Author: Annant Ppangarkar
छत्रपती संभाजीनगर – माजी न्यायमूर्ती, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं आज शनिवारी (२५ जानेवारी) निधन झालं. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे माजी न्यायमूर्ती होते. तसेच न्यायालयीन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात मोठी भूमिका बजावली. वर्धा येथे झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. साहित्य क्षेत्रात न्यायाच्या गोष्टी, संघर्ष आणि शहाणपण, तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, कायदा आणि माणूस, समाज आणि संस्कृती, सावलीचा शोध आदी पुस्तके प्रसिद्ध आहे. चपळगावकर यांनी १९६२ ते…
मुंबई, दि. २५ : नव्या महायुती सरकारच्या काळात राज्यातील नागरिकांचा प्रवास महाग झाला आहे. प्रवाशांच्या खिशाला तब्बल पंधरा टक्के झटका देण्यात आला असून हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दिनांक २५ जानेवारी पासून (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) अंमलात येत असल्याची माहिती राज्य परिवहन प्राधिकरणाने दिली आहे. या कारणासाठी भाडेवाढ – वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे भाडेवाढ सुत्रानुसार महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन…
मुंबई, दि. २५ : भारतातील सहकारी संस्था समृद्ध बनविण्यासाठी सहकार मंत्रालयाने महत्त्वाची पावले उचलली असून देशातील प्रत्येक नागरिक या माध्यमातून सहकारी चळवळीशी जोडला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाप्रमाणे आपण जगातील तिसऱ्या महासत्तेकडे वाटचाल करीत असून २०४७ मध्ये आपण पूर्ण विकसित राष्ट्र असू, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा आरंभ केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री शाह यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (२४ जानेवारी) गोरेगाव येथे करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार व नागरी विमान चालन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर,…
मुंबई, दि. २४ : राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला. आता ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार…
पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘ट्रूथ अँड डेअर’च्या गेममध्ये हरलेल्या १७ वर्षीय तरुणीवर २२ वर्षीय मित्रांनीच बलात्कार केल्याची बातमी समोर आल्यानंतर पुण्यात नेमकं चाललय काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणे तिथे काय उणे असं म्हणतो पण अलीकडे याच पुणे शहरात गुन्हेगारी वाढीस लागली आहे. दिवसाढवळ्या गोळीबार, ड्रिंक अँड ड्राईव्ह, आत्महत्या या अशा घटनांमध्ये पुणे मागे राहिलेलं नाही. पुण्यात हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. याच विद्येच्या माहेरघरात ही हृदय पिळवटून टाकणारी बातमी आली आहे. पिंपरी-चिंचवड येथे शिक्षणाच्या निमित्ताने १७ वर्षीय तरुणी राहत होती. पाच वर्षांपूर्वी पीडित मुलीची आणि एका २२ वर्षीय तरुणीची ‘इन्स्ट्राग्राम’वर ओळख झाली.…
संगमनेर – महिलेच्या गळ्यातील दागिने लांबवत ते शहरातील सोनाराला विकण्यात आले. चोरीचे दागिने घेणाऱ्या त्या महिला सोनाराला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळताना अर्जदार आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दागिने स्वीकारले असले तरी अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात मुद्देमाल हस्तगत करण्यासाठीच नव्हे तर अशाच प्रकारचे इतर गुन्हे उघडकीस येण्यासाठी व गुन्हा करणाऱ्या आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी अर्जदार आरोपीचा पोलिसांकडून तपास होणे आवश्यक असल्याचा व अर्जदाराला अटकपूर्व जामीन दिला तर तपसी यंत्रणेला कायद्याने प्राप्त झालेले अधिकार हिरावून घेतले जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करत हा महत्त्वाचा निष्कर्ष न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी नोंदविला आहे. झेंडावंदनाचा…
नाशिक – बांगलादेशी नागरिकांसह रोहिंग्यांना बनावट कागदपत्राच्या आधारे जन्म दाखल्यांचे वितरण केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर सरकारने यासाठी नेमलेल विशेष तपास पथक (एसआयटी) तीन दिवसापासून तळ ठोकून चौकशी करत असतानाच आता राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. मालेगावचे तत्कालीन तहसीलदार व सध्या जळगाव जिल्ह्यात बोदवड येथे कार्यरत असलेले नितीनकुमार देवरे, मालेगावचे नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्यासह पाच जणांवर निलंबनाचा बडगा उगारला आहे. निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये तहसीलदार नितीन कुमार देवरे, नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्यासह मालेगाव तहसील कार्यालयातील लिपिक विजय अंभोरे, रेहान शेख तसेच अव्वल कारकून भरत शेवाळे यांचा समावेश आहे. तहसीलदार, नायब तहसीलदारांचे निलंबन राज्य सरकारने…
नाशिक : केंद्रीय गृह तसेच सहकारमंत्री अमित शहा हे शुक्रवारी (दि. २४) नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते त्र्यंबकेश्वर व मालेगाव येथे भेट देणार आहेत. अमित शहा शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा करतील. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ यात्रेच्या कालावधीत शहांचा हा दौरा होणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्र्यंबकराजाचे दर्शन घेतल्यानंतर ते हेलिकॉप्टरने मालेगाव तालुक्यातील अजंग येथे व्यंकटेश्वरा सहकारी वीज आणि कृषी प्रक्रिया लिमिटेडतर्फे आयोजित सहकार परिषद आणि विविध कार्यक्रमांस उपस्थित राहणार आहेत. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा शनिवारी असून आदल्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येणार असल्याने त्यांच्या…
विशेष प्रतिनिधी / मुंबई या सरकारमध्ये आपली कॉलर टाईट करा. पीर-बीर बाबांना विचारू नका. मोहम्मद पैगंबर यांना मानणारे मुस्लीमच पीर-बाबा वगैरे मोजत नाही. मैं इस बाप का हू की उस बाप का यातच यांचा गोंधळ सुरू असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अयोध्या येथील राम मंदिर उभारणीच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित आळंदी आणि निगडी येथील कार्यक्रमांना बुधवारी (दि. 22) नितेश राणे यांनी हजेरी लावली. यावेळी भाषण करताना नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. नितेश राणे म्हणाले की, हिंदूंच्या धर्म स्थळावर वक्फ बोर्ड दावा करत आहे. कुंभ मेळ्यातही वक्फ…
मुंबई, दि. २३ महाराष्ट्र शासनाच्या १३ वर्षे मुदतीच्या २,००० कोटींच्या (७.११ % महाराष्ट्र शासनाचे रोखे, २०३८) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल. २८ जानेवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर…
संगमनेर दि. – २३ गेल्या दोन-तीन महिन्यांपासून संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये राजकीय पक्षांच्या, बिगर राजकीय व व्यावसायिकांच्या फ्लेक्सला उधाण आले आहे. राजकीय नेत्याची छबी मिरवत हे फ्लेक्स विनापरवाना अनेक दिवसांपासून दर्शनी भागात लावण्यात आले आहे. या फ्लेक्सच्या माध्यमातून गावागावात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते, त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हे फ्लेक्स बोर्ड हटविण्याची मागणी करत यासाठी फ्लेक्स फाडो आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे (ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिला आहे. संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना या संदर्भात शिवसेनेच्यावतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गुरुवारी निवेदन देण्यात आले. कतारी यांच्यासह युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण, प्रशांत खजुरे, राजू सातपुते, इम्तियाज शेख, फैजल…
अहिल्यानगर दि. २३ – राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज सभागृह, न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथे २६ व २७ जानेवारी २०२५ रोजी दोन दिवसीय अहिल्यानगर ‘ग्रंथोत्सव २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (२६ जानेवारी) सकाळी १० वाजता जलसंपदा, (गोदावरी व कृष्ण खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हे भूषविणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजीत तांबे, आमदार शिवाजीराव…
दावोस, दि. 23 जानेवारी दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल. आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा…
मुंबई, दि. २२ :- जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीकच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर आहेत. तेथून त्यांनी या दूर्घटनेची माहिती घेतली. दूर्घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन पोहचून मदत व बचावासाठी आवश्यक गोष्टींचे व्यवस्थापन करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दृकश्राव्य संदेश जारी केला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचा उल्लेख करून त्यांनी म्हटले आहे की, काही लोकांचा मृत्यूची ही…
अहिल्यानगर दि. २२- कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करुन कृषी योजनांचा शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या माहितीमधून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी नजिकच्या सीएससी केंद्र, आपले सरकार केंद्र, सेतु केंद्र येथे जाऊन आपली आधार जोडणी विनामूल्य करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. शेतकऱ्यांना शेतातील हंगामी पिकांची आणि जमीन नकाशांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कृषी योजनांसाठी ॲग्रीस्टॅक कार्डसाठी नोंदणी सुरु केली आहे. ॲग्रीस्टॅकद्वारे शेतकऱ्यांचा डेटा एकत्रित केला जाणार असून त्याआधारे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करुन कृषी योजनाचा शेतकऱ्यांना…
संगमनेर – १६ जानेवारीपासून मोठ्या गर्दीत सुरू असलेल्या लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या बिझनेस एक्स्पोसमोर सोमवारी रात्री एका तरुणाकडून गोळीबार करण्यात आला असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मोठ्या गर्दीत हा प्रकार घडल्याने मोठा अनर्थ निर्माण झाला असता. त्यामुळे गोळीबार करणारा हा तरुण कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रश्नचिन्ह झाले निर्माण… दरम्यान या संदर्भात पोलिसांनी असा प्रकार घडला नसल्याचे म्हटले आहे. हजारो लोकांसमोर घडलेला हा प्रकार नेमका काय होता असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. एक्स्पोसमोर गर्दीत घडला प्रकार… शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या मालपाणी लॉन्सवर गेल्या काही दिवसापासून लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरचा बिझनेस एक्स्पो मोठ्या गर्दीत…
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यातील बुजुर्ग पत्रकारांना सन्मानाच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विधीमंडळ वार्ताहर संघाने सुचवलेल्या दुरुस्त्यांचा शासकीय स्तरावर विचार केला जाईल. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून त्रुटी दूर करून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. तोवर सध्या सुरु असलेल्या सन्मान योजनेतील मासिक ११ हजार रुपयांची रक्कम येत्या आर्थिक वर्षांपासून २० हजार रुपये करण्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन २०२३ व सन २०२४ च्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, माहिती…
संगमनेर – अनंत पांगारकर पोलीस ठाण्यात दररोज विविध प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात. यात आरोपींमध्ये पुरुष, महिला, मुला-मुलींचा समावेश असतो. मात्र गेल्या आठवड्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एका डॉक्टरच्या कुत्र्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. गेल्या बुधवारी घडलेल्या या प्रकारासंदर्भात रविवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेने दिलेल्या जबाबावरून पाळीव कुत्र्या विरोधात दाखल झालेल्या या गुन्ह्याची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. आरोपीमध्ये प्रथमत:च एका पाळीव कुत्र्याचा समावेश असल्याने पोलीस याप्रकरणी नेमका काय तपास करतात, याकडे लक्ष लागले आहे. संगमनेर शहरालगत घुलेवाडी शिवारात असलेल्या नवशीचा मळा येथे…
मुंबई : २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात घोषणा करून सुरू करण्यात आलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळं या योजनेत बदल करण्यासंदर्भातील शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं राज्य सरकारला दिल्याची माहिती आहे. राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात एक रुपयात पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करुन योजनेची अमंलबजावणी सुरु करण्यात आली. या योजनेला सर्वसमावेशक पीक विमा योजना हे नाव देण्यात आलं. या योजनेद्वारे केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा वाटा राज्य सरकारकडून भरला जायचा, शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरुन…
विशेष प्रतिनिधी / मुंबई जेष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केल्यानंतर राज्यपालांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन निवडणूक आयुक्तांवर असणार आहे. दिनेश वाघमारे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. मंत्रिपरिषदेने नव्या निवडणूक आयुक्तांची निवड करण्याचे सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दिनेश वाघमारे यांच्या नावाची शिफारस केली होती. राज्यपालांची दिनेश वाघमारेंच्या नावाला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने वाघमारेंच्या नियुक्तीचा एक आदेश जाहीर करण्यात आला आहे. दिनेश वाघमारे हे पुढच्या पाच वर्षांसाठी राज्याचे निवडणूक आयुक्त असतील. त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती…
