Author: अनंत पांगारकर
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील तांडा वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांनी केलेल्या मागणीनुसार, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी इतर मागास प्रवर्ग व बहुजन कल्याण मंत्री, अतुल सावे साहेब यांच्याकडे संगमनेर तालुक्यातील विविध कामांना मंजुरी देऊन निधीची तरतूद करण्याची विनंती केली होती. स्थानिक नागरिकांकडून वारंवार विकासकामांची मागणी होत असल्याने, तांबे यांनी ही महत्त्वपूर्ण मागणी शासनाकडे केली होती. तांबे यांनी एकूण ३३…
संगमनेर – एकेकाळी ‘एअरपोर्ट’ म्हणून राज्यात गौरवपूर्ण उल्लेख होणारे आणि संगमनेर शहराचे वैभव असलेले हायटेक बसस्थानक मागील वर्षभरापासून अनाधिकृत फ्लेक्सबाजीच्या विळख्यातून अखेर मुक्त झाले आहे. शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही हतबल ठरलेल्या पालिका प्रशासनाला जे जमले नाही, ते राज्य निवडणूक आयोगाने लावलेल्या आचारसंहितेमुळे साधले. आचारसंहिता लागू होताच रातोरात हे सर्व फ्लेक्स हटले आणि तब्बल एक वर्षानंतर संगमनेरच्या या देखण्या बसस्थानकाने मोकळा श्वास घेतला आहे. वर्षभर फ्लेक्सचा विळखा आणि प्रशासनाची ‘हतबलता’- लोकनेते तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे हायटेक बसस्थानक शहराची ओळख आणि अभिमान आहे. प्रशस्त जागा, शॉपिंग कॉम्प्लेक्स, आधुनिक इमारत आणि आकर्षक प्रवेशद्वार यामुळे हे ठिकाण…
संगमनेर – शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून, त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढून ट्रॅक्टर खरेदी करायचे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना गंडा घालून ते ट्रॅक्टर परस्पर विक्री करणाऱ्या दोघांना श्रीरामपूर पोलिसांच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने जेरबंद केले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. या कारवाईत पोलिसांनी भालचंद्र अशोक साळवी (रा. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) व अभिजीत सुनील भांडवलकर (रा. सिव्हिल हडको अहिल्यानगर) दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ९ ट्रॅक्टर आणि २ मोटारसायकल असा एकूण ७१ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अन्य शेतकऱ्यांची मोठी फसवणूक टळली आहे. भालचंद्र…
अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शासकीय निकषांनुसार निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकीस मंजुरी देणारे आदेश नुकतेच जारी केले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर निवडणुकीची मोठी जबाबदारी… निवडणुकांचे सर्व कामकाज शांततेत, पारदर्शकतेने आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासकीय सेवेतील अनुभवी अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी यांचा समावेश आहे. हे नियुक्त अधिकारी निवडणुकीदरम्यान राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करतील. जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक…
मेष (Aries) – आज तुम्हाला संयम आणि धीराने काम करावे लागेल, ज्यामुळे कठीण समस्यांवरही सहज उपाय मिळू शकेल. कुटुंबाशी संबंधित कामासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे. कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सरकारी कामांमध्ये चांगल्या वकिलाचा सल्ला घ्यावा लागेल. वृषभ (Taurus) – आज तुम्हाला घर आणि कामाच्या जगातून बाहेर पडून निसर्गाचा आनंद घ्यावासा वाटेल. जुन्या मौल्यवान वस्तूंसाठी केलेले सौदे फायदेशीर ठरतील. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठीही आजचा दिवस चांगला आहे. काही खर्चाचा सामना करावा लागेल. मिथुन (Gemini) – व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचे काम अत्यंत काळजीपूर्वक करा आणि इतरांची मदत घ्या. तुम्ही नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता. अनावश्यक वादात अडकणे…
मुंबई – अखेर संगमनेरसह राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (४ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करताच राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, दुसऱ्याच दिवशी ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. या प्रक्रियेद्वारे एकूण ६,८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारांना १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या दरम्यान अर्ज दाखल करता येतील. दाखल अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल, तर माघारीची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त…
संगमनेर – संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र नरसिंह देशमुख यांची कार्यकाल पूर्ण होण्याआधीच बदली करण्यात आली आहे. देशमुख यांच्या बदलीमुळे संगमनेरमध्ये सुरू असलेला वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांच ग्रहण अद्यापही सुरूच आहे. देशमुख गेल्या काही दिवसापासून बदलीसाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा अखेरीस पूर्णत्वास आली आहे. देशमुख यांच्या रिक्त जागेवर पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशमुख यांची बदली अहिल्यानगरच्या ए. एच. टी. यु. या शाखेकडे करण्यात आली असून त्यांच्याकडे पोलीस उपाधीक्षक (मुख्यालय) अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सहा पोलीस निरीक्षक व तिघा सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत केलेल्या अधिकाऱ्यांच्या विनंती…
नान्नज दुमाला-पिंपळे परिसरासाठी मंजूर उपसा जलसिंचन योजनांवरील स्थगिती तातडीने रद्द करण्याची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी संगमनेर – निळवंडे धरणाचे काम जनतेने विसरावे म्हणून भोजापूर चारीचा बोलबाला केला जात असल्याची टीका काँग्रेस नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तसेच, त्यांनी नान्नज दुमाला, पिंपळे परिसरासाठी मंजूर केलेल्या उपसा जलसिंचन योजनांवरील स्थगिती तातडीने रद्द करून कामे सुरू करण्याची मागणी केली आहे. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्याचे स्वप्न जनता खूप दिवसांपासून ऐकत आहे, असेही ते म्हणाले. पिंपळे येथे विविध सहकारी सेवा सोसायटीच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. यावेळी जिल्हा बँकेचे माधवराव कानवडे, पांडुरंग पाटील…
संगमनेर – संगमनेर शहरात उघडकीस आलेल्या ड्रग्स इंजेक्शन विक्री प्रकरणासंदर्भात राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र (RGSS) या संघटनेने कठोर भूमिका घेत पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे व संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांना एक निवेदन देत या देशविघातक कृत्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी सध्या सुरू असलेल्या तपासात आणखी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संगमनेर शहरात ‘एम.आर. व्हिटॅमिन सप्लिमेंट शॉप’ नावाच्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी वापरली जाणारी औषधे (मेफेनटर्माइन सल्फेट इंजेक्शन्स) विकणाऱ्या आदित्य किशोर गुप्ता याला अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत २.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात राजकीय…
संगमनेर – अवैध धंद्यामुळे आधीपासूनच चर्चेत असलेल्या संगमनेरमध्ये थेट नशेच्या इंजेक्शनची होणारी विक्री समोर आल्यानंतर आता सोमवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजासारखा अमली पदार्थ जवळ बाळगून त्याची चोरटी विक्री करणाऱ्या एका आरोपीला जेरबंद करण्यात यश आले आहे. या संदर्भात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यामध्ये संगमनेरमध्ये पोलिसांनी राबविलेल्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये नशेचे इंजेक्शन्स विक्री होत असल्याचे समोर आले होते. आदित्य किशोर गुप्ता याला पोलिसांनी पकडल्यानंतर या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन आणि पोलिसांवर मोठा राजकीय दबाव आल्याचे समोर आल्याने हा विषय शहरात चर्चेचा विषय ठरला. दबावानंतरही पोलिसांनी केलेली कारवाई शहरात कौतुकाचा विषय ठरली होती. गेल्या काही…
