Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – व्यवसाय कर रद्द करून देण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांचे लाच घेताना नाशिकमध्ये महिला अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. स्नेहल सुनील ठाकूर असे या महिला व्यवसाय कर अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचेचे कारण: दोन वर्षांपासून बंद असलेल्या कल्पदीप इंडस्ट्रियल सिक्युरिटी सर्विसेस या कंपनीचा व्यवसाय कर रद्द व्हावा, यासाठी तक्रारदाराने 13 सप्टेंबरला व्यवसाय कर अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. हा व्यवसाय कर रद्द करून द्यायच्या मोबदल्यात व्यवसाय कर अधिकारी स्नेहल ठाकूर (वय 52, रा. ग्रँड अश्विन हॉटेल जवळ, ASM 26/26 अश्विन संकुल रो हाऊस नंबर 4, अश्विन नगर, नाशिक) यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जिल्ह्यातील जनतेला न्याय देण्यासाठी शासन कटीबध्द आहे. अनेक वर्षे सता असूनही ज्यांना तालुक्याला पाणी देता आले नाही त्यांनी आम्हाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये. पालकत्व कसे निभावयाचे ते आम्हांला चांगले कळते. तुम्हीच आमच्याकडून काही शिका, अशी खोचक टिका महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर केली. संगमनेर येथील शासन आपल्या दारी’ या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना महसूलमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचार्यांवर दहशत करण्यापेक्षा दुष्काळाकडे गांभीर्याने बघा, दहशत करून किंवा धमक्या देऊन संगमनेरचा विकास तुम्ही रोखू शकत नाही. थोडे लक्ष राहाता तालुक्यातही घाला. तेथील जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून आपली अधिक आवश्यकता आहे. पालकमंत्री म्हणून राहा, मालक असल्यासारखे वागू नका, असा सल्ला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री विखे यांना दिला. थोरात म्हणाले, पालकमंत्री पालकाची भूमिका विसरून मालकाच्या भूमिकेत आलेले दिसतात. संगमनेरमध्ये येऊन अधिकारी कर्मचार्यांसह विकास कामे पूर्णत्वाकडे नेणार्या कंत्राटदारांना धमक्या दिल्या जातात, त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमनेरचा विकास त्यांना बघवत नसल्याने, त्यांचा राग मी समजू शकतो. धाकदपटशा आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जिल्ह्यात यंदा दुर्दैवाने अद्यापपर्यंत पुरेशा पाऊस झाला नाही. त्यामुळे टंचाईची परिस्थिती आहे. हे मान्य करावे लागेल. टंचाईत पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे, अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण यांनी आज येथे दिल्या. संगमनेर तालुका टंचाई आढावा बैठक महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराडे, गटविकास अधिकारी…
पोलिसांच्या नावाने टीका होत असताना बस स्थानकावरील सुरक्षारक्षक नेमके करतात काय? एसटी प्रशासनच चोरीच्या घटनांना कारणीभूत… महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्यातील सर्वात मोठ्या आणि एअरपोर्टचा लूक असलेले संगमनेरचे बसस्थानक दागिने आणि रोकड चोरांसाठी सॉफ्ट टारगेट ठरले आहे. बस स्थानकावरील सातत्याने घडणाऱ्या दागिने, रोकड चोरीच्या घटनांमुळे बस स्थानक प्रशासन आणि येथील सुरक्षारक्षक नेमके करतात काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चोरीच्या या घटनांना एसटी प्रशासनच कारणीभूत असल्याचे बोलले जाते. सर्वाधिक घटना बस स्थानकात: दागिने चोरीच्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक घटना बस स्थानकामध्ये घडल्या आहेत. रविवारीदेखील (17 सप्टेंबर) बस स्थानकामध्ये दागिने आणि रोकड चोरीच्या दोन घटना घडल्या. विशेष म्हणजे एकाचवेळी सायंकाळी चारच्या…
संगमनेर महाविद्यालयात ‘युवा ही दुवा’ या राज्यस्तरीय उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आजचा युवक उपक्रमशील आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या बदलत्या गोष्टी तो जलदपणे आत्मसात करतो. युवकांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी यापुढे प्रत्येक महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र चालविण्याचे धोरण आणण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी संगमनेर येथे केले. यांची उपस्थिती: महसूल विभागाच्यावतीने संगमनेर महाविद्यालयात आयोजित ‘युवा ही दुवा’ या राज्यस्तरीय उपक्रमाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शिक्षण…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ऊस तोडणी करून कारखान्याच्या कार्यस्थळावर ऊस पोहोचविण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने करारनाम्यानुसार काम केले नाही. त्यामुळे अनामत म्हणून घेतलेल्या रकमेचा धनादेश त्याने कारखान्यात दिला होता हा धनादेश न वाटल्याने संगमनेरच्या न्यायालयाने ठेकेदाराला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा: शांताराम दामू गवांदे असे शिक्षा झालेल्या ठेकेदार आरोपीचे नाव असून गवांदे याला एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा, तीन लाख दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास चार महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. एम. गिरी यांनी ठोठावली आहे. काय होती घटना: आरोपी शांताराम दामू गवांदे या ठेकेदाराने संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील श्री. गजानन…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरचे महसूल प्रशासनासह सरकारी यंत्रणा मंत्र्यांचे दौरे आणि त्यांच्या मागे पुढे करण्यात व्यस्त आहे. आमदारांनी बोलाविलेल्या टंचाई आढावा बैठकीला प्रांताधिकारी तहसीलदार गैरहजर राहतात. येथील प्रशासन आणि सरकारला गोरगरीब जनतेचे दुःख कळत नाही. अनेक लाभार्थी शासकीय लाभांपासून वंचित ठेवले जात असून संगमनेर तालुक्यात पालकमंत्र्यांच्या खबऱ्यांच्या सूचनेवरून कामे होत आहेत. हेच चित्र जर असे सुरू राहिले तर तहसील कार्यालयावर महसूल प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा सरपंच भाऊराव रहाणे यांनी दिला आहे. तक्रारी: आमदार बाळासाहेब थोरात यांनी यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये सोमवारी टंचाई आढावा बैठक बोलाविली होती. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या कामाचे वाभाडे काढतानाच महसूल प्रशासनाच्या कामकाजाविषयी तीव्र…
तपास अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेरच्या समृद्ध सहकाराला अडचणीत आणणाऱ्या आणि पतसंस्था विश्वातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा करणाऱ्या मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह अन्य आरोपींच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय लवकरच समोर येण्याची चिन्हे आहे. न्यायालयाच्या निर्णयाची ठेवीदारांना प्रतीक्षा लागली आहे. यांच्यावर गुन्हा: गेल्या 30 वर्षांपासून संगमनेरच्या आर्थिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा तब्बल 81 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. याप्रकरणी पतसंस्थेचा चेअरमन व या गुन्ह्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, चीफ अकाउंटंट भाऊसाहेब गायकवाड, छत्रपती संभाजी नगर येथील चेतन नागराजबाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दुष्काळात नागरिकांना पिण्याचे पाणी रोजगार हमीचे कामे आणि जनावरांना सारा उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे त्यांनी ते केलेच पाहिजे, दुष्काळाच्या संकटात जनतेच्या मदतीला प्राधान्य द्या, असे स्पष्ट करत दुष्काळ निवारणाच्या कामात हलगर्जीपणा आणि राजकारण नको, अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या. उपस्थिती: आमदार थोरात यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनामध्ये सोमवारी टंचाई आढावा बैठक पार पडली. यावेळी थोरात बोलत होते. गटविकास अधिकारी अनिल नागणे, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, शंकरराव खेमनर, इंद्रजीत थोरात, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे,…
