Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रक्तदानाची क्षमता हे माणसाला लाभलेले वरदान आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविता येतात आणि कितीतरी परिवारांना सावरणे शक्य होते. रक्तदानाला आपल्या संस्कृतीत सर्वोच्च दानाचे महत्त्व प्राप्त असून त्याला जीवनदान म्हणूनही ओळखले जाते. आपल्या उद्योग समूहावर नीति आणि सदाचाराचे संस्कार करणार्‍या दामोदरशेठ यांच्या प्रत्येक स्मृतीदिनी रक्तदानाचा महायज्ञ त्यांच्या स्मृतींना खर्‍याअर्थी उजाळा देणारा असल्याचे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांनी केले. मालपाणी उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय दामोदर मालपाणी यांच्या 48 व्या स्मृती दिनानिमित्त अर्पण रक्त पेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातून 127 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमधील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सपना मोरे व उत्तर नगर जिल्हा प्रमुख मुजीबभाई शेख यांच्या सूचनेवरून या निवडी जाहीर केल्याची माहिती देण्यात आली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये शितल सदाशिव हासे यांना महिला आघाडी तालुका संघटक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.  याशिवाय उज्वला कैलास गुळवे (महिला आघाडी तालुका संघटक, साकुर पठारभाग) आशा संदीप केदारी (महिला आघाडी उपजिल्हा संघटक, संगमनेर-अकोले)  सुरेखा गुंजाळ (महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस) सुनिता अशोक सातपुते (महिला आघाडी उप तालुका संघटक) सोनाली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पबजी खेळाच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी झालेल्या ओळखीतून संगमनेर शहरालगतच्या कासारवाडी शिवारात तरुणी व नागरिकांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न असल्याचे घटना समोर आले आहे. शहर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून पोलिसांनी पकडलेले दोन्ही आरोपी बिहार राज्यातील आहेत. या घटनेमागे सध्या सुरू असलेल्या लव्ह जिहाद सारखा प्रकार आहे का या दृष्टीनेही संगमनेर पोलीस तपास करत आहे. अकरम शहाबुद्दीन शेख व मोहम्मद नेमतुल्ला मोहम्मद कैसर (दोघे रा. अलीनगर, जि. दरभंगा, बिहार) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. संगमनेर विभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे व शहर पोलीस ठाण्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पिंपरी – आम्ही मजबूत असून सरकारची काही काळजी करू नका. असे सांगताना “एखाद्या जाहिरातीमुळे युतीवर परिणाम होईल एवढी युती कच्ची नाही”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. शुक्रवारी थेरगाव येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार संजय भेगडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी यावेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती एका विचाराने झालेली आहे. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई :- काँग्रेसला मत देणे म्हणजे देशात अराजकता निर्माण करणे असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. बावनकुळे म्हणाले, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आणि आता कर्नाटक सरकारला आदेश देऊन त्यांनीच अभ्यासक्रमातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धडा काढायला लावला. काँग्रेसने कर्नाटकात धर्मांतर बंदी कायदा रद्द केला असून भविष्यात गोहत्या बंदीचा कायदाही रद्द करतील. त्यामुळे काँग्रेसला दिलेलं एक मत म्हणजे किती मोठी चूक आहे, याचं कर्नाटक उदाहरण असल्याचे बावनकुळे म्हणाले. कर्नाटकच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी किमान आता तरी उद्धव ठाकरे यांनी लंडनमधून भूमिका स्पष्ट करावी. कर्नाटकमध्ये झालेला प्रकार त्यांना मान्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले | राजेंद्र जाधव  महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून ओळख असलेले ५४ शेकरू हरिश्चद्रगड अभयारण्यात आढळून आले यात यात प्रामुख्याने कोथळे, पाचनई, आंबित, कुमशेत या परिसरातील जंगलात त्यांचे वास्तव्य असल्याचे समोर आले. तर पंधरा दिवसांच्या प्रगणनेत अकोले तालुक्यातील राजूर -हरिश्चंद्रगड अभयारण्यात शेकरुंची संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढल्याचे प्रगणनेत दिसून आले वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्याकडुन या शेकरूंची मोजतात करण्यात आली. मोजणी दरम्यान ५४ शेकरूनी वन कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षरीत्या दर्शन दिले. राजूर वनरिश्रेत्रात येणाऱ्या तीन वनपरिमंडळातील जंगलात ही प्रगणना राबविण्यात आली. नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारितीतील अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य हे शेकरुच्या अधिवासासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी राजूर, भंडारदरा वनपरिक्षेत्रांमध्ये शेकरुच्या प्रगणनेचा उपक्रम वन्यजीव विभागामार्फत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा विकास व शांतता काहींना पहावत नसल्याने जातीय तेढ निर्माण करून समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जमावबंदीचा आदेश मोडून आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेची छेडछाड करण्याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उमटली असून या सर्व लोकांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करावे, अशी मागणी संगमनेरकर व काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. राज्यघटना व सर्वधर्मसमभाव हा विचार जोपासत पुरोगामी व वारकरी संप्रदायाचे पाईक असलेल्या आमदार थोरात यांनी संगमनेरमध्ये बंधुभाव व सामंजस्याचे वातावरण राहावे, यासाठी सातत्याने काम केले आहे. मात्र काही समाज विघातक शक्तींनी याला जातीयतेचे रूप देत स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कोणत्याही नेत्याने दुसऱ्याच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करायचा नाही, असा अलिखित करार आहे. ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गणेश कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र येत हा करार मोडला आहे. त्यांचे पुढे काय करायचे हे ठरवू, असा सूचक इशारा महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (ता. १७) मतदान होत आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनल विरोधात त्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरातील भारतनगरमध्ये असलेल्या सरवर हाजी याच्या पत्राच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची टीप पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली. निरीक्षक मथुरे यांनी तातडीने कारवाईचे आदेश देताच पोलीस पथकाने घटनास्थळी केलेल्या कारवाईत 1,87,500 रुपये किमतीचे गोवंश जनावरांचे कत्तल केलेले गोमांस मिळून आले आहे. कारवाईची चाहूल लागताच कत्तलखाना चालक सरवर हाजी तेथून पसार झाला. अनेकदा झालेल्या कारवायानंतर देखील संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखान्यातून दररोज शेकडो गोवंश जनावरांच्या कत्तली सुरूच असल्याचे अनेकदा पोलीस कारवायानंतर समोर आले आहे. कत्तलखाने नामशेष करण्यास प्रशासनाला अपयश आल्याचे दिसते. संगमनेरातील कत्तलखान्यातून दररोज मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने येथील कत्तलखान्यांची राज्यात बदनामी झाली आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज औरंगाबाद – प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. लिंगभेदावर भाष्य करणे महाराजांच्या अंगलट आले असून आता न्यायालयाच्या निर्णयामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इंदोरीकर महाराजांनी कीर्तनाच्या एका कार्यक्रमादरम्यान लिंगभेद भाष्य करत सम आणि विषम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा आणि मुलगी होत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून राज्यभरात गदारोळ उडाला होता. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणी न्यायालयात देखील धाव घेतली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या तक्रारीची दखल घेत कनिष्ठ न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर इंदुरीकर यांच्यावतीने जिल्हा…

Read More