Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज मतिमंद २१ वर्षीय मुलीला घरातून जवळच्या जंगलात नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतून १० हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले आहेत. अर्जुन अण्णासाहेब जोशी (रा. पट्टेवाडी, जवळे बाळेश्वर, ता. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अत्याचारित महिला मतिमंद असल्याने अतिशय गुंतागुंतीच्या ठरलेल्या या खटल्यामध्ये सहाय्यक सरकारी वकिलांनी अतिशय कौशल्याने आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध करत आरोपीला शिक्षेपर्यंत नेले. दरम्यान या प्रकरणी तपासातील काही कमकुवत बाबी देखील समोर आल्या असून न्यायालयाने याबाबत आपले निष्कर्ष नोंदविले आहेत. त्यामुळे हे निष्कर्ष…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सत्ताधारी काँग्रेस पक्षाने संगमनेर नगर परिषदेत गेल्या ३० वर्षात केले नाही ते आता आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये करून दाखविणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी म्हटले आहे. जहागीरदार यांनी म्हटले आहे की, गेल्या ३० वर्षांपासून संगमनेर नगर परिषदेमध्ये आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आहे. संगमनेर नगरपलिकेत दर चार वर्षानी मालमत्तेचे (घरपट्टी) रिव्हिजन होते. रिव्हिजनचा अर्थ असा होतो की, नगरपलिका हद्दीतील जी मालमत्ता आहे त्यात काही बदल झाल्यास, नवीन इमारती, जुन्या इमारतीच्या जागेवर नवीन इमारत, जागेत बदल झाल्यास त्याचे फेर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ९ ते १२ जून २०२४ या कालावधीत अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील क्लार्क काउंटीत असलेल्या कोलंबिया नदीच्या उत्तर तीरावरील व्हँकुव्हर या शहरात होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत एचडीएफसी लाईफ इ्शुरन्स कंपनीची अभिकर्ता धनश्री सुनील कडलग ही तरुणी सहभागी होत आहे. येथील एचडीएफसी लाईफ इ्शुरन्स कंपनीची अभिकर्ता असलेल्या धनश्री कडलगला विमा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा एमडीआरटी हा सन्मान प्राप्त झाला आहे. यामुळे ती अमेरिकेत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत सहभागी होत आहे. धनश्री हिला एमडीआरटी होण्यासाठी तिचे वडील ‘कडलग इन्व्हेस्टमेंट’चे संस्थापक सुनील कडलग यांच्यापासून प्रेरणा मिळाली. सुनील कडलग हे गेल्या २७ वर्षापासून म्युच्युअल फंड वितरक, जीवन व मेडिक्लेम विमा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. येथील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष लेख @ प्रवीण पुरो  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या स्वप्नातल्या दुनियेत वावरत असावेत. त्यांना भाजपच्या प्रचंड शक्तीचा इतका अहंकार जडला आहे की कोण जाणे. यामुळेच ते आता भाजप म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे भाजप अशा समीकरणात जगत आहेत. भाजपची राज्य जबाबदारी त्यांच्याकडे आल्यापासून काय करू आणि काय नको, असं त्यांचं झालेलं दिसतं. त्यांना 2024 च्या निवडणुकीत भाजपला विजयी करायचं आहे, ते ही 48 पैकी 45 जागा घेऊन. प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाला जिंकून आणणं ही त्यांची जबाबदारीच आहे. पण 48 पैकी 45 जागा जिंकणार म्हणजे सहकार्‍यांच्या वाट्याला ते तीनच खासदार देणार आहेत. बाजार खुळ्यांचा का ते…

Read More

फसवणूक करून घारगाव पोलिसांनी केली लाय डिटेक्टर (पॉलीग्राफ) चाचणी.. मयताच्या बँक खात्यातील लाखो रुपये गायब ? घारगाव पोलिसांच्या भूमिकेबाबत आणि तपासाबाबत अनेक शंका, तक्रारी आणि आरोप महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील पठार भागात घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वृद्ध व्यक्तीच्या खून प्रकरणाचे चांगलेच पडसाद उमटले असून या गुन्ह्यात अद्याप खुनी सापडलेला नसताना पोलिसांकडून मयताच्या नातेवाईकांची चौकशी आणि त्यांना त्रास देण्याचे काम चालू असल्याचा आरोप मयताचे मावसभाऊ भागाजी आवटे यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास संशयास्पद असून ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचे काम चालू आहे. मयताचा खून हा जमीन आणि प्रॉपर्टी साठी झाला असल्याचा आरोप देखील आवटे यांनी केला आहे. एप्रिल…

Read More

शिक्षणाचे खासगीकरण व कंत्राटीकरण थांबवा थांबविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह संघटनांचे पदाधिकारी उतरले रस्त्यावर… शिक्षणाची प्रयोगशाळा थांबवा- आमदार तांबे महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर -शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असून गोरगरीब, आदिवासी, शेतमजूर यांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क शासन चुकीच्या धोरणातून हिरावून घेत आहे. सरकारने शिक्षणाची प्रयोगशाळा तातडीने बंद करावी, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे युवा आमदार सत्यजित तांबे यांनी केली. शिक्षणाचे खाजगीकरण, कंत्राटी भरती, समूह शाळा या निर्णयाविरोधात संगमनेर तालुका समन्वय समितीच्यावतीने विद्यार्थी, पालक, शिक्षक, विविध शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांसह विविध संघटनांच्यावतीने यशोधन कार्यालय ते प्रांताधिकारी कार्यालय असा विराट जनआक्रोश मोर्चा शनिवारी काढण्यात आला होता. यामध्ये विधान परिषदेचे युवा आमदार सत्यजित तांबे, माजी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज समन्यायी पाणी वाटपाचे तत्व हे तत्कालीन काळजीवाहू सरकारच्या काळात अधिकारी पातळीवर ठरविले गेले होते. हे तत्व आपल्याला देखील मान्य नसल्याने या विरोधात सर्वप्रथम संगमनेरनेच आंदोलने करीत आवाज उठविला असल्याचे स्पष्ट करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपण निळवंडे धरण आणि कालव्यांचा प्रश्न मार्गी लावल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते जलनायक, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  सिन्नर – फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब आणि व्हाट्सअपसारख्या सामाजिक माध्यमांच्या आभासी जगात वाहवत जाऊ नका. यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट आणि बुद्धिमत्तेला पर्याय नाही. म्हणूनच आपल्या जीवनातील ध्येय निश्चित करून मार्गक्रमण करा, असा सल्ला प्रेरणादायी वक्त्या व समुपदेशक डॉ. एकता वाबळे यांनी दिला. येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या भिकूसा हायस्कूल येथे ‘नव्या युगाच्या नव्या दिशा’ या व्याख्यानावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे होते. वाबळे म्हणाल्या, आपल्या मनाला दररोज सकारात्मक सूचना द्या आणि जीवनात चांगले बदल घडवून आणणाऱ्या माणसांविषयी आणि परमेश्वराबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आभासी सामाजिक माध्यमांच्याद्वारे चांगलेही घेता येते तेवढेच घ्या. स्क्रीन टाईम कमी करा. आपण जे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर पोलिसांच्या निष्क्रियतेचे उदाहरण समोर आले आहे. पोलिसांच्या तपासाअभावी एका खून प्रकरणाचा उलगडा होण्यास विलंब लागत असल्याने मृत व्यक्ती आणि त्याच्या नातेवाईकांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा महिन्यांपूर्वी एका वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयित आरोपींची लाय डिटेक्टर (पॉलीग्राफ) चाचणीसुद्धा केली आहे मात्र तरीही पोलिसांना अद्यापही खुनी सापडला नसून यामुळे पोलिसांचे अपयश उघड झाले आहे. फक्त गुन्हे दाखल करून पुढील तपासात काहीही निष्पन्न होत नसल्याचे प्रकार अथवा निष्पन्न न करण्याचा निष्काळजीपणा संगमनेर पोलिसांकडून होत आहे. यात संगमनेर उपविभागातील सर्वच पोलीस…

Read More

आर्थिक गुन्हे शाखा चार संचालकांची आज करणार चौकशी महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर आदर्श सहकारासाठी राज्यात दिशादर्शक ठरलेल्या संगमनेरच्या सहकाराला कलंकित करणाऱ्या दूधगंगा सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे, त्याचे कुटुंबीय आणि अन्य काही राजकीय प्रतिष्ठित आरोपी पोलिसांना सापडत नसतानाच आता आता आर्थिक गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने संस्थेच्या चार संचालकांना गुरुवारी (ता. १९ ऑक्टोंबर) चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस धाडली आहे. या चारही संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने स्वतंत्रपणे नोटीसा बजावल्या असल्याची माहिती समोर येत आहे. यात संगमनेरमधील काँग्रेसच्या आणखी एका बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असून संचालक राहिलेल्या सर्वांनाच राजकीय…

Read More