Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी-  ग्रामीण भागात आणि वनक्षेत्राच्या लगत राहणाऱ्या नागरिकांसाठी बिबट्याचा वावर हा आता केवळ भीतीचा विषय उरला नसून तो जीवघेणा ठरत आहे. शेतकरी, महिला आणि लहान मुले बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमावत असताना, शासन केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहे का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. संगमनेर तालुक्यातील अभियंता किरण सोमनाथ मैंदड यांनी या गंभीर प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत थेट मुख्यमंत्र्यांपासून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ई-मेलद्वारे निवेदन धाडले आहे. तंत्रज्ञान असतानाही दिरंगाई का?- आजच्या आधुनिक काळात जिथे आपण प्रगत तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रांत करत आहोत, तिथे वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची पूर्वसूचना देण्यासाठी ‘कॅमेरा ट्रॅप्स’ आणि ‘मोशन सेन्सर’ यांसारख्या साध्या यंत्रणेचा वापर…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. भावंडांच्या मदतीने महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, मात्र घाईघाईत निर्णय घेणे टाळा. वृषभ: आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस फायदेशीर आहे. तुमची वाणी प्रभावी राहील, ज्यामुळे कठीण कामेही सुलभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि संध्याकाळी एखाद्या समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल. मिथुन: चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आज तुमची कल्पनाशक्ती विस्तारलेली असेल. नवीन विचार आणि योजना अंमलात आणाल. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही इतरांना प्रभावीत कराल. स्वतःच्या आरोग्याकडे आणि आहाराकडे लक्ष द्या. कर्क: आज थोडा धावपळीचा आणि खर्चाचा दिवस असू शकतो. विनाकारण चिंता वाटण्याची शक्यता आहे, त्यामुळे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित आणि वैभवशाली’ शहर म्हणून ओळख असलेल्या संगमनेरला गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. शहरातील वाढती अमली पदार्थांची तस्करी, दहशत आणि चोऱ्यांच्या घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, ही गुन्हेगारी तातडीने थांबवावी, या मागणीसाठी शहरातील महिला पदाधिकारी कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात आज नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाला तीव्र भावनांचे निवेदन देण्यात आले. शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात महिलांनी शहरातील विदारक परिस्थिती मांडली आहे. पोलीस निरीक्षक बारवकर यांनी महिलांच्या भावना जाणून घेत, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस पावले उचलण्याचे…

Read More

संगमनेर, अनंत पांगारकर-  गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या राजकीय वर्तुळात अत्यंत चर्चेचा आणि दोन्ही आमदारांच्या ‘पत्रक युद्धा’चा विषय ठरलेली मालमत्ता करावरील शास्ती माफी अखेर प्रत्यक्षात उतरली आहे. संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीतील थकबाकीदार मिळकतधारकांसाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘अभय योजना’ लागू करण्यात आली असून, यामुळे शहरातील हजारो मालमत्ताधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील थकीत व्याजात (शास्ती) तब्बल ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली असून, प्रशासकीय पातळीवर झालेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी पदभार हाती घेताच त्यांच्या कार्यकाळातील अंमलबजावणी होणारा हा पहिलाच मोठा निर्णय ठरला आहे. गेली अनेक वर्ष संगमनेरकरांना अपेक्षित असलेला निर्णय तांबे यांच्या…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  शुद्धता आणि गुणवत्तेसाठी महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेल्या राजहंस दूध संघाने आता बेकरी उद्योगात आपले पाऊल टाकले आहे. ‘राजहंस मिल्क अँड बेक्स’ अंतर्गत उत्पादित करण्यात आलेल्या विविध दर्जेदार बेकरी पदार्थांचा भव्य शुभारंभ माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयात आयोजित ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शना’च्या उद्घाटन सोहळ्यात या नवीन उपपदार्थांचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले. याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार उभा असून दूध व्यवसायामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. संगमनेरची ओळख आता ‘दुधाचा तालुका’ म्हणून सर्वदूर पोहोचली असून राजहंसने नेहमीच आपल्या उत्पादनांची…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – थोर स्वातंत्र्यसेनानी आणि अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, ज्यांना सहकारातील संत मानले जाते, त्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची जयंती येत्या सोमवारी, १२ जानेवारी २०२६ रोजी ‘प्रेरणा दिन’ म्हणून संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील गावोगावी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अमृत उद्योग समूहाच्या वतीने मुख्य अभिवादन कार्यक्रम सकाळी ९ वाजता अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे होणार आहे. कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली असून, यावेळी माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ…

Read More

आश्वी, प्रतिनिधी-  आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत आश्वी खुर्द येथील दोन महिलांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे. महांकाळेश्वर मंदिर परिसरात सापडलेली ३० हजार रुपये किमतीची सोन्याची वस्तू मूळ मालकिणीला परत करून त्यांनी माणुसकी जपली आहे. २७ डिसेंबर रोजी महांकाळेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या उज्वला भंडारे यांना सोन्याची एक मौल्यवान वस्तू सापडली. त्यांनी ही माहिती पती मनोज भंडारे यांना दिली. त्यानंतर पत्रकार संजय गायकवाड यांच्या मदतीने सोशल मीडियावर याबद्दल संदेश प्रसारित करण्यात आला. दरम्यान, १२ वीत शिकणाऱ्या श्रावणी जगताप या विद्यार्थिनीलाही त्याच वस्तूचा उर्वरित भाग सापडला होता. तिनेही या संदेशाला प्रतिसाद देत संपर्क साधला. योग्य चौकशीअंती सदर सोने कांताबाई दत्तात्रय मांढरे यांचे…

Read More

मेष – मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खुश राहतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, मात्र जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करा. आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ असून जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. वृषभ – आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. धावपळीच्या कामांमुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांतीसाठी वेळ काढा. व्यवसायात नवीन करार करताना कागदपत्रांची नीट पडताळणी करा. नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेली कामे पूर्ण होतील. घरातील थोरामोठ्यांचा सल्ला घेतल्यास कठीण प्रसंगातून मार्ग काढणे सोपे होईल. मिथुन – मिथुन राशीच्या व्यक्तींना आज वैचारिक स्पष्टता जाणवेल. नवीन…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- पिंपळे पाझर तलावातून दोन्ही गावांसाठी रब्बी हंगामाचे पाणी शुक्रवारी (९ जानेवारी) सोडण्यात आले. आमदार अमोल खताळ यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन जलसंपदा विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या, ज्याची अंमलबजावणी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामुळे संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव आणि पारेगाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चिंचोली गुरव व पारेगाव परिसरात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पिंपळे पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. मात्र, रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिके सध्या पाणीअभावी धोक्यात आली होती. पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. ही समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  व्यावसायिक कामासाठी घेतलेली हातउसनवार रक्कम परत करण्यासाठी दिलेला धनादेश (चेक) बँकेत न वटल्याने संगमनेर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चं. प्र. रघुवंशी यांच्या न्यायालयाने एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. परक्राम्य संलेख अधिनियमाच्या कलम १३८ अन्वये हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादी ज्ञानेश्वर माधव वर्पे हे संगमनेर शहरात ‘वर्पे इन्श्युरन्स अँड मल्टी सर्विसेस’ नावाचा व्यवसाय करतात. आरोपी सागर भाऊसाहेब गोपाळे (वय ३८ वर्ष, रा. धांदरफळ बुद्रुक) यांचा ‘श्री स्वामी समर्थ ट्रान्सपोर्ट’ नावाचा व्यवसाय असून गाड्यांच्या विम्याच्या कामामुळे या दोघांचा परिचय झाला होता. जून २०२२ मध्ये आरोपीने आपल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी फिर्यादीकडून १ लाख २५ हजार…

Read More