Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा पारा आणि भारतीय हवामान खात्याने दिलेला उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी १८ एप्रिल २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. या नव्या निर्णयानुसार, आता जिल्ह्यातील शाळा उन्हाळी सुट्टी लागेपर्यंत सकाळी ७ ते ११ या वेळेतच भरवल्या जाणार आहेत. जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली असून, उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना या उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय…
आश्वी, प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा आपल्या दहशतीचा प्रत्यय दिला असून, आज सकाळी शेतात काम करणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून, एकाच वस्तीवर बिबट्याने हल्ला करण्याची ही चौथी वेळ असल्याने वनविभागाच्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आश्वी बुद्रुक येथील खेमनर वस्तीवरील गट नंबर २३१ मध्ये सुमनबाई बाळासाहेब खेमनर या आज शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जनावरांसाठी घास कापण्याचे काम करत होत्या. याच दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने सुमनबाई यांच्या मानेवर आणि हातावर खोलवर जखमा केल्या. संकटाच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक: लग्नाचे खोटे आमिष दाखवून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी नाशिकच्या सिडको आणि सातपूर पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत सिडको परिसरातील एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून संशयित आरोपी अर्शील साबीर मन्सूरी याने लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर हॉटेल डेमॉक्रसी येथे नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. इतकेच नव्हे तर आरोपीने पीडितेचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून तिला धमकावले आणि तिच्याकडील सोन्याची चैन व कानातील दागिने जबरदस्तीने काढून घेतले. या गुन्ह्यात अर्शील मन्सूरीला मदत करणाऱ्या दीपक, हिमांशू, नितेश आणि प्रथमेश या त्याच्या साथीदारांविरुद्धही एमआयडीसी…
मुंबई, विशेष प्रतिनिधी राज्यात बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असून या रॅकेटमध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी दत्ता कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि सोमनाथ घार्गे यांचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मुंबईतील गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी पुराव्यांसह मांडलेल्या माहितीनुसार, आयपीएस अधिकारी दत्ता कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि सोमनाथ घार्गे यांचा या ऑनलाइन फसवणूक रॅकेटमध्ये सहभाग आहे. मंत्रालयातील उच्चपदस्थांच्या आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशांची हेराफेरी होणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपी पतीसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयाने उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तिघे अद्याप फरार आहेत. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी केवळ १३ वर्षे ४ महिन्यांची असताना आरोपींनी संगनमत करून तिचा विवाह लावून दिला होता. पीडितेचे वय कमी असल्याचे माहित असतानाही तिच्या संमतीविना हा विवाह पार पडला आणि त्यानंतर तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आले. या…
मुंबई, विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ९ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, राज्याच्या राजकीय वर्तुळात आता खऱ्या अर्थाने हालचालींना वेग आला आहे. पुढील महिन्यात म्हणजेच मे २०२६ मध्ये या जागा रिक्त होत असून, त्यासाठी आयोगाने १२ मे २०२६ ही मतदानाची तारीख निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी सकाळी मतदान पार पडल्यानंतर सायंकाळी ५ वाजता निकालही जाहीर केला जाणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या एकाच दिवसाकडे लागले आहे. येत्या १३ मे रोजी विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अमोल मिटकरी, शशिकांत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्यानंतर सासरी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची मुकींदपूर (नेवासा फाटा) येथील आहे. ती अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्या आई-वडिलांनी आणि एका मध्यस्थाने संगनमत करून तिचा विवाह शिंदोडी (ता. संगमनेर) येथील एका तरुणाशी लावून दिला होता. हा विवाह सन २०२४ मध्ये झाला…
महाराष्ट्र संवाद न्यूज, संगमनेर: अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या संगमनेर शाखेच्यावतीने रविवारी (१० मे) शहरात एका विशेष विनामूल्य कथाकथन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल देशपांडे यांनी दिली आहे. सह्याद्री महाविद्यालयातील के.बी. दादा देशमुख सभागृहात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ही कार्यशाळा होणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून संगमनेरकर नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कथाकथन क्षेत्रातील बारकावे शिकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या कार्यशाळेत पुणे येथील अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला संचलित सानेगुरुजी कथाकथन प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष शामराव कराळे, अपर्णा निरगुडे आणि रमेशराव काळे हे अनुभवी मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. या प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कथा निवेदक कसा तयार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर शहरातील चावडीवरील तलाठी कार्यालयात सुरू असलेला गंभीर गैरप्रकार आमदार अमोल खताळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उघडकीस आणला आहे. या कार्यालयात दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांची अडवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळले जात असल्याची तक्रार एका महिलेने व्हाट्सअप मेसेजद्वारे आमदारांकडे केली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत आमदार खताळ यांनी तातडीने कार्यालयाला भेट दिली असता, त्याठिकाणी धक्कादायक परिस्थिती पाहायला मिळाली. शासकीय कर्मचारी उपस्थित नसताना मन्सूर शेख आणि त्यांचा जावई या खाजगी व्यक्ती तेथे बसून अधिकृत कागदपत्रांची हाताळणी करत असल्याचे दिसून आले. यावेळी आमदारांनी संबंधित व्यक्तींना चांगलेच धारेवर धरत त्यांच्या अधिकारांबाबत जाब विचारला. शासकीय कामकाजात खाजगी व्यक्तींचा अशा प्रकारे…
मुंबई, विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रशासकीय स्तरावर पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नवीन आदेश जारी केले आहेत. या नव्या फेरबदलांनुसार डॉ. बी.एन. पाटील यांची नियुक्ती ‘रुसा’च्या प्रकल्प संचालकपदी, तर मंगेश जोशी यांची नियुक्ती पर्यटन संचालक म्हणून करण्यात आली आहे. याशिवाय कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी, कुशल जैन यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आणि रेवैया डोंगरे यांची केळापूर उपविभागात यवतमाळ येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून वर्णी लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांत राज्य सरकारने ४० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असल्या, तरी यामध्ये तुकाराम मुंढे यांची बदली सर्वाधिक चर्चेची ठरली आहे. दिव्यांग कल्याण विभागात पारदर्शक कारभार करत…
