Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ या काव्य पंक्तींपासून सुरू होणारे पैशाचे महत्व प्राथमिक शिक्षणातूनही अधोरेखित होते. हातात आलेला पैसा कसा वाचवायचा, त्याची बचत गुंतवणुकीत कशी परावर्तित करायची आणि त्यातून संपत्ती कशी निर्माण करायची याचे ज्ञान म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. ही आर्थिक साक्षरता प्राथमिक शिक्षणातूनच शिकवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक आणि आर्थिक गुंतवणूक तज्ञ सुनील कडलग यांनी केले. संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील जिल्हा परिषदेच्या रामवाडी शाळेत प्रजासत्ताक दिनी कडलग यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी ‘चला अर्थसाक्षर होऊयात’ हा उपक्रम उपक्रमशील शिक्षक केशव घुगे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थी व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – देशाच्या प्रगतीचा रथ सर्वसामान्य व्यक्तींच्या योगदानामुळेच पुढे जात आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी सामाजिक सुरक्षेचे योजनारुपी कवच तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनामार्फत यशस्वी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकचे आयुक्त डॉ. पंकज जावळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री विखे म्हणाले,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – प्रत्येकाला समान संधी, मतदानाचा अधिकार आणि समानता देणारी अशी भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्य घटना असून या राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांना धक्का लागू नये, यासाठी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या सर्व महापुरुषांच्या स्मरण करतानाच राज्यघटनेची तत्त्व जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी सर्वांनी कटिबद्ध असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अमृत उद्योग समूहाच्या सामूहिक ध्वजवंदन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात थोरात बोलत होते. विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. थोरात म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज बिबट्याच्या हल्ल्यात दहा दिवसांपूर्वी नऊ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही घटना संगमनेर राहता तालुक्याच्या सीमेवर घडल्या. हर्षल राहुल मोरे (रा. सादतपूर) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. दहा दिवसांपूर्वी लोणी येथे प्रवरा रुग्णालयासमोरील भर लोकवस्तीत असलेल्या गोसावी वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात अथर्व प्रवीण लहामगे या नववर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. याच घटनेची पुनरावृत्ती गुरुवारी पुन्हा झाल्याचे दिसून आले. लोणीपासून जवळच असलेल्या सादतपूर येथे गुरुवारी सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास गोरे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – महिला बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल व अन्य अधिकाऱ्यांसोबत अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर ५२ दिवसाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपात अखेर तोडगा निघाला आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या आहे. शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे तसेच ग्रॅच्युएटी व पेन्शनचा महत्त्वाचा निर्णय होत असल्याने अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने आपला संप मागे घेतला. सचिव आणि आयुक्तांसोबत झालेल्या आजच्या बैठकीला एम. ए. पाटील, ॲड. निशा शिवूरकर, शुभा शमीम, दिलीप उटणे, दत्ता देशमुख, सुवर्णा तळेकर, आप्पा पाटील, ॲड. माधुरी क्षीरसागर आदी उपस्थित होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे शासनाने मान्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जाणता राजा मैदानावर ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले “शिवपुत्र संभाजी” हे महानाट्य सादर होणार असून या महानाट्यात स्थानिक कलावंतांना संधी मिळणार आहे. यासाठी इच्छुक कलाकारांची ऑडिशन गुरुवारी (ता.२५) सकाळी १० वाजता शॅम्प्रो येथे होणार आहे डॉ. अमोल कोल्हे अभिनित आणि महेंद्र महाडिक लिखित दिग्दर्शित “शिवपुत्र संभाजी”हे महानाट्य ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान दररोज सायंकाळी ६ वाजता शहरातील जाणता राजा मैदानावर सादर होणार आहे. या महानाट्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे हे संभाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असून महाराणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – अचानकपणे २२ जानेवारीचा अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दौरा रद्द केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आपला आयोध्या दौरा निश्चित केला आहे. फेब्रुवारीमध्ये ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह अख्ख मंत्रिमंडळच घेऊन रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा २२ जानेवारीचा रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दौरा निश्चित होता. मात्र तत्पूर्वीच त्यांनी २० जानेवारीला रात्री उशिराने आपण अयोध्येला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणार नसल्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी त्यांनी लवकरच आयोध्या दौऱ्याबाबतची तारीख जाहीर करू असंही म्हटलं होतं. त्यानंतर आता प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर शिंदे यांनी आपला दौरा निश्चित केला आहे. https://twitter.com/ANI/status/1750075451526271069?s=19 या दौऱ्याची तारीख जाहीर करण्यात आली नसली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – फसवणुकीच्या एका गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी आरोपीच्या भावाकडे पाच लाखाची लाच मागणाऱ्या आणि त्यासाठी मध्यस्थी करत ४० हजाराची लाच स्वीकारणाऱ्या वकिलाला अँटी करप्शनने पकडले असून पोलीस उपनिरीक्षक आणि वकिलाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश वसंत चव्हाण (वय ३५ वर्ष) आणि राहुल जयसिंग फुलसुंदर (वय ३१ वर्ष) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षक व वकिलाचे नाव आहे. पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ही कारवाई केली आहे. लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदाराच्या भावा विरोधात पुणे शहरातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराच्या भावाला अटक न करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पद गेलं की माणसं पक्षापासून दुरावतात मात्र पद गेल्यानंतर देखील पक्षाशी आपली निष्ठा कायम ठेवत संगमनेर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी शिवसेनेच्या चढ-उतारामध्ये देखील वर्षानुवर्ष पक्षासोबत राहिलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांना “निष्ठा पुरस्काराने” गौरवत वेळोवेळी पक्ष बदलू पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपल्या कृतीतून सोमवारी चपराक दिली आहे. २३ जानेवारी हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती दिन. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिवसेनेचे राज्यव्यापी महा अधिवेशन आणि ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर कतारी यांनी सोमवारी संगमनेरमध्ये या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. याशिवाय शिवसैनिकांनी रचलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज निळवंडे (अहमदनगर) – निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. मात्र आता त्यांची पाण्याची प्रतीक्षा संपली आहे. डाव्या कालव्याप्रमाणे उजव्या कालव्याला देखील पाणी मिळाल्याने दोन्ही कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तर अनेकांच्या त्यागातून निळवंडे धरण आणि कालवा प्रकल्पपूर्ती झाल्याचे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी सांगितले. मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सोमवारी ऊर्ध्व प्रवरा निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी‌‌ यशस्वी झाली. यावेळी‌ खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, निळवंडे…

Read More