Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिकच्या दोन शिक्षणाधिकाऱ्यांचे लाचेचे प्रकरण ताजे असतानाच राज्याचा शिक्षण विभाग दिवसेंदिवस लाचखोरीने ग्रासल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहे. आता तर चक्क चेकनेच 75 हजार रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार एसीबीच्या कारवाईत समोर आला आहे. तिघा लाचखोरांवर एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचखोरीचे विविध प्रकार समोर येत असतानाच आता चेकद्वारे लाच खाणारे तिघेजण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. यात शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक आणि लिपिकाचा समावेश आहे. यासंदर्भात अँटी करप्शन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार विनोद शंकर जाधव (वय 42 वर्ष, मुख्याध्यापक, महात्मा फुले हायस्कूल, एरंडोल) नरेंद्र उत्तम वाघ (वय 44 वर्ष, कनिष्ठ लिपिक, महात्मा फुले हायस्कूल,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मित्रा….!!! ‘ते’ भडकवतील , तुला राहावणार नाही , तरीही जागचा हलू नकोस , तुला शपथ आहे पुस्तकांची , तू दगड उचलू नकोस !! धर्म कधीच संकटात नसतो, तुझा ही धर्म धोक्यात नाही,! कुण्या भुरट्यांमुळे तुझ्या आदर्शांचा अपमान होत नाही,!! कर बळकट भावनांना, वारंवार दुखू देवू नकोस,! कर दुर्लक्ष थोड इकडं तिकडं लक्ष देऊ नकोस,!! तुझ स्वतःच मत असावं, दुसऱ्याने पढवलेल बोलू नकोस,! तुला शपथ आहे पुस्तकांची, तू दगड उचलू नकोस !! दोनेक वर्षा नंतर , सुटेल सारं कोड ! निवडणुका जवळ आहेत ओळखून घे थोडं !! हे बघ ही सर्व मतांची समीकरणं आहेत ! एका आड एक…

Read More

बुधवारी सकाळी पर्यावरण प्रेमींनी पुन्हा जाळल्या वाळूच्या गोण्या! अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्यात नवे वाळू धोरण आणले असले तरी या धोरणाला तिलांजली देण्याचे काम त्यांचे विशेष लक्ष असलेल्या संगमनेर शहरात होत आहे. वाळू धोरणाची पायमल्ली होत असताना संगमनेरमधील महसूलचे अधिकारी नेमके करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातून वाहणाऱ्या प्रवरा नदीतून वाळू तस्करी सुरू असल्याचा प्रकार पर्यावरण प्रेमींनी बुधवारी सकाळी पुन्हा एकदा समोर आणला आहे. प्रवरा नदी परिसरात गंगामाई घाटावर फिरायला जाणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नदी काठावरील पायऱ्यांवर वाळूने भरलेल्या गोण्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सेवानिवृत्त डीवायएसपी असलेल्या सासऱ्याने आपल्या मुलाच्या अपरोक्ष मुलीसमान असलेल्या सुनेवर लैंगिक अत्याचार करून सासरा-सुनेच्या नात्याला काळिमा फासल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पत्नीने पतीला सांगितल्यानंतर पतीनेही नराधम वडिलांची बाजू घेत पीडित पत्नीला मारहाण करून माहेरी हाकलून दिले. याप्रकरणी सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठाण्यात बापलेकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. सेवानिवृत्त डीवायएसपीच्या शिक्षक असलेल्या मुलाबरोबर पीडित तरूणीचा विवाह गेल्याच वर्षी झाला होता. विवाह झाल्यानंतर तिची महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची इच्छा होती. त्यानुसार तिने महाविद्याविद्यालयात प्रवेश घेतला होता. पती शिक्षक असल्यामुळे त्यास दररोज शाळेत जावे लागायचे. त्यामुळे त्याने पत्नीला शिक्षणासाठी महाविद्यालयात नेण्या-आणण्याची जबाबदारी वडिलांवर सोपविली होती. त्यामुळे सासरा कधी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणी अटक केलेल्या सागर बर्वे याला मुंबईच्या महादंडाधिकारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी बर्वे यांच्याकडून हस्तगत केलेला लॅपटॉप आणि मोबाईल यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची चौकशी करावयाची आहे. तसेच या प्रकरणात अन्य संशयित आरोपींचा सागर बर्वे यांच्याशी काही संबंध आहे का? याचा देखील तपास करावयाचा आहे. आरोपीने आक्षपार्ह टिपणी करून दोन समूहात किंवा समाजात विविध समूहामध्ये कलह निर्माण केल्याच्या आरोपामुळे तपास होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगत पोलिसांकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. मात्र न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. आरोपी सागर बर्वे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राज्यात शिर्डी आणि चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार असून याबाबतचा अतिशय महत्त्वाचा ठराव आज मंत्रीमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे‌, अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी‌ दिली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. जिल्हा प्रशासनाचे बळकटीकरण करण्याच्या तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व चंद्रपूर जिल्हयातील चिमूर येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणे बाबतचा प्रस्ताव राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मांडला. शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जगात अनेक नावाजलेली व दैदिप्यमान यश मिळवलेली माणसे आहेत. त्यांचे यश आपल्याला दिसते मात्र त्यामागील त्यांचे प्रयत्न दिसत नाही. अशाच यशस्वी व्यक्तींपैकी एक म्हणजे क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर. प्रत्येकाला सचिन व्हावेसे वाटते पण सचिनसारखे कष्ट नको असतात. असे चालणार नाही. तुम्हाला जर यशाच्या शिखरावर जायचे असेल व इच्छित ध्येय गाठायचे असेल तर योग्य दिशेने प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले. विद्या विद्यापीठ संचलित व्हिजन कोचिंग इन्स्टीट्युटच्यावतीने आयोजित केलेल्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विदयापीठाचे अध्यक्ष डॉ. नामदेव गुंजाळ होते. प्रा. राहुल मिश्रा, प्रा. सुनिल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक : गेल्या महिनाभरापासून रखडलेल्या बदल्यांना अखेर मुर्हूत लागला आहे. राज्य सरकारने नाशिक विभागातील बदल्यांचे आदेश जारी केले असून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमनेरचे तत्कालीन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांची नाशिक जिल्हा निवडणुक उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर या पदावर कार्यरत असलेल्या स्वाती थविल यांची उपजिल्हाधिकारी पाटबंधारे क्रमांक १ येथे बदली करण्यात आली आहे. संगमनेरचे तत्कालीन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांची महिनाभरापूर्वी नाशिक येथे बदली करण्यात आली होती मात्र त्यांना नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले नव्हते. मंगरूळे यांनी संगमनेरमध्ये २०१९ ते २०२३ या कार्यकाळात संगमनेर उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले. संगमनेरला येण्यापूर्वी त्यांनी २०१६ ते २०१९ यादरम्यान नासिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – शहरातील जोर्वे नाका येथे जोर्वे येथील आठ तरुणांवर झालेला प्राणघातक हल्ला, त्यानंतर त्याचे जोर्वे गावात उमटलेले पडसाद, शहरातील भगवा मोर्चा नंतर समनापुर गावात पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासमोर झालेली दगडफेक प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरलेल्या पोलीस निरीक्षक ढुमणे यांची नगर कंट्रोलला तडकाफडकी महिनाभराच्या आतच बदली करण्यात आली आहे. त्यांचा पदभार प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्याकडे तीन महिन्यांसाठी सोपविण्यात आला आहे. मंगळवारी रात्री वमने यांनी तालुका पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतली. जोर्वे येथील तरुणांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर संगमनेरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यात शहर पोलीस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निर्ढावलेल्या दागिने चोरांनी पोलीस यंत्रणेला पोलीस यंत्रणेला आव्हान देतानाच सोमवारी दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पावणेतीन लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील अकोले नाका परिसरात घडली. संगमनेरमध्ये दागिने आणि दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. उपविभागाचा पदभार घेतलेल्या उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासमोर या गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. शहर पोलीस ठाण्यात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले कर्मचारी देखील चोरांचा अद्याप शोध लावू शकलेले नाही. त्यामुळे या पोलीस ठाण्यात निश्चितच पाणी कुठेतरी मुरतंय असे दिसते. या दोन्ही अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याचा विशेषतः कर्मचाऱ्यांचा बारकाईने अभ्यास करून…

Read More