Author: अनंत पांगारकर

मुंबई, विशेष प्रतिनिधी राज्य शासनाने आज प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करत भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) १० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. या नव्या नियुक्त्यांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयापासून ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. या फेरबदलात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असलेल्या अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली असून, देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या त्या नवीन प्रमुख असतील. याचसोबत कृषी आणि पदुम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागात अतिरिक्त मुख्य…

Read More

शिर्डी, विशेष प्रतिनिधी-  महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा खरात याचा आणखी एक नवा कारनामा समोर आला आहे. यामुळे खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिर्डी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करत बेकायदेशीर सावकारी प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी कॅप्टन अशोककुमार एकनाथ खरात, त्यांची पत्नी कल्पना खरात आणि इतर तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी यातील दोन आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३ पासून शिर्डी, नाशिक आणि राहाता परिसरात हा जमीन व्यवहाराचा घोळ सुरू होता. पीडित व्यक्तीला पैशांची गरज असताना कॅप्टन अशोककुमार खरात याने दरमहा दोन टक्के व्याजाने पैसे…

Read More

नाशिक – नाशिक येथील स्वयंघोषित महाराज अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचे एकामागून एक धक्कादायक पैलू समोर येत असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा अशा गंभीर आरोपांखाली सध्या तो पोलीस कोठडीत असून एसआयटीमार्फत या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, खरातच्या भक्तांमध्ये केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर बडे सरकारी अधिकारी, उद्योजक आणि राजकारण्यांचाही समावेश होता. अशोक खरात हा आपल्या श्रीमंत भक्तांच्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी जाण्यासाठी अव्वाच्या सव्वा फी वसूल करत असे. केवळ एका ‘आऊटडोअर व्हिजिट’साठी तो चक्क ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम उकळत असल्याचे उघड झाले आहे. जो भक्त जास्त पैसे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातून संगमनेर तालुक्यात समृद्धी निर्माण झाली असून हा तालुका आता दुधाचा तालुका म्हणून ओळखला जात आहे. आगामी काळात पंजाबप्रमाणे दुग्ध क्षेत्रात क्रांती करण्याकरता रणजीतसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘मिशन ५० लिटर’ क्षमतेच्या गाईंच्या निर्मितीमुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती होईल, असे गौरवोद्गार पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांनी काढले आहेत. तर पशुपालकांनी आगामी काळात ‘कमी गाई जास्त दूध’ हे सूत्र वापरावे, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.सोमवारी वसंत लॉन्स येथे संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने आयोजित ‘मिशन ५० लिटर’ दुग्ध क्रांती कार्यशाळेत ते बोलत होते.…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी सोमवारी सकाळी धांदरफळ, डेरेवाडी, निमज यांसह विविध गावांतील नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसलेल्या या भागातील महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विलंब न लावता तातडीने सरसकट पंचनामे पूर्ण करावेत, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल, असे स्पष्ट निर्देश आमदार खताळ यांनी यावेळी प्रशासनाला दिले. तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, डेरेवाडी, गोडसेवाडी, निमज आणि राजापूर या गावांमध्ये गारपिटीने गहू, कांदा, टोमॅटो, मका आणि डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले असून उभी पिके जमिनीदोस्त झाली…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे घडलेल्या बहुचर्चित खुनाच्या घटनेतील आरोपींना न्यायालयाने अखेर शिक्षा सुनावली आहे. सोमवारी न्यायालयाने मुख्य आरोपीला जन्मठेप तर अन्य दोघांपैकी एका आरोपीला दहा वर्षाची सक्त मजुरी व तिसऱ्या आरोपीला दहा वर्षे साध्या कैदेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. या खटल्याची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, २२ जून २०२० रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वडगावपान येथील फिर्यादी प्रतीक बाबासाहेब चत्तर यांच्या ‘कमळेश्वर चिकन शॉप’वर ही घटना घडली होती. आदल्या दिवशी झालेल्या भांडणावरून पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपी राहुल देविदास काळे, देविदास हरिभाऊ काळे आणि रामनाथ सावित्रा गायकवाड हे तेथे आले होते. त्यांनी फिर्यादीचे वडील बाळासाहेब चत्तर यांना…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षाने केलेल्या फसवणुकीचे प्रकरण तालुक्यात चांगले चर्चेत आले असून सोमवारी न्यायालयाने संस्थापक अध्यक्ष मधुकर बादशहा वाळे याच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली तर त्याची संचालक पत्नी आणि पतसंस्थेचे महिला व्यवस्थापक यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मुख्य आरोपीच्या कोठडीत वाढ झाल्याने पोलीस चौकशीतून काय समोर येते याकडे लक्ष लागले आहे. कर्ज देण्याच्या बहाण्याने एका अनुसूचित जातीच्या कुटुंबाची जमीन हडपण्याचा प्रकार समोर आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने संगमनेर तालुक्यातील झोळे येथील कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षाने आपल्या पदाचा गैरवापर करून बनावट कागदपत्र आधारे फसवणूक केल्याप्रकरणी संचालक मंडळाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फसवणूक,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- रविवारी संगमनेर तालुक्यातील पश्चिम भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. याचबरोबर अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला याचबरोबर सरकारने तातडीने पंचनामे करून सर्व नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी अशी आग्रही मागणी केली. निमज, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी बाळासाहेब थोरात यांनी केली. यावेळी समवेत अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, अनिल काळे, बाळासाहेब देशमाने, अरुण गुंजाळ, सागर डोंगरे, मंगेश मतकर, रमेश गुंजाळ, विजय राहणे, दत्तू…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा राहील. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनाला उभारी मिळेल. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे कठीण निर्णय घेणे सोपे जाईल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ: आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील, मात्र घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. मिथुन: आज आपणास आपल्या बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल, अन्यथा विनाकारण वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढू शकतो, परंतु संयमाने परिस्थिती हाताळल्यास यश नक्की मिळेल. कर्क: कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. नवीन वस्तू किंवा वाहन खरेदीचे योग जुळून…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्याचा भौगोलिक विस्तार मोठा असून पठार भाग, प्रवरा पट्टा आणि तळेगाव पट्टा अशा तीन विभागांत हा तालुका विभागलेला आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशामुळे तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असून, उन्हाळ्याची तीव्रता वाढताच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत शासनाच्या मदतीची प्रतीक्षा न करता, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून टंचाईग्रस्त ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे. एक कुटुंबप्रमुख म्हणून जनतेच्या अडीअडचणीला धावून जाण्याची आपली परंपरा थोरात यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा जपली आहे. संगमनेर तालुक्यासह उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांसाठी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, या…

Read More