Author: अनंत पांगारकर
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर नगर परिषदेच्या इतिहासात एक नवे सुवर्णपान ओढले जात आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला ‘प्रशासक काळ’ आता संपुष्टात येणार असून, नववर्षाच्या पहिल्याच शनिवारी (३ जानेवारी) नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारणार आहेत. या सोहळ्यासाठी संगमनेर पालिकेमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. २१ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतमोजणीत आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील ‘संगमनेर सेवा समिती’ने विरोधकांची पालिकेतील सत्तेची सर्व स्वप्ने उद्ध्वस्त करत ऐतिहासिक विजय नोंदवला. डॉ. मैथिलीताई तांबे यांनी केवळ विजयच मिळवला नाही, तर संपूर्ण राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या…
कॅफेच्या नावाखाली ‘अश्लील’ धंदा; तासावर जागा भाड्याने देणाऱ्या दोन बड्या कॅफेंवर पडला पोलिसांचा छापा
प्रतिनिधी – कॅफेच्या नावाखाली तरुण-तरुणींना अश्लील कृत्यांसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या दोन मोठ्या कॅफेंवर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून, तासाच्या हिशोबाने जागा भाड्याने देणाऱ्या मालकांचे धाबे दणाणले आहेत. कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील एका कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ‘आपलं कॅफे’ आणि ‘मराठी कॅफे’ या दोन ठिकाणी तरुण मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी खाजगी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. हे कॅफे चालक केवळ जागेचे पैसे घेऊन अशा कृत्यांना प्रोत्साहन देत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास पोलिसांनी या दोन्ही कॅफेंवर अचानक छापा टाकला. यावेळी तिथे धक्कादायक प्रकार…
संगमनेर – पुणे-नाशिक महामार्गावरून कंटेनरमध्ये अत्यंत निर्दयतेने कोंडून कत्तलीसाठी कर्नाटककडे नेली जाणारी २८ गोवंश जातीची जनावरे संगमनेर पोलिसांनी पकडली आहेत. या कारवाईत पोलिसांनी ३२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. बुधवारी (दि. ३१ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एका १० टायर कंटेनरमधून जनावरांची अवैध वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तातडीने या संबंधीची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना दिली. पोलीस उपअधीक्षक सोनवणे यांच्या सूचनेवरून पोलीस नाईक बापूसाहेब हांडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील ढाकणे आदी पोलिसांनी संगमनेर ते…
अहिल्यानगर: सोशल मीडियाचा वापर करून एका १८ वर्षीय तरुणीची बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून, तिचे फोटो आणि गावातील एका तरुणाचे छायाचित्र मॉर्फ करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. याप्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील एका १८ वर्षीय तरुणीच्या नावाने काही अज्ञात व्यक्तींनी इंस्टाग्रामवर बनावट प्रोफाईल तयार केले होते. या खात्यावर पीडितेचे मूळ फोटो वापरून त्यासोबत चुकीची माहिती जोडण्यात आली. इतकेच नव्हे तर, पीडितेच्या ओळखीच्या एका तरुणासोबत तिचे फोटो तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट पद्धतीने तयार केले आणि ते…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा दिसून येईल, मात्र घाईघाईत कोणताही मोठा गुंतवणूक निर्णय घेऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि सायंकाळी मित्रांसोबत नवीन वर्षाच्या स्वागताचे बेत आखले जातील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळणार आहे. थांबलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान लाभेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील ज्यामुळे भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आज कोणालाही उधार देणे टाळावे. नवीन संकल्प करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत सकारात्मक आहे. मिथुन: आजचा…
जुन्नर (पुणे): पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर आज मंगळवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली आहे. डुंबरवाडी गावच्या हद्दीतील हॉटेल अभिजित जवळ मजुरांनी भरलेली पिकअप आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून, १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आज मंगळवारी (दिनांक ३० डिसेंबर) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मजुरांचे पिकअप वाहन ओतूरकडून आळेफाट्याच्या दिशेने जात होते. याच वेळी आळेफाटा बाजूकडून ओतूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पिकअपचा अक्षरशः चक्काचूर…
संगमनेर- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे-नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. विकास क्रांती सेनेसह विविध रेल्वे कृती समित्यांनी येत्या १२ जानेवारीला पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ‘चक्काजाम’ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी संगमनेर तालुक्यातील बोटा येथे महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सर्वांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे आपल्या मागण्या कळवल्या असून आता १२ जानेवारीच्या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आंबेगाव, जुन्नर, संगमनेर व अकोले तालुक्यातील जनता या बहुउद्देशीय पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची प्रतीक्षा करत आहे. मात्र, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा आणि उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा दिसून येईल, परंतु घरातील व्यक्तींशी संवाद साधताना रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ – आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. व्यापारात नवीन गुंतवणुकीचे विचार मनात येतील, जे भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींबाबत सावध राहा. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. मिथुन – आजचा दिवस धावपळीचा आणि कष्टाचा असू शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, ज्यामुळे तुम्हाला थोडा ताण जाणवेल. आर्थिक देवाणघेवाण…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकता आणि धाडसाचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ लाभल्याने जुनी देणी पूर्ण होण्यास मदत होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत खेळीमेळीचे वातावरण राहील, मात्र बोलताना शब्दांचा वापर जपून करणे हिताचे ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्यामुळे कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याचे योग असले तरी वायफळ खर्च टाळणे गरजेचे आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि एकमेकांना समजून घेतल्यामुळे घरातील वातावरण शांत राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित…
अहिल्यानगर – शिर्डी परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख याला स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. शिर्डीतील हॉटेल रेणुका जवळील काटवनात दबा धरून बसलेल्या या आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी दीपक किसन जाधव (रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) यांचा मुलगा निलेश हा शिर्डीहून सावळविहीर येथे जात होता. यावेळी आरोपी पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख आणि त्याच्या साथीदारांनी निलेशला रस्त्यात अडवले. त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय…
