Author: अनंत पांगारकर

एकमुखी मागणी – माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा सन्मानाने पक्षात घ्या! महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा जनाधार आहे या जागेसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक देखील अनेक जण आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहावा यासाठी आग्रही असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांनी केले. आढावा बैठकीला हे होते उपस्थित: हंडोरे यांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीसाठी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, ज्ञानेश्वर गायकवाड, करण ससाने, हेमंत ओगले, समन्वयक सचिन गुंजाळ,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – येथील अर्थकारणात अग्रेसर असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या मोठ्या आर्थिक अपहार प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास जिल्हा उपनिबंधाकडून विशेष लेखापरीक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष आणि राजकीय नेते भाऊसाहेब कुटे यांना देखील या प्रकरणी दोषी धरण्यात आले असून आरोपींमध्ये त्यांचा देखील रहाण्याची शक्यता आहे. अपहाराचा नेमका आकडा समोर येणार: गुन्हे दाखल करण्यास परवानगी मिळाल्याने लवकरच संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. गुन्हा केव्हा दाखल होतो याकडे ठेवीदार सभासदांचे लक्ष लागले आहे. या संस्थेत ठेविदारांचा पैसा मोठ्या प्रमाणात अडकला आहे. नेमका किती रुपयांचा अपहार आहे याची अद्याप सहकार विभागाकडून स्पष्टता नसली तरी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहाय्यक सरकारी वकील पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत संगमनेरच्या घुले पाटील असोसिएटच्या ॲड. मनीषा सोनवणे यांनी यश मिळविले. यांनी मिळविले यश: संगमनेर बार असोसिएशनच्या सदस्य असलेल्या ॲड. मनीषा सोनवणे यांच्यासह ॲड. स्वाती घुले, ॲड. रेश्मा मंडलिक, ॲड. विक्रांत भालेराव, ॲड. भारत काळे, ॲड. शशिकांत माने, ॲड. चंद्रकांत सुपे, ॲड. गणेश अनर्थे व ॲड. अजीज मणियार यांची असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर (सहाय्यक सरकारी वकील) म्हणून निवड झाली आहे. ॲड. मनीषा सोनवणे या संगमनेर न्यायालयातील ॲड. अनिल घुले यांच्या ज्यूनियर म्हणून काम पाहतात. अथक परिश्रमातून त्यांनी हे यश प्राप्त केल्याचे ॲड. अनिल घुले यांनी महाराष्ट्र संवाद…

Read More

रविवार विशेष लेख | प्रवीण पुरो नरेंद्र मोदींच्या सरकारविरोधात लोकसभेत देण्यात आलेल्या अविश्‍वास प्रस्तावावरील चर्चा आणि त्याला सत्ताधार्‍यांनी विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेलं उत्तर जगाने पाहिलं. डोक्यात गेलेली सत्ता, या सत्तेचा अहंकार आणि सत्ता आपल्यासाठीच असल्याचा माज पाहून अनेकांना हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत याचंच आश्‍चर्य वाटत होतं. गेल्या नऊ वर्षांच्या सत्तेत जी दुषणं मोदींनी विरोधकांना दिली त्यात जराही फरक जाणवला नाही. सत्तेतील एखादा मंत्री किंवा खासदार खोटं बोलला तर त्याकडे लोक दुर्लक्ष करतात. त्याला तितकं महत्व देत नाहीत. पण देशाचा प्रमुख असलेला पंतप्रधानच खोटं बोलू लागला तर ती लोकशाहीची आणि संसदेची थट्टाच होय. अर्थात ज्यांचा लोकशाहीवर विश्‍वास नाही त्यांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे : प्रदूषण कमी करण्यासाठी, वाहतूक कोंडी मधून पुणेकरांची सुटका होण्यासाठी आता हवेतून चालणाऱ्या बस सुरू करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री होते उपस्थित: केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे आज लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते. गडकरी म्हणाले: पुण्यातील वाढती वाहनांची संख्या, प्रदूषण, कचरामुक्त पुणे यासाठी गडकरी यांनी उपाय सुचवत माझ्याकडे पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्काय बसची कल्पना आहे. माझी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – गाव पातळीवर असलेल्या प्रत्येक यंत्रणेने सतर्क आणि संवेनशीलतेने काम करण्याची आवश्यकता आहे. यापुढे निष्काळजीपणामुळे एकही जीव जाऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहायला हवे. अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी प्रशासनाला केल्या.  घेतली अधिकाऱ्यांची बैठक: कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या घटनेची राज्य महिला आयोगाने सुमोटो दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी शुक्रवारी कोपरगाव तालुक्याचा दौरा करत याप्रकरणी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक घेत या प्रकरणी आढावा घेतला. काय होती घटना: वडाळी (नाशिक) येथील रहिवासी असलेली रेणुका किरण गांगुर्डे ही महिला आपल्या माहेरी कारवाडी (ता. कोपरगाव) येथे आली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – नगर जिल्ह्यात मतदार नाव नोंदणी अभियान राबविण्यात येत असुन घरोघरी जाऊन बीएलओ मतदारांची नाव नोंदणी करत आहेत. नागरिकांनी बीएलओंना मदत करुन आपली नोंदणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यांची केली नियुक्ती: नव मतदार नाव नोंदणीसाठी जिल्ह्यातील 107 महाविद्यालयामध्ये युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. प्रत्येक महाविद्यालय स्तरावर बीएलओ, महसूल दूत व महाविद्यालयाचे नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातुन नव मतदारांची शंभर टक्के नाव नोंदणी करून घेण्यात येणार आहे. 12, 13 ऑगस्टला मोहीम: गृहनिर्माण संस्थामध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची व भटक्या विमुक्त जमातीतील तांडा, वस्त्या येथील नागरिकांच्या मतदार नाव नोंदणीसाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – भारतीय जनता पार्टी, किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य व स्व. संभाजीराजे थोरात प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्र संभाजीराव थोरात यांना तमिळनाडू सरकार व चेन्नईच्या एशिया इंटरनॅशनल कल्चर अ‍ॅण्ड रिसर्च विद्यापीठातर्फे “डॉक्टरेट आणि लोकहित सेवारत्न” पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. राबविले वेगवेगळे उपक्रम: थोरात गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्था आणि संघटना यांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. अहमदनगर, पुणे आणि मुंबई या ठिकाणी स्व. संभाजीराजे थोरात प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे विशेष सामाजिक योगदान राहिलेले आहे. यांच्या उपस्थितीत झाला सन्मान: त्यांच्या कार्याची दखल घेऊन चेन्नई विद्यापीठाने त्यांना एका दिमाखदार सोहळ्यात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जिनूरामा शर्मा, सिने अभिनेते शिवा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – बस स्थानकामध्ये एसटी बसच्या चाकाखाली सापडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आयेशा मुनीर बेग (वय 55 वर्ष, रा. संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) असे अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास संगमनेर बस स्थानकामध्ये सिन्नर आगाराची नासिक-अहमदनगर (क्रमांक एम.एच 20 बीएल 4056) ही बस आली होती. या बसच्या चाकाखाली सापडून या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. आयेशा बेग संगमनेर बस स्थानकावर आपल्या नातेवाईकांसह आल्या होत्या. बस चालक बस स्थानकामध्ये आपल्या ताब्यातील बस स्थानकाबाहेर नेण्याच्या बेतात असताना अचानकपणे त्या बसच्या चाकाखाली सापडल्या. गंभीर जखमी झालेल्या बेग…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – स्वातंत्र्यदिनी संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना ध्वजारोहणापासून रोखण्याचा व नगरपालिका सांगण्यात उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाहीला सुरुवात केली असल्याची माहिती शिवसेना (ठाकरे) शहर प्रमुख अमर कतारी यांनी दिली. मुख्याधिकारी वाघ आमदार थोरात यांचे मानले आभार: निवेदनात करण्यात आलेली मागणी मान्य करण्यात आली असून प्रत्यक्षात कार्यवाहीला देखील सुरुवात करण्यात आली आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी समक्ष पाहणी करत घरांचे मोजमाप घेऊन मालमत्ता कराचे फॉर्म भरण्यास सुरुवात केल्याने नागरिकांच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख कतारी यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व संगमनेरचे लोकप्रतिनिधी, माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहे. काय होती मागणी: शहरातील संजय…

Read More