Author: अनंत पांगारकर

उपजिल्हाप्रमुख पदी मुजीब शेख; शिर्डी लोकसभा जिल्हा संघटक आप्पा केसेकर; तालुका प्रमुखपदी भाऊसाहेब हासे यांच्या निवडी जाहीर महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी यांची पाचव्यांदा तर उपनगर शहर प्रमुखपदी प्रसाद पवार यांची दुसऱ्यांदा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय उप जिल्हा प्रमुखपदी मुजीब शेख, शिर्डी लोकसभा जिल्हा संघटक आप्पा केसेकर, तालुका प्रमुखपदी भाऊसाहेब हासे यांच्या देखील निवडी जाहीर झाल्या आहेत. संगमनेरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी बदलण्यासाठी अंतर्गत वारे वाहत होते. यासाठी अनेकांनी देव पाण्यात टाकले, मात्र नव्या निवडी जाहीर झाल्याने या सर्वांच्या पदरी निराशा पडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेनेत राहून देखील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांच्याशी सलगी ठेवणाऱ्या तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांची तालुकाध्यक्षपदावरून गच्छंती करण्यात आली आहे. आहेर यांच्या जागेवर उपजिल्हाप्रमुख असलेल्या भाऊसाहेब हासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून एक मोठा गट घेऊन बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे दोन गटात विभाजन झाले. त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने हा लढा थेट न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव देखील तात्पुरत्या स्वरूपात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गोठविले गेल्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते देखील दोन गटात विभागले गेले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारतीय सैन्य दलाच्या तोफखाना केंद्राच्या २८५ मिडीयम रेजिमेंटचे लान्सनायक आणि नाशिकचे भूमिपुत्र संतोष विश्वनाथ गायकवाड यांना आसाममध्ये वीरमरण आले आहे. सर्वत्र दीपावलीचा सण उत्साहात व आनंदात साजरा होत असताना गायकवाड कुटुंबीयांसह नाशिकवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गायकवाड यांचे पार्थिव नाशिकरोडच्या तोफखाना केंद्रात रात्री बारा वाजेपर्यंत येण्याची शक्यता लष्कराने वर्तवली आहे. शहीद गायकवाड यांच्या लहवित गावी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. वीरमरण आलेले गायकवाड सिक्कीमच्या उत्तरेला आसाम राज्यातील होजाई जिल्ह्यात लंका शहराजवळ बर्फाळ प्रदेशात कर्तव्यावर असताना रक्त गोठविणाऱ्या थंडीमुळे त्यांना अचानक मेंदूमध्ये त्रास झाला. त्यांना रेजिमेंट कडून तात्काळ कोलकत्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाभारताचे युद्ध पांडवांनी जिंकले याचे कारण त्यांचा सल्लागार कृष्ण होता. आपल्या जीवनामध्ये आर्थिक नियोजनासाठी आणि आपले ध्येय प्राप्त करण्याकरता तज्ज्ञ सल्लागार असेल तरच ते ध्येय साध्य होईल, असे प्रतिपादन आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञ सुनील कडलग यांनी केले. येथील औद्योगिक वसाहतीमधील सह्याद्री ऍग्रोव्हेेटतर्फे कामगारांच्या जीवनामध्ये आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शन मेळावा म्हणून ‘चला अर्थसाक्षर होऊयात’ हा उपक्रम राबवण्यात आला. त्यावेळी कडलग बोलत होते. अध्यक्षस्थानी सह्याद्री ॲग्रोव्हेटचे संचालक नितीन हासे होते. व्यासपीठावर धनश्री हासे, टीव्ही अभिनेते सुरेश डोंगरे आदी उपस्थित होते. कडलग म्हणाले, जीवनामध्ये सल्लागाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या जीवनात मुला-मुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न, आपली सेवानिवृत्ती आणि जीवनामधील अल्पकालीन व दीर्घकालीन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान तक्रारदारा विरोधात आणखी गुन्हे दाखल आहेत का याची चौकशी करून न्यायालयात अहवाल देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिविक्षा अधिकारी महेश अनंतराव पाटील यांना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. पाटील यांच्या विरोधात नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथील तक्रारदाराविरोधात २०२० मध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.न्यायालयाने या तक्रारदारा विरोधात आणखी काही गुन्हे दाखल आहेत का याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिविक्षा अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शहरालगतच्या समनापुर बायपासवर शहर पोलिसांनी एका संशयास्पद टेम्पोमधून सुमारे दोन लाखाचे गोमांस ताब्यात घेतले आहे. टेम्पो आणि गोमांस असा सुमारे नऊ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून ऐन दिवाळीतही शहरातील कत्तलखाने सर्रासपणे सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संगमनेरातील गोहत्या थांबणार कधी? असा प्रश्न गो प्रेमींनी उपस्थित केला आहे. गोवंश कत्तलीचे संगमनेर हे राज्यातील सर्वाधिक मोठे केंद्र म्हणून समोर येत आहे येथील बेकायदेशीर कत्तलखान्यांमध्ये सर्रासपणे जनावरांचे हत्या करून त्यांचे मांस राज्यासह देशाच्या विविध भागात पाठविले जाते. वारंवार होणाऱ्या पोलिसांच्या कारवाया आणि यातून बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात हाती लागणारा मुद्देमाल, यामुळे येथील कत्तलखाण्याची महती लक्षात येते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आता सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस केली तर त्यांना थेट सेवेतून डिसमिस केले जाणार आहे. प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी हा शेवटचा इशारा असेल, रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा आणि हेळसांड सहन केली जाणार नाही असे सांगत डॅशिंग आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.धडाकेबाज निर्णय आणि कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी डॅशिंग अधिकारी म्हणून नावलौकिक असलेल्या तुकाराम मुंढे यांनी आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा पदभार घेताच पुन्हा एकदा धडाकेबाज निर्णयांना सुरुवात केली आहे. याची प्रचिती त्यांच्या मराठवाड्यातील दौऱ्यात आली आहे. आरोग्य विभागाचा पदभार हाती घेतल्यानंतर मुंढे मराठवाड्यातील बीडच्या जिल्हा रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेस अध्यक्षपदी वर्णी लागतात मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसमध्ये धक्कादायक निर्णयांना सुरुवात केली आहे. पदभार हाती घेताच त्यांनी काँग्रेसचा आत्मा समजली जाणारी काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) बरखास्त करीत नवी सुकाणू समिती जाहीर केली. काँग्रेसच्या नव्या सुकाणू समितीत अनेक बड्या नेत्यांना दूर ठेवण्यात आले असल्याचे दिसते. नव्या वर्किंग कमिटीमध्ये महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता काँग्रेसमध्ये आहे. या समितीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा खासदार सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना स्थान देण्यात आले आहे. जोपर्यंत काँग्रेसची नवी कार्यकारिणी स्थापन होत नाही तोपर्यंत पक्षाचे कामकाज या सुकाणू समितीच्या माध्यमातून चालणार आहे. नवीन समिती सहजपणे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुस्तकांचं गाव भिलार (महाबळेश्वर) येथे शनिवारी (२९ ऑक्टोबर) होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते होणार असून अधिवेशनाच्या अध्यक्षपदी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील तर स्वागताध्यक्षपदी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, स्वागत कार्याध्यक्षपदी सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे उपस्थित राहणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक ,अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी संघटनेच्यावतीने राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिल्या जाणाऱ्या “महाराष्ट्र महागौरव” पुरस्कारांची घोषणा करण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सर्वत्र दीपावली पाडव्याच्या सण उत्साहात साजरा होत असताना संगमनेर तालुक्यातील साकुरमधून दुःखद घटना समोर आली आहे. सातपूर नजीक पिंपळगाव देपा गावात झालेल्या दुचाकी आणि छोटा हत्ती टेम्पोच्या अपघातात मोटरसायकलवरील दोघा तरुणांचा मृत्यू झाला.ओम राहूल पेंडभाजे (वय १९ वर्ष) व शुभम सदाश‍िव टेकुडे (वय १८ वर्ष, दोघे रा. देवगिरी वस्ती, साकूर, ता. संगमनेर) अशी अपघातात ठार झालेल्या दोघा तरूणांची नावे आहेत. घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास साकुरहून मोटार सायकलवर हे दोघे तरुण संगमनेरच्या दिशेने येत असताना संगमनेरकडून साकुरच्या दिशेने जाणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोने या तरुणांच्या दुचाकीला पिंपळगाव देपा गावाच्या शिवारात जोराची धडक दिली.अपघातानंतर…

Read More