Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि. ९ डिसेंबर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर बसस्थानकावर बसविण्यात यावा, यासाठी नगरपालिकेने दिलेल्या प्रस्तावास मंजुरी द्यावी. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्याठिकाणी सुशोभीकरणासाठी, विश्वयुध्दात सहभागी असलेले व व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त शहीद नामदेवराव जाधव यांच्या स्मारकास प्रत्येकी १ कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा, यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. यासंदर्भात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तांबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले. आमदार तांबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीमुळे काँग्रेसचे पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह वैभवशाली स्मारके होण्याचा मार्ग…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि. 9 डिसेंबर महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग व एज्युकेशन सप्लाय अँड फ्रँचाइजी यांच्यावतीने मेरिटवर दिला जाणारा स्टार एज्युकेशन अवार्ड (Star Education Award 2023, only on Merit ) ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगीरी केल्याबद्दल दिला जाणारे या पुरस्काराचे वितरण नुकतेच मुंबईत करण्यात आले. प्राचार्य डॉ. गायकवाड हे गेल्या ३५ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करत आहे. ते संगमनेर महाविद्यालयात प्राचार्य पदाबरोबरच वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख म्हणुन कार्यरत आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बिझनेस लॉ बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष, व्होकेशनल कॉमर्स अभ्यासमंडळाचे अध्यक्ष, विद्यापरीषद सदस्य, अकौंटन्सी अभ्यासमंडळ सदस्य, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा सदस्य इत्यादी अधिकार मंडळामध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर, दि. ८ डिसेंबर – शुक्रवारी संगमनेरमध्ये झालेल्या कांदा लिलावात भाव अचानक कोसळल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समिती बाहेर नाशिक पुणे महामार्गावर तब्बल दीड तास ठिय्या देत आंदोलन केले. कांद्याचे फेर लिलाव करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले मात्र तरी देखील व्यापाऱ्यांकडून लिलाव सुरू होत असल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी सभापतींच्या दालना बाहेर आंदोलन सुरू केले अखेरीस सायंकाळी पाच वाजता सुमारास बाजार समितीच्या पदाधिकारी आणि सचिवांनी केलेल्या मध्यस्थीनंतर कांद्याचे फेर लिलाव पुन्हा सुरू झाले. गेल्या काही दिवसांपासून वधारलेल्या कांद्याला शुक्रवारी थेट दोन ते अडीच हजार रुपयांचा भाव संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळू लागल्याने अचानकपणे व्यापाऱ्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर, दि. ८ – दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यावरून राज्यभर मोर्चे, आंदोलने सुरू सुरू असताना सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही, उलट दुग्धविकास मंत्री राज्यातील दुधात भेसळ आहे असे सांगून दूध उत्पादकांची बदनामी करत आहे. त्यामुळे राज्यातील दुधाकडे संशयित नजरेने पाहिले जात असून खाजगी दूध संस्थांची चंगळ सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला. दुधाच्या प्रश्नावर असलेल्या स्थगन प्रस्तावावर सभागृहात सत्ताधाऱ्यांनी चर्चा नाकारल्यानंतर सभागृहाच्या पायऱ्यांवर थोरात यांनी दुधाच्या प्रश्नावरून सरकारला घेरल्याचे दिसून आले. थोरात म्हणाले, दूध दरावरून राज्यभर आंदोलने सुरू आहे. शेतकऱ्यांना २४ ते २५ रुपये दराने दूध…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – शिंदे-फडणवीस-पवारांच्या महायुती सरकारने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांकरिता पुरवणी मागण्यांमध्ये प्रत्येकी 40 कोटी रुपयांची तरतूद केली. निधी वाटपावरून असलेली सत्ताधारी आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करताना विरोधी आमदारांना मात्र या निधीतून धावण्यात आल्याने त्यांच्या वाट्याला निराशा आली आहे. पाच राज्यातील निवडणुका नंतर आता लोकसभेच्या तयारीला लागलेल्या महायुतीच्या सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मतदारांना खुश करण्यासाठी तब्बल ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते आणि अन्य कामांसाठी या सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये केलेली ५५ हजार ५२० कोटींची तरतूद हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. यात सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी ४० कोटींचा निधी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर – दि. ७ डिसेंबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे सरकार असवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र सरकारने चर्चा तर सोडा साधे निवेदन सुद्धा केले नाही. असा घनाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. नागपूर येथील अधिवेशनाचा पहिलाच दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून गाजला. पायर्यांवर आंदोलन केल्यानंतर सभागृहात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी सरकारकडे लावून धरली. मात्र अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज रेटत विरोधकांची चर्चा करण्याची मागणी फेटाळली. त्यामुळे संतापलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकार…
महाराष्ट्र संवाद न्यूज – लोणी, दि. ७ डिसेंबर पोलीस पथकासह बेकायदेशीर कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्राणी कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांवर पिस्टलने फायरिंग करत गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या १६ जणांवर लोणी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटने संदर्भात गुरुवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यात ही घटना घडली. या संदर्भात प्राणी कल्याण समिती मुंबई हायकोर्ट महाराष्ट्र शासन या संस्थेत अधिकारी असलेल्या अप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडे (वय 39 वर्ष, रा. राहुरी) यांच्या फिर्यादीवरून नियाज कुरेशी, सद्दाम कुरेशी, अरबाज कुरेशी, नजीम कुरेशी, साजिद कुरेशी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. ७ डिसेंबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबरोबरच संविधानकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संगमनेरच्या लौकिकाला साजेसे स्मारक उभारणार असल्याचे सांगत आणखीही महापुरुषांची स्मारके उभारणार असल्याची ग्वाही नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन प्रसंगी तांबे बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, श्रीमती कुसुम माघाडे, के. एस. गायकवाड, विनय घोसाळे, विलास दारोळे, विनोद गायकवाड, भास्कर बागुल आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. आमदार तांबे म्हणाले, जगातील सर्वात मोठी लोकशाही व राज्यघटना देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा व मानवतेचा विचार सर्वांनी पुढे घेऊन…
महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. ५ डिसेंबर पोलीस दप्तरी बंद असलेले संगमनेर मधील बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच असल्याचे अहमदनगर एलसीबीच्या छाप्यात समोर आले आहे. अनेक प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कारवाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या संगमनेर पोलिसांच्या हद्दीत थेट एलसीबी छापेमारी करत कारवाया करत आहे. यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणेचे पितळ उघडे पडत असले तरी एलसीबीच्या कारवाया देखील अनेकदा संशयाच्या वलयात अडकलेल्या दिसतात. बुधवारी सकाळी साडेसात वाजता मोगलपुऱ्यातील बेकायदेशीर कत्तल खानावर अहमदनगर एलसीबी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत एक लाख वीस हजार रुपये किमतीचे गोवंश जनावरांचे कत्तल केलेले सहाशे किलो गोमांस ताब्यात घेतले. याशिवाय कत्तरीसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. अहमदनगर एलसीबीचे पोलीस नाईक सचिन…
महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. ६ डिसेंबर संगमनेर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारक उभारले जाईल अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी संगमनेर येथे डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या अभिवादन सभेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज भेट दिली. या भेटीत त्यांनी संगमनेरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा केली. मागील महिन्यात विखे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा संगमनेरात उभारला जाईल, अशी घोषणा…
