस्कर नागरिकांमध्ये त्यांची चांगली ओळख आहे. अमोल डुकरे पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रम, मोर्चा आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतात. त्यांनी संगमनेर शहर व प्रभाग १३ मधील रंगारगल्ली, चव्हाणपुरा, साळीवाडा, पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा यांसह इतर भागांमध्ये…

Read More

संगमनेर – ग्रामीण भागामध्ये बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याची सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याची माहिती दिली. डिग्रस येथील जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, सरपंच अशोक खेमनर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले की, बिबट्यांकडून हल्ले होण्याच्या वाढत्या घटनांमुळे आणि अनेक विद्यार्थी लांबून एकटे येत असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी शाळांच्या वेळा बदलण्याचा प्रयत्न आहे. याचबरोबर, त्यांनी स्थानिक पातळीवर लांबच्या विद्यार्थ्यांसाठी वाहनाची व्यवस्था करणे आणि ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचा पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यांनी शाळा इमारतीच्या कामाचे कौतुक…

Read More

संगमनेर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत, संगमनेर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नेमलेल्या स्थायी सर्वेक्षण पथकाने (SST) जुन्या महामार्गावरील तपासणी नाक्यावर एका कारमधून तब्बल एक कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१५ नोव्हेंबर २०२५) दुपारच्या सुमारास खांडगावनजीकच्या तपासणी नाक्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली. रायतेवाडीकडून संगमनेरच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर (क्र. MH 25 AS 8851) कारची तपासणी करत असताना, पथकाला एका बॅगेत ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात असलेली एक कोटी रुपयांची रोकड आढळून आली. निवडणुकीमध्ये पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने नेमलेल्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. निवडणुकीच्या काळात एवढी मोठी…

Read More

संगमनेर – संगमनेर नगर परिषद निवडणुकीसाठी अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी प्रभाग क्रमांक ११ ब मध्ये शेहबाज शेख या एकमेव उमेदवाराचा अर्ज दाखल झाला होता तर मंगळवारी नगराध्यक्षपदासह सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एकूण उमेदवारांची संख्या आठवर गेली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.साधारणत: वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर संगमनेरच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले असून आता नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर ‘हॉट’ बनले आहे. यामुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले असून अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार जाहीर झाल्या नसल्याने व उमेदवारी अर्ज…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी “संगमनेरमध्ये दररोज दिवसातून दोन वेळा पाणी येतं, जे संगमनेरला जमलं ते कोपरगावला का नाही?” कोपरगाव शहरात लागलेल्या या थेट फलकांनी सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू केली आहे. राजकारणात अनेकदा ४० वर्षात काय केलं, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातो. मात्र, संगमनेरच्या पाणी प्रश्नाची कायमस्वरूपी सोडवणूक करणाऱ्या आणि शहराला ‘टँकरमुक्त’ करणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्या कार्याची पोचपावती खुद्द कोपरगावच्या नागरिकांनीच दिल्याचं चित्र आहे. यामुळे संगमनेरची ही अभूतपूर्व पाणी योजना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. संगमनेर म्हणजे ‘पाण्याची राजधानी! – महाराष्ट्रातील अनेक शहरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. रात्री-अपरात्री पाणी येणं, मातीमिश्रित किंवा अस्वच्छ पाणी मिळणं ही समस्या नित्याची आहे.…

Read More