Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाने (राजहंस दूध) दीपावलीच्या अगोदरच दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, दूध वाहतूक ठेकेदारांचे पेमेंट, अनामत, कामगारांचा बोनस, मेहनताना, पगार, व्यापारी देणे, चढ-उतार निधी असे एकूण 35.66 कोटी रुपये संबंधितांच्या खात्यावर बँकेत वर्ग करण्यात आल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली. देशमुख म्हणाले, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या राजहंस दूध संघाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली. दूध संघाच्या माध्यमातून सातत्याने शेतकरी व नागरिकांना मदत करण्यात आली. थोरात यांच्याच…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेर तालुका विज्ञान गणित संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आले आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या तालुका विज्ञान संघाच्या अध्यक्षपदी मनोज ऊपरे व सचिवपदी दत्तात्रय खरात यांची तर गणित अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब राऊत व सचिवपदी अनिल वाकचौरे यांची निवड करण्यात आली. संगमनेर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघाची बैठक राज्य विज्ञान महामंडळाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर मधील दिगंबर गणेश सराफ विद्यालयात पार या बैठकीसाठी पुढील तीन वर्षासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. याच बैठकीमध्ये अध्यक्ष सचिवांसह संपूर्ण कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून निवडण्यात आलेली विज्ञान संघाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे : प्रताप जोंधळे (उपाध्यक्ष),…
सहकार महर्षी थोरात कारखान्याच्या ५७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मराठा आरक्षणासंदर्भात डॉ. तांबे म्हणाले… महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : कारखान्याचे व्यवस्थापन कसे असावे, याचा आदर्श नमुना सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखाना असून येथे होत असलेल्या उत्तम प्रकारच्या कामामुळे हा कारखाना सहकारातील इतर कारखान्यांसाठी मापदंड ठरला आहे, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांच्या हस्ते साध्या पद्धतीने झाला. यावेळी जेष्ठ नेते बाजीराव खेमनर, इंद्रजीत थोरात, सुधाकर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील साखळी उपोषणाला संगमनेर मधील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी उपोषणस्थळी उपस्थित राहत पाठिंबा दर्शविला आहे. “जय जिजाऊ जय शिवराय”, “मराठा आरक्षण आमच्या हक्काचे”, या घोषणांनी उपोषण स्थळ दुमदुमले होते. जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष डॉ. दिपाली पानसरे, डॉ. श्रद्धा वाणी, ॲड. सीमा काळे-सातपुते, माधुरी शेवाळे, वृषाली कडलग, स्नेहलता कडलग, वनिता कर्पे, नम्रता दिघे, सुधा नवले, सुदेशना वाणी, वृषाली साबळे, कस्तुरी शेवाळे आदींसह महिला यावेळी उपस्थित होत्या. वाणी यांनी संभाजी ब्रिगेडचा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले. ॲड. सीमा काळे-सातपुते म्हणाल्या, मराठा आरक्षण आमच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता : राहाता विधानसभा मतदारसंघात दहशतीचे झाकण उडाले आहे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे या जोडीने शेतकरी सभासद आणि कामगारांच्या हिताची भूमिका घेतली असून आजवर राहाता तालुक्यातील जनतेला गृहीत धरणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच आधी आमच्या बहिणींचे देवदर्शन आणि आता रेशन कार्ड धारकांना पाच किलो साखर हे निर्णय झालेले आहेत. थोरात-कोल्हे जोडीचा पायगुण चांगला असून त्यांच्यामुळेच जनतेची दिवाळी गोड होणार आहे, असे मत ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर यांनी व्यक्त केले. डॉ. गोंदकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नुकतेच गणेश सहकारी साखर कारखान्याचे धुराडे पेटले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : सर्वधर्म समभावाचा विचार जोपासत देशाच्या एकात्मतेसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस पक्षाची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी प्रांताध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झाली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या या कार्यकारिणीमध्ये सचिन गुजर (वरिष्ठ उपाध्यक्ष), प्रशांत दरेकर, ॲड. कैलास शेवाळे, डॉ. एकनाथ गोंदकर, प्रा. हिरालाल पगडाल, मधुकरराव नवले, अजय फटांगरे, अंकुश कानडे, राकेश पाचपुते, बाबासाहेब दिघे, ज्ञानेश्वर मुरकुटे, संपतराव मस्के, कारलोस साठे, दादा पाटील वाकचौरे, बापूसाहेब काळदाते, बाबासाहेब कांदळकर, मिनानाथ पांडे, प्रकाश भोसले, श्रीनिवास बिहानी, बाबासाहेब गुंजाळ, लताताई डांगे, सचिन गायकवाड व रोहिदास…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : या राज्याचा एक उपमुख्यमंत्री काडीखोर आहे, असं विधान मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर एक फूल आणि दोन हाफ हेच काडीखोर आहेत. यांनीच महाराष्ट्र पेटवला आहे. यांनाच महाराष्ट्र पेटलेला हवाय. यांनीच राज्यातील सर्व प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रश्न चिघळत ठेवलेला आहे, असं टीकास्त्र शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री, आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सोडले आहे. राऊत म्हणाले, मरठा आरक्षणाचा मुद्दा या सत्ताधाऱ्यांनीच चिघळत ठेवला आहे. कारण, त्यांना इतर मुद्यांवरून लक्ष भरकटवायचं आहे. त्यामुळे जरांगे पाटील म्हणाले की, एक उपमुख्यमंत्री काडीखोर आहे तर तसं नाही, एक फुल आणि दोन हाफ हे सगळेच काडीखोर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अहमदनगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने उत्कृष्ट कामगिरी करताना तीन सुवर्ण पदकांसह सहा पदके मिळवली. जिल्हा क्रीडा कार्यालयाने आयोजित केलेली ही स्पर्धा भिंगार येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूलमध्ये पार पडली. अकरा वर्षांखालील मुलांच्या गटात सर्वेश जाधव याने सुवर्ण तर चौदा वर्षांखालील गटात सोहम मेहेर याने रौप्यपदक मिळवले. सतरा वर्षांखाली मुलींच्या गटात गुंजन जोशीने सुवर्ण आणि तनिष्का वर्पेने रौप्य पदकाची कमाई केली. तर, 19 वर्षांखालील गटात सर्वदा बाणखेलेने सुवर्ण व आविश्री इंदाणीने रौप्य पदक मिळवले. या संपूर्ण स्पर्धेत ध्रुव ग्लोबलच्या स्केटिंग खेळाडूंनी तीन सुवर्ण व तीन रौप्यसह एकूण सहा पदकांची कमाई केली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता – खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले असताना देखील शासनाने काढलेल्या सन २०२३ च्या खरिप हंगामातील दुष्काळ मुल्यांकनातील शासन निर्णयात अहमदनगर जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नसल्याने हे जिल्हाच्या पालकमंत्र्याचे अपयश नाही का? असा सवाल कृषीभुषण प्रभादेवी जनार्दन घोगरे यांनी उपस्थित केला आहे. दुष्काळी परिस्थितीचा अहमदनगर जिल्ह्याला देखील मोठा फटका बसलेला असताना शासन निर्णयात अहमदनगरचा समावेश करण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांच्या खरीपाच्या सोयाबीन, बाजरी या पिकांच्या सोंगण्या करुन खळे झालेली आहे. त्यातुन मिळालेले उत्पन्न पाहता येथील शेतकरी शंभर टक्के पिकविम्याचा परताव्याला पात्र आहेत. खरीप हंगामात शेतकर्यांनी घेतलेले सोयाबीन, बाजरी ही हलक्या मुरमाठ जमीनीवर घेतलेली पिके पावसाआभावी पुर्णपणे…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : फटाक्याच्या स्टॉलसाठी आवश्यक असलेली परवानगी देण्याकरिता 800 रुपयांची लाच घेणाऱ्या संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत विभागाने पकडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाने पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांच्यावर ही कारवाई केली. दीपावली सणानिमित्त निंबाळे गावी फटाका स्टॉलसाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या ना हरकत दाखल्याची आवश्यकता होती. आवश्यक असलेली ना हरकत परवानगी देण्यासाठी यादव यांनी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची मागणी केली असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. यासंदर्भात संगमनेर तालुक्यातील निंबाळे येथील एका 20 वर्षीय तरुणाने अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मंगळवारी (31 ऑक्टोंबर) तक्रार केली होती. लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या…
