Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवकांना आत्महत्या करू नका अशी कळकळीची विनंती करून देखील राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आत्महत्येचे लोन आता संगमनेरपर्यंत येऊन धडकले आहे. आंदोलकांना भेटण्यासाठी आलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना “विखे पाटील परत जा, परत जा” या आंदोलकांच्या निदर्शनाचा सामना करावा लागल्यानंतर आता संगमनेरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये सागर भाऊसाहेब वाळे (वय 25 वर्ष) या तरुणाने गळफास घेऊन मंगळवारी (31 सप्टेंबर) पहाटे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर वाळे याने घराच्या मागे असलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : हजारो शेतकऱ्यांच्या अन्नाशी निगडित असलेल्या आणि संगमनेरची कामधेनु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी (ता. २ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात व त्यांच्या पत्नी कांचनताई यांच्या हस्ते तर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याची माहिती देण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देणारा अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. दिवंगत नेते भाऊसाहेब थोरात यांची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : बंद घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश करत पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दागिने चोरास पोलीस उपाधीक्षक व शहर पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. पकडलेल्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्ह्यामध्ये एका अल्पवयीन आरोपीसह एका महिलेचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच पकडलेल्या आरोपीकडून आणखी काही गुन्हे समोर आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. इम्रान चाँद शेख (वय 29 वर्षे, मुळ रा. एकतानगर, संगमनेर, ता. संगमनेर हल्ली रा. गल्ली नं 1, रमजानपुरा, ता. मालेगाव जि. नाशिक) असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीसोबत पोलिसांनी त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेवुन केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ संगमनेरमध्ये सुरू असल्यास साखळी उपोषणास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन पाठिंबा दिला असून सरकारने तातडीने आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. संगमनेर बस स्थानक येथे सुरू असलेल्या मराठा समाज आरक्षण मागणीच्या साखळी उपोषणास रविवारी आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली. यावेळी समवेत नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सुरेश थोरात, निखिल पापडेजा, लाला बेपारी, दत्ता जोंधळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी आलेल्या राज्याच्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना काही आंदोलकांच्या घोषणांना सामोरे जावे लागले. “विखे पाटील परत जा, परत जा”, “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणांनी विरोध करणाऱ्या आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी साखळी आंदोलने उपोषणे सुरू आहे. राज्यभरातून त्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून संगमनेरमध्ये देखील बस स्थानकाच्या प्रवेशद्वारात बाहेर मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलने सुरू आहेत. जरांगे पाटील स्वतः आमरण उपोषणाला बसले असून त्यांना पाठिंबा म्हणून राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी साखळी उपोषणे सुरू आहेत. मराठा आरक्षणाचा विषय मनोज जरांगे यांचे उपोषण व त्यांना मिळालेल्या राज्यभरातील पाठिंबा नंतर चांगलेच ऐरणीवर आले आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण जाहीर करण्यासाठी चाळीस दिवसांचा वेळ देऊन देखील सरकार आरक्षण जाहीर करू शकले नाही. राज्य सरकार खोटेनाटे कारणे पुढे करत मराठा समाजाला झुलवत आहे. यामुळे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी थेट राज्य सरकारचे प्रतिकात्मक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष @ प्रवीण पुरो उपदेशाचे डोस पाजण्यासाठी परंपरेने प्राप्त झालेल्या विजया दशमीच्या मेळाव्यांचा जो तो पध्दतशीर वापर करू घेऊ लागला आहे. उध्दव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानातून तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरच्या संघ मुख्यालयावरून आपापल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. वर्षोत्सव असल्याने कोणी काय बोलावं याला मर्यादा नसतात. यामुळे नेते काय बोलतील, हे कोणीही सांगू शकत नाही. यातले पहिले दोन नेते जरा नवखेच. उध्दव ठाकरे यांच्या पक्षावर झालेल्या अन्यायामुळे ते सत्ताधार्‍यांवर शरसंधान करतील, हे अपेक्षितच. मुख्यमंत्र्यांसाठी कोणताच पर्याय नसल्याने ते विरोधकांची रेवडी उडवतील हे ही तितकंच ठरलेलं होतं. पण बुजूर्ग असलेले सरसंघचालक मोहन…

Read More

स्मशानभूमीसाठी पालकमंत्र्यांकडे मी निधी मागितला निकृष्ट काम मात्र ग्रामपंचायत सदस्य आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भागीदारीत! निषेध ठराव घेताना कामाची गुणवत्ता नियंत्रण पथक करून तपासणीचा ठराव झाला असता तर भ्रष्ट्राचाराला पाठीशी घालणारे उघड पडले असते महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेरमध्ये विकास कामाच्या नावाखाली सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला अमोल खताळ विरोध करत आहे. त्यांचे काम चांगले सुरू असल्यामुळे विनाकारण त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान आमच्या गावातील लोकांना हाताशी धरून आमदार, त्यांचा भाऊ व एक ठेकेदार करत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस वाल्मीक शिंदे यांनी केला आहे. संगमनेर तालुक्याच्या विकासात योगदान नसलेले व चिकणी गावाशी कोणताही संबंध नसताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शैक्षणिक क्षेत्रासह खेळांमध्येही आपला दबदबा निर्माण करणार्‍या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासन संघाने सीबीएसईची प्रादेशिक योग स्पर्धाही गाजवली. या स्पर्धेत ध्रुवच्या योगासन खेळाडूंनी सांघिक व वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारात चमकदार कामगिरी बजावतांना तीन गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. योगासनांच्या विविध प्रकारांमध्ये केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाच्या बळावर ध्रुवला १९ सुवर्णसह एकूण २५ पदकांची कमाई झाली. कर्नाटकची राजधानी बेंगलुरुमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या ध्रुव ग्लोबलच्या सर्व स्पर्धकांची पुढील महिन्यात गाझीयाबाद येथे होणार्‍या सीबीएसई नॅशनल गेम्ससाठी निवडही करण्यात आली आहे. चौदा वर्षांखालील मुलींच्या सांघिक प्रकारात तृप्ती डोंगरे, देवांशी वाकळे, वैदेही मयेकर, रिद्धी लगड व नीरल वाडेकर यांच्या संघाने प्रथम क्रमांक…

Read More

सत्तेच्या गैरवापरातून सुरू असलेली दमदाटी सहन करणार नाही – आनंद वर्पे महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या विकासात कोणतीही योगदान नसणारे व चिकणी गावात कोणताही संबंध नसताना पालकमंत्री समर्थक व स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी गावात येऊन केलेली तोडफोड व दमदाटी खपवून घेणार नसून या विरोधात चिकणी ग्रामस्थांनी एकत्र येऊन निषेध नोंदवत पोलिसांना निवेदन दिले आहे. तर सत्तेच्या गैरवापर करून अशी दमदाटी सहन करणार नाही असा इशारा तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे यांनी दिला आहे. चिकणी येथे झालेल्या ग्रामसभेत एकमताने याबाबत ठराव करण्यात आला. यावेळी किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद वर्पे, दूध संघाचे संचालक विलास वर्पे, भारत वर्पे,…

Read More