Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज श्रीरामपूर : संगमनेरमधील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत राजकीय प्रतिष्ठितांनी केलेल्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणाचा अद्याप तपास सुरू असतानाच आता लगतच्याच श्रीरामपूरमधील श्री संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांचे फसवणूक प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात संस्थापक, संचालकांसह १४ जणांविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२० महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात सनी किशोर अंबिलवादे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी श्री संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सोमनाथ रघुनाथ महाले, संचालक निखिल विजय नागरे, आशिष सुरेश क्षीरसागर,…

Read More

थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त तालुक्यातील ज्येष्ठांचा सन्मान महात्मा गांधींचा विचार हाच शाश्वत विचार : आमदार थोरात महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : काही विघातक शक्तींनी महात्मा गांधींना मारले असले तरी त्यांचे विचार कधीही मारता आले नाही. आजही जगभरातील ६०० विद्यापीठांमधून गांधी विचार शिकविला जातो. गांधी-नेहरू हा देशाच्या विकासाचा विचार आहे, तो कोणीही पुसू शकणार नसल्याचे स्पष्ट करत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे जीवनकार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहणार असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार विचारवंत मधुकर भावे यांनी काढले. सहकार महर्षी थोरात कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे जयंती शताब्दी वर्षानिमित्त सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जयंती महोत्सवात बॉलीवूडमधील आघाडीचा गायक जावेद आली यांनी गायलेल्या कजरारे, वंदे मातरम, पुष्पामधील श्रीवल्ली गाण्यासह विविध गीतांवर संगमनेरमधील तरुणाईने प्रचंड जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. जाणता राजा मैदानावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात जावेद आली लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम झाला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, राजवर्धन थोरात, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, शरयूताई देशमुख, डॉ. हर्षल तांबे आदींसह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जावेद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राजुर : झोपेत असतानाही आपल्यासाठी आपल्या पैशांनी काम केले पाहिजे. श्रीमंती प्रत्यक्षात उतरण्यासाठी व आपल्या ध्येयांना आणि स्वप्नांना अर्थ प्राप्त होण्यासाठी महागाईवर मात करणारी गुंतवणूक करून आपली स्वप्ने साकार केली पाहिजेत. त्यासाठीचे आर्थिक नियोजन म्हणजेच अर्थसाक्षरता होय, असे प्रतिपादन कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांनी केले. सत्य निकेतन संस्थेच्या रा. वि.पाटणकर सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांच्या संकल्पनेतून ‘गोष्ट पैशापाण्याची’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कडलग यांच्या मार्गदर्शनाने अर्थ साक्षरतेचे धडे गिरवले. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य आण्णासाहेब धतुरे, प्रा. शरद तुपविहिरे, प्रा. रमेश शेंडगे, प्रा. संतोष कोटकर, प्रा. बाळासाहेब घिगे आदी उपस्थित होते. कडलग यांनी अगदी डेबिट कार्ड कसे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अनंत पांगारकर @ ७५८८६००९५० संगमनेर : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील मुख्य मास्टर माईंड आरोपी राजकीय प्रतिष्ठित नेता भाऊसाहेब कुटे याच्यापर्यंत अद्याप आर्थिक गुन्हे शाखेला पोहोचण्यात अपयश आले असतानाच आता संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक प्रमुख आरोपी छत्रपती संभाजी नगर येथील चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आतापर्यंत अपवाद वगळता न्यायालयाने या प्रकरणातील बहुतांशी आरोपीचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेले आहेत. मात्र आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात घेता आरोपींची पोलीस चौकशी होणे आवश्यक असल्याने न्यायालयाने आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून देखील एकाही आरोपीला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे : पंचवीस वर्षीय तक्रारदार महिला आणि तिच्या दोन मित्रांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलिसांबरोबर तडजोड करतो, यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील असे सांगत तक्रारदार आणि तिच्या दोन मित्रांकडून फोन पे द्वारे पैसे स्वीकारणारा पुण्यातील वकील एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे. सुमित नामदेवराव गायकवाड (वय २५ वर्ष, रा. सेवागिरी निवास, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे नाव आहे. तक्रारदार महिलेच्या व्यक्तिगत कारणावरून तिच्या दोन मित्रांना कोथरूड पोलिसांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीमध्ये नेले होते. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या मित्रांचे ओळखीचे वकील सुमित गायकवाड यांनी तक्रारदार आणि तिच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलिसांसोबत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : गेल्या ते दोन वर्षापासून सुरू असलेल्या शिवसेनेतील सत्ता संघर्षाचा निकाल अखेर बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचे सांगत त्यांचे सोळा आमदारही त्यांनी पात्र ठरविले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पदे कायम राहणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सत्ता संघर्षाचा निकाल विरोधात गेल्याने ठाकरे आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची चिन्हे आहेत. सर्वच राजकीय पक्षांसह राज्यातील जनतेचे शिवसेना नेमके कोणाची? एकनाथ शिंदे यांना समर्थन देणारे आमदार अपात्र की उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे आमदार अपात्र याकडे लक्ष लागून होते. निवडणूक आयोगामध्ये दाखल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राजुर : उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकास आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व कडलग इन्व्हेस्टमेंटचे डायरेक्टर सुनील कडलग यांनी केले. सत्यनिकेतन संस्थेच्या ॲड. मनोहरराव नानासाहेब देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्यावतीने आयोजित व्यक्तिमत्व विकास समुपदेशन कार्यशाळेत संभाषण कौशल्य या विषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. भाऊसाहेब देशमुख होते. यावेळी प्रा. संदेश कासार, प्रा. सौ. बंगाळ उपस्थित होते. कडलग म्हणाले, महाविद्यालयात येणारा प्रत्येक विद्यार्थी भविष्यातील स्वप्ने पाहत असतो. मात्र, उत्तम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेर नगरपालिका हद्दीतील संजय गांधी नगर वडारवस्ती येथील झोपडपट्टी धारकांना घरपट्टी लागू करून त्यांना हक्काचा असेसमेंट उतारा मिळावा, याकरता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह शिवसेना नेते अमर कतारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून यामुळे सर्व नागरिकांना हक्काचा उतारा मिळणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे. तांबे म्हणाल्या की, संजय गांधी नगर वडार वस्ती येथील झोपडपट्टी धारकांना घरपट्टी लागू करून त्यांना उतारा द्यावा, याकरता शिवसेनेचे तत्कालीन शहराध्यक्ष अमर कतारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याबाबत त्यांनी नगरपालीकेकडे वेळोवेळी मागणी करून वेळप्रसंगी आंदोलनही केली. या मागणीचा विचार करून काँग्रेस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : स्थानिक सत्ताधाऱ्यांना त्यांच्या मंत्रीपदाच्या व चाळीस वर्षाच्या कार्यकाळात लोकांचे प्रश्न सोडविता आले नसल्याचा आरोप करत संगमनेर शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या संजय गांधी नगर झोपडपट्टी व वडार वस्ती झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडल्याची माहिती संगमनेरचे माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी दिली. मंगळवारी मंत्री विखे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीसाठी गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांच्यासह संजय गांधी नगर वडार वस्ती येथील प्रतिनिधी…

Read More