Author: अनंत पांगारकर
देशातील सव्यासाची उद्योगपती, देशाभिमानी रतन टाटा यांची दोनच दिवसांपूर्वी एक्झीट झाली. देशासाठी सारंकाही करण्याची उमेद असलेला टाटांसारखा उद्योगपती झाला नाही होणार नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया सर्वसामान्यांची आहे. तरूणांचं व्यासपीठ समजल्या जाणार्या सोशल मिडियावर नव्वदीतला हा उद्योगपती सामान्यांच्या सुख दु:खात सहभागी होतो. प्रचंड संपत्तीचा मालक असलेल्या या महायोग्याला श्रीमंतीचा माज नाही की प्रसिध्दीचा सोस. या महान उद्योगपतीची एका विशीतल्या तरुणाशी दोस्ती होणं हे कल्पनेबाहेरील सत्य आहे. हीच दोस्ती भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतीला सोशल मीडियावरचा स्टार बनवून गेली. शंतनू नायडू हे त्या तरूण दोस्ताचं नाव. शंतनूनेच टाटांना सोशल मिडियाच्या जगाशी जोडलं. या तरुणाच्या आग्रहामुळेच टाटा अखेरच्या काही वर्षांत सोशल मीडियावर तरूणाईच्या गळ्यातील…
असा असेल तुमचा आजचा दिवस रविवार, दि. १३ ऑक्टोंबर मेष – संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. नियमांचे पालन करा, वादविवादाचे प्रसंग टाळा. दुरचे नातेवाईक यांच्याशी संपर्कात राहाल. वृषभ – आपण घेत असलेल्या परिश्रमांचा मोबदला व्यवस्थित मिळेल, अपेक्षित यश मिळू शकते. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल, मात्र रागावर नियंत्रण ठेवा. कोणालाही जामीन राहू नका. मिथुन – कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास खरे समाधान प्राप्त होईल. नोकरदारांना दिलासा मिळेल, आर्थिक बाजू सावरता येईल. विवाहेच्छुक व्यक्तींना जोडीदारांची साथ मिळण्याची शक्यता राहील. कर्क – इच्छित गोष्टी साध्य करता येतील. ग्रहांची साथ मिळणार असल्याने योजना कार्यान्वित होतील. आर्थिक बाजू…
शनिवार, १२ ऑक्टोंबर अनेक अडचणींवर मात करत आपण निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे पूर्ण केली. प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन केले, त्यासाठी स्वतःची जमीन दिली. मात्र शेजारच्यांनी गुंठाभरही जमीन दिली नाही. आपल्याला नाव ठेवणाऱ्यांचे निळवंडे साठी कवडीचेही योगदान नसल्याचे स्पष्ट करत निळवंडेचे काम कोणी केले हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात तळेगाव दिघे येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. थोरात म्हणाले, निळवंडे धरणाचे पाणी खालच्याला द्यायचे तसे वरच्या नाही द्यायचे ही आपली भूमिका आहे. मध्यप्रदेश मधील हरिपुरासारखा पॅटर्न राबविण्याचा आपला प्रयत्न असून बोल घेवड्यांच्या मागे न राहता काम…
शनिवार, १२ ऑक्टोंबर १९८५ च्या निवडणुकीने संगमनेर तालुक्यात नव्या इतिहासाला सुरुवात झाली. तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलली. सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका राज्यातील प्रगतशील तालुका बनला असून आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण इकडे येतील निवडणुकीमुळे मन्या दूषित करण्याचा प्रयत्न करतील परंतु अशांना वेळच रोखत राजकारणाचे चांगली संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचे आवाहन माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात यांच्या हस्ते शनिवारी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. स्वराज्याची संकल्पना देणाऱ्या ऐतिहासिक शाळा गडावर विजयादशमीच्या दिवशी पारंपारिक वाद्य, सनई चौघडे, ढोल ताशांच्या गजरात, सूर आणि…
शनिवार १२ ऑक्टोंबर मका तोडण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर अचानकपणे बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ३५ वर्षीय महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे दुसऱ्यांदा घडलेल्या या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी ऐन दसऱ्याच्या दिवशी शनिवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील तात्काळ आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या थोरात यांनी तात्काळ राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन करत नरभक्षक बिबट्याला मारण्यासंदर्भात मागणी करत वन विभागाचा हलगर्जीपणा विषद केला. मुनगंटीवार यांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लगेचच नरभक्षक बिबट्याला तात्काळ करण्याचे आदेश देत नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देत असल्याचे थोरात…
शनिवार, १२ ऑक्टोंबर पुणे : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वरदहस्ताने पुणे जिल्ह्यातील कासारसाई धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी असलेली मावळ तालुक्यातील २०० कोटी रुपयांची ३१ एकर जमीन वाटप आदेश होण्यापूर्वीच नोंदणीकृत साठेखत दस्तऐवजाद्वारे हस्तांतरित करण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी केला. दरम्यान या संदर्भात मंत्री विखे पाटील यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. धंगेकर म्हणाले, मावळ तालुक्यातील गट क्रमांक १५४ सह पाच ते सहा गटांतील शासकीय जागा लाटण्याचा हा प्रकार आहे. या जागेवर कासारसाई प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होणे अपेक्षित आहे. या जागेचा सातबाराही जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर आहे. मात्र, मंत्री विखे पाटील यांच्या जवळचे असलेले सचिन शिंदे, श्वेता…
शनिवार, १२ ऑक्टोंबर अहिल्यानगर – उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात अनधिकृत जाहिरात फलक, फ्लेक्स, बॅनर्स आढळून आल्यास सार्वजनिक मालमत्ता विरूपणास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करत ते तातडीने काढून टाकण्याचे निर्देश अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे उपस्थित होते. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंग, बॅनर्स, फ्लेक्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या…
असा असेल तुमचा आजचा विजयादशमीचा दिवस शनिवार, दि. १२ ऑक्टोंबर मेष- महत्त्वाची कामे करू शकाल. संततीकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. त्यांच्या प्रगतीने मन आनंदी होईल, संतती सौख्य लाभेल. नवीन कार्यक्षेत्रात प्रवेश करू शकता. नवीन कामाचा आनंद घ्याल. वृषभ – आपल्यामध्ये आत्मविश्वास परिपूर्ण असणार आहे. तत्त्वाप्रमाणे काम कराल, सरकारी काम करून घ्यावी. काम करताना सातत्य ठेवणे आवश्यक आहे. खोळंबलेली काम सुद्धा पूर्ण करा. मिथुन – बहीण-भावामध्ये तणावाचं वातावरण असू शकते. त्यामध्ये तुम्ही पुढाकार घेऊन त्या तणावाचे वातावरण कमी करू शकता, तुमच्या बोलण्याने वातावरण आनंदी व सुखमय होईल. कर्क – प्रवास टाळणे चांगले. आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे आर्थिक प्राप्तीपण…
शुक्रवार, ११ ऑक्टोंबर तोफेतून गोळा सोडत असताना तो जागेवरच फुटल्याने झालेल्या स्फोटात दोन अग्निवेरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक अग्निवीर गंभीर जखमी झाला आहे. नाशिकमध्ये हा प्रकार घडला. गोहिल विश्वराज सिंग (वय २० वर्ष, मूळ रा. गुजरात ह.मू. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड, नाशिक) आणि शक्कींन शीत (वय २१ वर्ष, मूळ रा. पश्चिम बंगाल, ह.मू. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड, नाशिक) असे मृत झालेल्या अग्निवीरांची नावे असून अप्पाला स्वामी (वय २० वर्ष) असे जखमी झालेल्या अग्निविराचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी देवळाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास इंडियन शील्ड गन या मैदानावर…
शुक्रवार, ११ ऑक्टोंबर संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह जिल्ह्यातील १६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामांतर करण्यात आले असून शुक्रवारी राजापूर आयटीआयचे ‘शाहीर विठ्ठल उमप’ असे नामांतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. राजापूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, राजापूर येथे प्राचार्य यु. डी.पालवे, शाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव संदेश उमप, जिल्ह्यातील सर्व आयटीआयचे प्राचार्य दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. विखे म्हणाले, राज्यात ४१९ शासकीय व ५८५ खासगी आयटीआय कार्यरत आहेत. यापैकी १०८ आयटीआयना त्या जिल्ह्यातील थोर व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांची नावे देण्यात येत आहेत. आयटीआयचे नामांतर ही ऐतिहासिक घटना आहे. मुख्यमंत्री युवा…
