Author: अनंत पांगारकर

संगमनेर, दि. २८ काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशात आदर्श सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यांने यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीतही ८ लॉक मॅट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केल्याची माहिती कारखान्याच्या व्यवस्थापनाने दिली आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे यावर्षीचा हंगाम साखर कारखानदारीसाठी अडचणीचा आहे. अशा स्थितीतही थोरात साखर कारखान्यावर सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे. या बळावरच कारखान्याने गाळपाचा हा टप्पा पार केला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीसह तेथे त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. याशिवाय विविध उपक्रम देखील राबविले…

Read More

संगमनेर, दि.२८ येथील कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांना समाजात अर्थसाक्षरता निर्माण करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल तर साईनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील व्यवसायात नाविन्यपूर्ण कामगिरीबद्दल सुदीप वाकळे यांना प्रतिष्ठेच्या “इंडियन ग्लोरी अवॉर्ड्स” या राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित व्यावसायिक व शैक्षणिक शिखर परिषदेत सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश डॉ. के. जी. बालकृष्णन, माजी क्रिकेटपटू मदनलाल, भारतीय उद्योग महासंघाच्या पहिल्या महिला आणि माजी उपमहासंचालक मनिषा रॉय, संस्थापक अध्यक्ष आणि कौन्सिलचे संचालक जॉर्ज कोचुपुरकल यांच्या हस्ते कडलग व वाकळे यांना इंडियन ग्लोरी अवॉर्ड्स राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. ग्लोबल चेंबर ऑफ कंजूमर राइट्स व काईटस् क्राफ्ट…

Read More

संगमनेर, दि. २८ नगर एलसीबी आणि तालुका पोलिसांनी केलेल्या वाळू तस्करीच्या कारवाईनंतर संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे ॲक्शन मोडवर आले आहे. संगमनेर खुर्द येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्या आठ जणांना तुमच्यावर कारवाई का करू नये, अशा आशयाच्या नोटिसा बजावल्या आहे. याशिवाय महसूलची हेरगिरी करणाऱ्या आणि वाळू तस्करीला मदत करणाऱ्यांना देखील कारवाईच्या नोटिसा बजावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.राज्याचे महसूल आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरसह राज्यातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह वाळू तस्करांकडून सुरू असलेल्या बेकायदा वाळू तस्करीकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी त्यांनी नवे वाळू धोरण देखील आणले असून त्याची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. असे असले तरी या धोरणाची…

Read More

मुंबई, दि. २७ विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्या संदर्भात काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत विविध प्रश्न उपस्थित सरकारची कोंडी केली. सुरुवातीलाच त्यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनाही धारेवर धरले. मला पहाटे साडेपाच वाजता कामकाजपत्रिका मिळाली, अशी तक्रार करत बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यावर राहुल नार्वेकर यांनीही चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. सभागृहात मंगळवारी प्रबळ विरोधकाची भूमिका बजावताना बाळासाहेब थोरात म्हणाले, महानंदा ही दुधाची प्रतिष्ठित अशी शिखर संस्था होती. यामागे महाराष्ट्राचा दुधाचा एक ब्रँड करायचा असा उद्देश होता. गोरेगाव मध्ये या संस्थेची ५० एकर जमीन आणि अत्याधुनिक प्लांट आहे. मात्र…

Read More

अहमदनगर, दि. २६ फेब्रुवारी ८० हजार कोटी रुपयांचा सुरत ते दक्षिणेतील राज्यांना जोडणारा नवीन रस्ता व पुणे ते छत्रपती संभाजी नगर रस्ता महाराष्ट्राचे भविष्य बदलविणारा रस्ता ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. अहमदनगर शहरातील द्वारका लॉन्स येथे ९६१ कोटी रुपये किंमतीच्या अहमदनगर शहर बाह्यवळण रस्ता, ९८० कोटी रुपये किंमतीच्या अहमदनगर-मिरजगाव-करमाळा-टेंभुर्णी पॅकेज (एक) अहमदनगर ते घोगरगाव, व पॅकेज (दोन) घोगरगाव ते चापडगाव या १०३२ कोटी रुपये किंमतीच्या रस्त्यांचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील,…

Read More

संगमनेर, दि. २६ राज्यातील वाळू तस्करीला लगाम लावण्यासाठी महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी नवे वाळू धोरण देखील आणले, मात्र वाळू तस्करांकडून बेकायदा वाळू उपसा सुरूच आहे. संगमनेर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका झेनॉन गाडीला भगवा ध्वज लावून वाळू तस्करी सुरू असल्याचे समोर आले. नगर एलसीबीने दोन दिवसांपूर्वीच संगमनेर मधील वाळू तस्करांवर कारवाई केली, याला काही तासांचा अवधी उलटत नाही तोच तालुका पोलिसांनी महसूलमंत्र्यांच्याच मतदारसंघातील पिंपरणे-जोर्वे रस्त्यावर केलेली कारवाई समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली असून संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, टाटा कंपनीच्या एम. एच. ४२ बी ४०२६ या…

Read More

संगमनेर, दि. २६ कोल्हार-घोटी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास जात आहे. मात्र याच मार्गाचा भाग असलेल्या आणि शहरातून जाणाऱ्या तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतच्या मार्गाचे मजबुतीकरण, डांबरीकरणासह अपूर्ण काम तातडीने करण्याची मागणी संगमनेर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र वाकचौरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधितांकडे केली आहे. तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतचा बहुतांशी भाग वाकचौरे नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये मोडतो. संगमनेरमध्ये कोल्हार घोटी मार्गाच्या पूर्णत्वाचे काम बहुतांशी झाले असल्याने या कामातून तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतचा म्हणजेच मेनरोडचे काम झाले नसल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या या रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरणाचे…

Read More

अजय अनिता दोघे ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघेही हुषार. त्यामुळे त्यांना लगेचच चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. हेही त्यांच्या लक्षात आले की They are in love. तेंव्हा त्यांनी लग्न करायचे ठरविले. दोघांच्या घरी एकमेकांची माहिती होतीच, त्यामुळे लगेचच दोन्ही घरचे भेटले व लग्न ठरलं. अनिताने मात्र सर्वांसमोर एक अट ठेवली. ती म्हणाली, मी एकत्र कुटुंबात राहणार नाही. हे ऐकून अजय व त्याचे आई-वडील तर चकित झालेच, बरोबर अनिताचे आई-वडील पण अनिताकडे आश्चर्याने बघू लागले. लगेचच अजयचे बाबा म्हणाले, ठीक आहे. मला अनिताचे कौतुक वाटतं की, तिने हे लग्नाआधी सर्वांसमोर सांगितले. थोडा वेळ द्या आम्हाला. आपण उद्या पुन्हा भेटू व पूढचे ठरवू,…

Read More

नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढचे तीन महिने पंतप्रधान नरेंद्र मोदी “मन की बात” करणार नाही. असे पंतप्रधान मोदी यांनी आज ११० व्या कार्यक्रमात देशाला संबोधित करताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा ११० वा भाग रविवारी सकाळी ११ वाजता प्रसारित करण्यात आला, यावेळी त्यांनी ही घोषणा केली. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी “मन की बात” करत असतात ऑल इंडिया रेडिओच्या ५०० हून अधिक प्रसारण केंद्रांद्वारे हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. या कार्यक्रमाची सुरुवात ३ ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आली होती. भारतीय समाजातील महिला, वृद्ध आणि तरुणांना समाविष्ट करून विविध घटकांशी जोडणे हा…

Read More

नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन असलेल्या तीन महत्त्वाच्या कायद्यात बदल करून नवे फौजदारी कायदे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याची अंमलबजावणी देशात एक जुलैपासून सुरू होईल. २० नव्या गुन्ह्यामध्ये आणि त्यासाठीच्या शिक्षेतही मोठा बदल करण्यात आला आहे. त्यासाठी नव्या कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवीन फौजदारी कायदे अनुक्रमे भारतीय दंड संहिता (IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) आणि भारतीय पुरावा कायदा डिसेंबर २०२३ मध्ये लोकसभेने पारित केला होता.याशिवाय सामूहिक बलात्कारात दोषी आढळल्यास २० वर्षांचा कारावास किंवा दोषी जिवंत असेपर्यंत तुरुंगवास अशी शिक्षा देण्यात येईल.…

Read More