Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी- कृषी क्षेत्र हे अत्यंत व्यापक असून यामध्ये संशोधनासह आर्थिक समृद्धीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रातील नवनवीन माहितीसाठी ‘कळस कृषी प्रदर्शन’ हे संपूर्ण राज्यात लोकप्रिय ठरले असून, अमृतवाहिनीतील या प्रदर्शनाच्या माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्यावतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आयोजित ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाचे’ शानदार उद्घाटन थोरात यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, थोरात कारखान्याचे उपाध्यक्ष…
संगमनेर, प्रतिनिधी- तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायतीचा अत्यंत बेजबाबदार आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. गावाच्या स्वच्छतेसाठी शासनाकडून आलेली लाखो रुपयांची घंटागाडी गेल्या चार वर्षांपासून एका गोदामात सडत पडली असतानाच, याच गोदामात आपल्या देशाच्या महापुरुषांचे फोटो अत्यंत विदारक आणि अपमानस्पद अवस्थेत फेकल्याचे समोर आले आहे. थेट व्हिडिओ पुराव्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभाराचे वाभाडे निघाले असून संपूर्ण तालुक्यातून संतापाची लाट उसळली आहे. गावातील घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यासाठी जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून शिबलापूर गावाला लाखो रुपये किमतीची घंटागाडी देण्यात आली होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही गाडी नागरिकांच्या सेवेत येण्याऐवजी एका खासगी गोदामाची शोभा वाढवत आहे. गावात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असताना सरकारी मालमत्तेची…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीचा आणि मेहनतीचा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे, जी तुम्ही आत्मविश्वासाने पूर्ण कराल. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर जुनी देणी फेडण्यात तुम्हाला यश येईल आणि गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः डोळ्यांच्या तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे सततच्या कामातून विश्रांती घेणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्याने मानसिक ताण कमी होईल. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कौटुंबिक सौख्याचा असेल. घरातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबत असलेले छोटे-मोठे मतभेद संपुष्टात येतील. व्यवसायात भागीदारीत काम करणाऱ्यांनी व्यवहारात पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात गैरसमज होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात…
संगमनेर, प्रतिनिधी- निवडणुकीच्या काळात ‘लाडकी बहीण’ म्हणत मतांची बेगमी करणाऱ्या महायुती सरकारने आता आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली असून संगमनेर तालुक्यातील तब्बल १७,९६७ महिलांना या योजनेतून अपात्र ठरवत डच्चू दिला आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यात महायुती सरकारबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली असून, निवडणुकीपुरता बहिणींचा वापर करून आता सरकारने विश्वासघात केला आहे, अशी घणाघाती टीका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चनाताई बालोडे यांनी केली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील विकसित तालुका असलेल्या संगमनेरमध्ये, जनतेला सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालय नेहमीच अग्रेसर असते. याच भावनेतून यशोधनच्या यंत्रणेने रात्रंदिवस काम करून तालुक्यातील सुमारे ९० हजार महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेरच्या स्थानिक राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे यांनी 2.0 च्या माध्यमातून आगामी काळातील विकासाचे रणशिंग फुंकले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपालिकेच्या नव्या कारभाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अधिकृत प्रक्रियेत नगरसेविका दिपाली पंचारिया यांची संगमनेर नगरपालिका गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेमध्ये ‘संगमनेर सेवा समिती’ने मोठे यश मिळविले आहे. 30 पैकी तब्बल 27 नगरसेवक सेवा समितीचे निवडून आले आहे. तर महायुतीची केवळ एकमेव महिला विजयी झाले आहे. उर्वरित दोन अपक्ष उमेदवार सेवा समितीचे…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. म्हाळुंगी नदीवर वेल्हाळे गावठाण ते राजापूर रस्ता ते निमगाव भोजापूर रस्ता, गणपती मळ्याजवळ जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामासाठी नाबार्ड ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाच्या कामामुळे घुलेवाडी आणि धांदरफळ गटातील वेल्हाळे, राजापूर, निमगाव भोजापूर, गुंजाळवाडी आणि चिकणी या पंचक्रोशीतील नागरिकांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. आमदार खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे या कामासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला…
श्रीरामपूर – श्रीरामपूर विभागातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गहाळ झालेले सुमारे ६ लाख रुपये किमतीचे ५२ मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कामगिरी केली असून, जप्त केलेले सर्व मोबाईल आज त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. अहिल्यानगर उत्तर विभागातील १७ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही काळात नागरिकांचे महागडे मोबाईल गहाळ झाले होते. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल होत्या. या तक्रारींचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाने तांत्रिक तपास सुरू केला होता. या तपासामध्ये श्रीरामपूर शहर, राहुरी, अकोले, संगमनेर आणि…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज विविध अवैध धंद्यांनी वेढलेल्या संगमनेरमध्ये आता गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सांगवी गावातील ‘हॉटेल रानवारा’ येथे सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या (IG) पथकाने थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. या धडक कारवाईत १७ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याकडून ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवून झालेल्या या कारवाईमुळे तालुक्यातील पोलीस प्रशासनाचे अक्षरशः ‘पितळ’ उघडे पडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे, त्या आरोपींची नावे अशी, अंकुश मधुकर…
संगमनेर, प्रतिनिधी- अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून थोरात सहकारी साखर कारखान्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जन्मदिवस ‘प्रेरणा दिन’ म्हणून संपूर्ण संगमनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कारखान्याच्या अतिथीगृहात अर्पण रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत १०१ बाटल्या रक्ताचे संकलन केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, विज्ञानाने आज सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली असली, तरी रक्ताची कृत्रिम निर्मिती करणे अद्याप मानवाला शक्य झालेले…
श्रीरामपूर – पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी श्रीरामपुरातील वॉर्ड नं. १, इराणी गल्ली परिसरात आलेल्या पोलीस पथकावर हिंसक जमावाने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. जमावाने दगडफेक करत आरोपीला पोलिसांच्या ताब्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला, तसेच एका तरुणाने लोखंडी कोयत्याने पोलिसांवर वार केले. परिस्थिती अत्यंत गंभीर बनल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी हवेत एक राऊंड गोळीबार केला. या घटनेत एक पोलीस हवालदार गंभीर जखमी झाला असून परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तळेगाव दाभाडे (पुणे) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी आयद बाबूलाल सय्यद (रा. इराणी गल्ली, श्रीरामपूर) हा पोलिसांना हवा होता. त्याचा शोध घेण्यासाठी उपनिरीक्षक मुकेश मोहरे,…
