Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर – जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करत मोर्चा काढल्या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एकवीस प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतर सव्वाशे आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुमारे दीडशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोर्चेकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यात मागासवर्गीय समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत नांदेड येथील मागासवर्गीय तरुण अक्षय भालेराव याची निर्घून हत्या, मुंबई येथे इंजीनियरिंगचे शिक्षण घेणारी युवती हिना मेश्राम हिच्यावर अत्याचार करून तिच्या झालेल्या हत्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या दोघांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासह अन्य मागण्यासाठी शनिवारी (8 जुलै) विविध संघटनांच्यावतीने निषेधाच्या घोषणा देत प्रांताधिकारी कार्यालयावर निळा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या संदर्भात…

Read More

नूतन पदाधिकार्‍यांचे पदग्रहण; मालपाणी उद्योग समूहाकडून 21 लाखांची देणगी महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर- इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी झालेली निवड वैश्विक संघटनेकडून मिळालेली समाजसेवेची खूप मोठी संधी आहे. डिस्ट्रिक्टमधील हजारो महिलांच्या साथीने सेवाकार्याचा नवा आदर्श निर्माण करण्यासाठी यापुढे सांघिक पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन इनरव्हील क्लब डिस्ट्रिक्ट 313 च्या नूतन चेअरमन रचना मालपाणी यांनी केले. इनरव्हील क्लबच्या नूतन पदाधिकार्‍यांच्या पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्ट मधील 76 शाखांमधील 630 महिलांच्या उपस्थितीत ढोले पाटील लॉन्सच्या सभागृहात पार पडला. यावेळी मालपाणी बोलत होत्या. इंटरनॅशनल इनरव्हील क्लबच्या व्हाईस चेअरमन ममता गुप्ता, मावळत्या चेअरमन मुक्ती पानसे यांच्यासह डिस्ट्रिक्टच्या व्हाईस चेअरमन डॉ. शोभना पालेकर, सेक्रेटरी डॉ. आशा देशपांडे, खजिनदार…

Read More

आजच्या बदलत्या काळात तत्त्व जिवंत ठेवण्याचा संघर्ष : कुलगुरू संजीव सोनवणे चिन्नण्णाच्या माध्यमातून एक चांगले पुस्तक महाराष्ट्रासमोर: आमदार बाळासाहेब थोरात महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची प्रगल्भता आणि राजकीय क्षमता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात आहे. सध्याच्या परिस्थितीत चांगले दिवस आले असल्याने बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत लेखक डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली. जयहिंद लोक चळवळ आयोजित चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या हिरालाल पगडाल लिखित ‘चिन्नण्णा’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरू असताना माणसा-माणसातील संवेदना हरवत चालल्या आहे. अशा स्थितीत गावोगावी ग्रंथ मंदिरे उभी राहिल्यास सुसंस्कृत समाज निर्मिती होईल, असे प्रतिपादन पुण्याच्या बार्कलेज या आयटी कंपनीचे मानव संसाधन व्हाईस प्रेसिडेंट प्रीतम देशमुख यांनी केले. स्व. पतिंगराव देशमुख यांच्या स्मृति निमित्ताने देशमुख यांनी जवळेकडलग येथील सावरकर विचार युवा मंच संचलित स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयास ग्रंथ भेट दिले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव माऊली देशमुख होते. वाचनालयाचे अध्यक्ष गोकुळ खंडागळे, उपाध्यक्ष प्रताप कडलग, कार्यवाह सुनील कडलग, दिलीप कदम, श्रीमती प्रणिता देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, व्हाट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या जाळ्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – एक रुपयात पीक विमा योजना ही राज्‍य शासनाने सुरु केलेली महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे‌. शेतकऱ्यांना अशा योजनेतून लाभ देणारे महाराष्‍ट्र देशातील एकमेव राज्य असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्‍यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. राज्‍य शासनाने खरीप व रब्‍बी हंगामाकरीता सुरु केलेल्‍या एक रुपयात पीक विमा योजनेचा प्रसार करण्‍यासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या रथाचे उद्घाटन महसूलमंत्री विखे पाटील यांच्‍या हस्ते करण्‍यात आले. या रथांना हिरवा झेंडा दाखवून संपूर्ण जिल्‍ह्यामध्‍ये शेतकऱ्यांना या योजनेची माहिती देण्‍यासाठी हे रथ जिल्‍ह्यामध्‍ये रवाना करण्‍यात आले. याप्रसंगी जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आगामी काळ हा निवडणुकांचा राहणार असून नगरपरिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने व क्षमतेने लढवत गद्दारी करणाऱ्या गद्दारांना घरी बसविण्याचे आवाहन शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संघटक शुभांगी पाटील यांनी केले आहे. संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये शनिवारी होऊ घातलेल्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायतीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संगमनेर तालुका महिला आघाडीच्या सक्षमीकरणाअंतर्गत नियोजनासाठी शुभांगी पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी पाटील बोलत होत्या. महिला आघाडीच्या उत्तर नगर जिल्हा संपर्क संघटक शुभदा शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सपना मोरे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक आशा केदारी,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष लेख / सुरेश पाटील महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास हे ध्येय घेऊन राज्यात सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ३० जून २०२३ रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहेत. या वर्षभराच्या कालावधीत महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी निळवंडे सारखे विविध प्रकल्प, योजना व विकासकामांना गती देत उत्तर अहमदनगर जिल्ह्याचा विकासाचा ध्यास घेतलेला दिसून येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या पाठबळामुळे वर्षभरात विविध प्रकल्पांना मंजूरी मिळाली आहे. उत्तर नगर पर्यायाने शिर्डीच्या विकासाला चालना मिळाली आहे. या वर्षभराच्या कालावधीत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा हा संक्षिप्त आढावा. निळवंडेच्या डाव्या कालव्यातून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – लाखो विद्यार्थी घडविणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाणारे सर डॉ. मो. स. गोसावी यांचे रविवारी पहाटे पावणेदोन वाजेच्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 88 वर्षांचे होते. शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. मो. स. गोसावी यांनी वयाच्या 23 व्या वर्षी बी. वाय. के. कॉलेजचे प्राचार्य पद भूषविले. त्यानंतर पुढील 37 वर्ष त्यांनी या महाविद्यालयात शैक्षणिक योगदान दिले. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदाची धुरा गेल्या साठ वर्षांपासून ते सांभाळत होते. डॉ. मो. स. गोसावी यांच्या योगदानातून लाखो विद्यार्थी आज मोठ्या पदांवर, उद्योजक, राजकारणी, वैद्यकीय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष / प्रवीण पुरो महाराष्ट्रातील सत्तेच्या पिपासूंचा नंगानाच गेल्या रविवारी सार्‍या जगाने अनुभवला. गेल्या वर्षी याच काळात हा नंगानाच गोहाटीपासून गोव्यापर्यंत आणि गोव्यापासून मुंबईपर्यंत निर्लज्जपणे सुरू होता, जवळपास सर्वांनीच तो ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. माणून नावाचा प्राणी किती निष्ठूर असतो, तो कसाही विकला जाऊ शकतो आणि विकला जाऊनही मालकावर कसा दुगाण्या झाडतो याचं उदाहरण देशभरातल्या जनतेला मिळालं. या नंगानाचाचे खलनायक होते अर्थातच देवेंद्र फडणवीस. फडणवीसांनी राज्याच्या राजकरणाचा बाजार करण्याचा जणू विडाच उचललेला दिसतो आहे. काहीही करा सत्ता ताब्यात घ्या, या त्यांच्यातल्या हवरटपणाने राज्याच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासला आहे. सत्तेसाठी आजवर माणसं फोडली जायची. आता थेट…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शुक्रवारी (ता. 7 जुलै) संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कांदा लिलावात एक नंबर कांद्यास सर्वाधिक 1801 रुपयांचा तर टोमॅटो 1400 रुपये प्रति कॅरेट बाजार भाव मिळाला आहे. शेतीमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी बाजार समितीमध्ये आपला माल विक्रीस आणत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली. गुंजाळ म्हणाले, शुक्रवारच्या लिलावामध्ये बाजार समितीत एकूण 26444 कांदा गोण्यांची आवक झाली. या लिलावामध्ये चांगल्या दर्जाच्या एक नंबर कांद्याला 1500 ते 1801 रुपयांचा, दोन नंबर कांद्याला 1000 ते 1400 रुपये, तीन नंबर कांद्याला 500 ते 900 रुपयांचा भाव मिळाला. तर गोल्टी कांदाही 400 ते…

Read More