Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिर्डीच्या दौऱ्यामध्ये एका शेतकऱ्याच्या मुलानं उद्धव ठाकरेंना लोणचं-भाकरीची शिदोरी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भावनिक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हे प्रेम आहे त्यांच. हीच आमची शिदोरी आहे. हेच आमचे आशीर्वाद आहेत. मला बोलण्यासाठी शब्द नाहीत. उद्धव ठाकरे शुक्रवारी संगमनेर, शिर्डी, कोपरगावच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. या दौरा दरम्यान त्यांनी दुष्काळी भागाची पाहणी करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी देखील मोठ्या आपुलकी आणि आशेने आपल्या व्यथा ठाकरेंसमोर व्यक्त केल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे, असा धीर दिला.…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर – “तुम्ही कोणी धीर सोडू नका. संपूर्ण शिवसेना ताकदीने तुमच्यासोबत आहे. सरकारला एक मुदत देऊ. यात काही नाही झाले, तर मग आपण आंदोलन असेल, अथवा जे काय करावे लागेल, ते करू” अशा शब्दात माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्तांची संवाद साधत आपल्या शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांसोबत राहण्याचा सल्ला दिला. रिमझिम पावसात संवाद: संगमनेर, कोपरगाव, शिर्डीच्या दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर सोबत पाऊस घेऊनच आलेले शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिमझिम पावसातच शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील वडझरी येथील दुष्काळग्रस्तांशी संवाद साधत शेतकऱ्यांना धीर दिला. नुकसानीची घेतली माहिती: शेताच्या बांधावरच दुष्काळग्रस्तांसोबत संवाद साधताना त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेला वर्षपूर्ती होत आहे. ही यात्रा देशाच्या भविष्याला व राजकारणाला दिशा देणारी ठरली आहे. या यात्रेचा आपणा सर्वांना अभिमान असल्याचे गौरवोद्गार या यात्रेचे समन्वयक काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. संगमनेरात पदयात्रा: राष्ट्रीय एकात्मता व लोकशाहीच्या रक्षणासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरापूर्वी भारत जोडो यात्रा पार पडली. यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त संगमनेरात काँग्रेसने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी थोरात बोलत होते. यांचा सहभाग: संगमनेर नगरपरिषदेपासून सुरू झालेल्या या पद यात्रेचा समारोप नवीन नगर रस्त्यावर झाला. यावेळी थोरात…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ठेवीदारांना 81 कोटी रुपयांचा गंडा घालून या रकमेचा अपहार करणाऱ्या आरोपींविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला आहे. नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी यासंदर्भात चौकशी करण्यासाठी शुक्रवारी दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत चौकशीसाठी उपस्थित राहणार असून संबंधित ठेवीदार कर्जदार तक्रारदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी केले आहे. राजकीय प्रतिष्ठितांचा समावेश: 81 कोटी रुपयांच्या अपहरण प्रकरणी मुख्य आरोपी प्रतिष्ठित राजकीय नेता भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य, राहुरीतील राजकीय प्रतिष्ठित कदम कुटुंबीय यांच्यासह पंधरा मुख्य आरोपींविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची मालमत्ता संरक्षित करणार: याप्रकरणी…
निवडून येण्याची क्षमता, मतदार संघाची परिस्थिती बघून मविआच्या बैठकीत निर्णय होणार महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाविकास आघाडीमध्ये लोकसभेसाठी राज्यातील 48 जागांवर चर्चा होईल त्यावेळी जागा वाटपा संदर्भातील निर्णय घेतला जाईल. निवडून येण्याची क्षमता मतदार संघाची परिस्थिती बघून निर्णय घेतला जाणार असल्याचे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषद: काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात संदर्भात गुरुवारी संगमनेरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत यासंबंधी महत्त्वाचे विधान केले. थोरात म्हणाले, राज्यातील 48 जागा संदर्भात चर्चा होईल. त्यानंतर काही गोष्टी ठरतील. कोणी उमेदवारी जाहीर केली असं आज म्हणू शकत नाही. महाविकास आघाडी म्हणून शिर्डीच्या जागेचा निर्णय घेतला…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महत्त्वाच्या विषयाकडून लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न सातत्याने भारतीय जनता पक्षाने केला आहे. केंद्र सरकारने केला आहे. राज्य सरकार आता करत आहे. जनतेचे लक्ष पुन्हा मुख्य विषयाकडे वेधण्याचे काम राहुल गांधी यांच्या पदयात्रेतून झाले असून या पार्श्वभूमीवर पदयात्रेच्या वर्षपूर्ती निमित्ताने देशभरात मुख्य शहरांमध्ये आज पदयात्रा काढल्याची माहिती काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. थोरात म्हणाले, 7 सप्टेंबरला राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. कन्याकुमारीपासुन सुरु झालेली ही पदयात्रा 12 राज्याची परिक्रमा करत 3560 किलोमीटर श्रीनगरपर्यंत ही यात्रा गेली. जागतिक पातळीवर उच्चांकी नोंद व्हावी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – नवीन नगर रस्त्यावर असलेल्या हृदयरोग तज्ञ डॉ. गिरीश सावंत यांच्या राहत्या घरातून चोरट्यांनी तब्बल अर्धा किलोहून अधिक वजनाचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टर सावंत यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. गॅलरीतून प्रवेश: सावंत यांचे नगर रोडवरील ताजने मळ्यात ‘साई सुमन हृदयालय व क्रिटिकल केअर सावंत हॉस्पिटल’ आहे. या रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर सावंत आपल्या कुटुंबासह राहावयास आहे. अज्ञात चोरट्याने हॉस्पिटल वरील गॅलरीतून घरात प्रवेश केला आणि तब्बल अर्धा किलो वजनाचे दागिने चोरून नेले. बाहेरगावी गेल्याची संधी साधली: शनिवारपासून (2…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जनआरोग्यम परिवार व जाणीव फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडझरी खुर्द येथील पदवीधर शिक्षिका श्रीमती सुरेखा आनंदराव भालेराव यांना प्रदान करण्यात आला. यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम: नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नाशिक जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे, नाशिक मराठा विद्या प्रसारक समाजाचे नितीन ठाकरे, संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील आदींच्या उपस्थितीत सह्याद्री महाविद्यालयात नुकताच हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पुरस्कार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामाची दखल: भालेराव गेली २५ वर्षे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सेवा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रस्ता ओलांडताना एसटी बस जवळून गेल्याचा राग आल्याने बसवर दगडफेक करत बस चालकाच्या केबिनमध्ये शिरून कंडक्टरला मारहाण करणे आरोपीला चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी तीन महिने सश्रम कारावास आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. काय होती घटना: आठ वर्षांपूर्वी 2 सप्टेंबर 2015 रोजी नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रवरा नदी पुलाजवळ ही घटना घडली होती. नाशिक-पलूस-सांगली (MH 14 BN 4239) ही एसटी बस संगमनेर बस स्थानकातून सांगलीच्या दिशेने जात असताना प्रवरा नदी पुलापाशी रस्ता ओलांडणाऱ्या इसमाच्या जवळून बस गेल्याने त्याला याचा राग आला. त्यामुळे त्याने…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निळवंडे धरण हे उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाकरता बांधले गेले आहे. या भागात अत्यंत कमी पाऊस झाला असून पिके वाया गेली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे सरकारने तातडीने निळवंडे धरणातून कालव्यांद्वारे पाणी सोडावे, अशी आग्रही मागणी निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे केली आहे. का केली मागणी: निळवंडे कालव्यांमधून पाणी सोडण्याबाबत आग्रही मागणी करताना थोरात म्हणाले, यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यंत कमी पावसामुळे खरीप पेरण्या पूर्णपणे वाया गेल्या आहेत. यामुळे ग्रामीण भाग उध्वस्त झाला. दुष्काळी परिस्थितीत सरकारने काळजी म्हणून बैठका घेऊन पिण्याच्या पाण्याचा…
