Author: अनंत पांगारकर

रविवार, २१ जून  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर युवक काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी युवा नेत्या, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आल्या असून शहराध्यक्षपदी निखिल पापडेजा यांची पुन्हा फेर निवड करण्यात आली. वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, युवक आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल पापडेजा यांनी मागील पाच वर्षे शहराध्यक्षपद सांभाळले असून अनेक युवकांना मोठी संधी दिली आहे. त्यामुळे त्यांची शहराध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. कार्याध्यक्षपदी – वैष्णव राजकुमार मुर्तडक, अमित गुंजाळ, गोपी जहागीरदार तर उपाध्यक्ष म्हणून सुरभी असोपा, मनोज पुंड, श्रेयश…

Read More

रविवार २१ जुलै  संगमनेरमधील ‘शक्तिमान टॉवर्स’मध्ये चालणाऱ्या अवैध व्यवसायावर ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या माध्यमातून प्रकाश टाकल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वीच येथील वरच्या मजल्यावर सातत्याने आढळणारे गंजाडी, जुगारी आणि दारुडे शनिवार असताना देखील गायब झाल्याचे दिसून आले. मात्र या कॉम्प्लेक्समधील अवैध धंदे शनिवारी देखील सुरूच होते. सुसंस्कृत संगमनेरला अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने लागलेला अवैध धंद्यांचा कलंक अद्यापही कायम आहे. अवैध धंद्यांचा बीमोड करण्याची जबाबदारी ज्या यंत्रणांवर आहे त्या यंत्रणा सध्या तरी सुस्तावल्या असल्याने त्यांच्यावर बातम्यांचा फारसा परिणाम दिसत नाही. एकीकडे पोलीस खात्यातील एलसीबीच्या हप्तेखोरीवरून अहमदनगरचे खासदार उपोषणाच्या तयारीत असले तरी संगमनेरसह जिल्ह्यात अवैध धंदे मात्र अद्यापही जोरात सुरू आहे. खासदारासारखा लोकप्रतिनिधी या विरोधात उपोषणाचा मार्ग…

Read More

रविवार २१ जुलै  तालुक्यातील लाभार्थ्यांना यापूर्वी प्रकरणे करण्यासाठी होणारा त्रास, दलालांपासून मुक्ती, दरमहा खात्यावर पैसे जमा, सन्मानजनक वागणूक, अडचणी येणाऱ्याच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे आज लोकांची ओढ वाढली असून, भाजपा व समितीचे काम उत्कृष्ट सुरू असल्यामुळे यशोधनला जाणाऱ्यांची संख्या घटल्यामुळे काही नेते व्यथित झाल्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी म्हटले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दि. १० मार्च २०२४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना संजय गांधी निराधार योजना समिती अशासकीय सदस्य नियुक्तीबाबत शिफारस केली होती. परंतु लोकसभा, शिक्षक विधानपरिषद निवडणुक आचारसंहिता सुरु झाल्याने समिती नियुक्ती प्रलंबित राहिली होती. आचार संहिता संपल्यानंतर समिती अध्यक्ष अमोल खताळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून समिती तात्काळ जाहीर…

Read More

रविवार २१ जुलै  संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भाग नेहमीच अवैध सावकारकीच्या घटनांनी नेहमीच चर्चेत राहिला आहे. बिरेवाडीतील एका सावकार पिडीत व्यक्तीची आर्थिक पिळवणूक झाली, जमीन लाटण्याचा प्रकार केला, मानसिक त्रास देत पैशाचा तगादा लावत शिवीगाळ, मारहाण करण्याचे प्रमाण वाढल्याने या त्रासाला कंटाळून सबंधित व्यक्तीने संगमनेरच्या उपनिबंधकांकडे तक्रार केली. या रागातून तक्रारदाराबाबत नियोजित कट आखून भ्याड हल्ला करत संपूर्ण कुटुंब संपवायची धमकी दिल्याची घटना गुरूवारी (१८ जुलै) सकाळी बिरेवाडी परिसरात घडली. साकुरजवळील बिरेवाडी गावातील तरुण शेतकरी मुक्ताराम काशिनाथ सागर हे कुटुंबासोबत राहत आहे. याच गावातील सावकार लालू नारायण ढेंबरे व त्यांचा मुलगा योगेश लालू ढेंबरे हे अवैध सावकारकीचा व्यवसाय करत असून…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई सनदी प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उडी घेतली असून हा सरकारच्या दुर्लक्षतेचा परीणाम असल्याचा आरोप करत सरकारला घेरलं आहे. खेडकर यांच्याविरोधात दिल्ली क्राइम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल केला आहे. बनावट कागदपत्र, फसवणूक, आयटी कायदा आणि अपंगत्व कायद्याच्या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा खेडकर यांच्यामुळे यूपीएससीची प्रमाणपत्र प्रणाली आणि त्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. प्रियंका गांधी यांनी या प्रकरणावरुन सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. हे प्रकरण म्हणजे लाखो तरुणांच्या स्वप्नांवर आणि विश्वासावर हल्ला असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. प्रियंका गांधी वाड्रा यांनी शनिवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर एक…

Read More

रविवार २१ जुलै  विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शनिवारी संध्याकाळी नगर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. वादग्रस्त ठरलेल्या नगर एलसीबीच्या उपनिरीक्षक सोपान गोरे यांचा समावेश असून या शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले आहे. तर जिल्हा पोलीस अधीक्षकांनीदेखील प्रशासकीय बदल्यांची कार्यवाही शनिवारी सुरू केली. शनिवारी पोलीस मुख्यालयात प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती दरम्यान जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेल्या २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या दुसऱ्या जिल्ह्यात करण्यात आल्या आहे. खासदार निलेश लंके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारभाराच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असून या मागणीसाठी ते सोमवारपासून उपोषण करणार आहे. लंके यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षकांमार्फत…

Read More

महाराष्ट्रात सध्या जनलाचारीचा महिमा सुरू आहे. लोकांना काय पाहिजे याचा विचार न करताच राज्यातल्या शिंदे सरकारने आपला खजिना रिता करण्याचा खेळ सुरू केला आहे. आवश्यकता नसूनही तो आम्ही देणार अशा मानसिकतेत सरकारने आपली पोतडी खुली केली आहे. एखाद्या जपान वा स्वीस देशाने करावी अशी ही खिराफत महाराष्ट्रातील लोकांच्या वाट्याला आली आहे. एव्हाना आर्थिक धोरणाविषयी भली मोठी व्याख्यानं झोडणार्‍यांना जे जमलं नाही ते एकनाथ शिंदेंच्या सरकारने करून दाखवलं आहे. कमाईपेक्षा खर्च वाढला की घर चालवणं अवघड जातं. मग कर्ज आणि कर्ज. ते भरणं अवघड झालं की संकट आलंच म्हणून समजा. घरासारखीच अवस्था देशाची होत असते. देश रसातळाला जाऊ नये, म्हणून राज्यांवर…

Read More

शनिवार २० जुलै केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, पूजा खेडकर प्रकरणामुळे सोनींनी राजीनामा तर दिला नाही ना, याबाबतदेखील आता अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. सोनी यांनी गेल्यावर्षीच यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ आणखी चार वर्षांनी २०२९ मध्ये संपणार होता. परंतु, त्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच अचानकपणे राजीनामा दिल्याने यूपीएससी चर्चेत आली आहे. या राजीनाम्याचा अर्थ खेडकर प्रकरणाशीही लावला जात असल्याने खळबळ उडाली आहे. सोनी २०१७ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घटनात्मक मंडळाचे सदस्य झाले.…

Read More

खासदारांच्या एलसीबी विरोधातील लेटर बॉम्बकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठांचे दुर्लक्ष अहमदनगर पोलीस दलात नेमकं काय सुरू आहे? एलसीबीला नेमका आशीर्वाद कोणाचा? एलसीबीतील हप्तेखोरांची नावानिशी तक्रार करून अद्यापही दखल नाही शनिवार २० जुलै | अनंत पांगारकर  अहमदनगर पोलीस दलातील विशेषत: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील (एलसीबी) भ्रष्टाचारा विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे खासदार निलेश लंके यांनी एका पत्राद्वारे तक्रार करून देखील आठवडा उलट झाला तरी दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे सोमवारपासून (२२ जुलै) लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले. अहमदनगर एलसीबीच्या विरोधात…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई पक्ष फुटीचे अनेक दरवाजे ओलांडणारे काँग्रेसचे बांद्रा येथील आमदार बाबा सिद्धिकी यांचे पुत्र झिशान सिद्धिकी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून बांद्रा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून दबावतंत्राचा वापर सुरु केला आहे. उमेदवारी न मिळाल्यास महाविकास आघाडीला सांगलीप्रमाणे धडा शिकवू असा इशारा दिला आहे. महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सांगली जागेवरून वाद झाल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता, याची आठवण झिशानने करून दिली आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडत अजित पवार गटात समावेश केला आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांचे पुत्रे झिशान सिद्दीकी हे एकटे पडले…

Read More