Author: अनंत पांगारकर
अहमदनगर | महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगरमधील वाडिया पार्क येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. रविवारी (23 एप्रिल) अहमदनगरच्या वाडीया पार्क येथील माळीवाडा जिल्हा क्रीडा संकुल येथे छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी मान्यवर तसेच कुस्ती पंच, विविध क्षेत्रातील पदाधिकारी व जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी…
श्रीरामपूर | महाराष्ट्र संवाद न्यूज भारत ही जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्था असल्याचा परिपक्व विश्वास किरकोळ गुंतवणूकदारांनी दाखविल्याने म्युच्युअल फंड सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) मासिक चलनाने मार्चमध्ये प्रथमच बाजारात अस्थिरता असूनही १४,००० कोटींचा टप्पा ओलांडल्याचे प्रतिपादन एमएफडी सुनील कडलग यांनी केले. माऊली कृषी उद्योग फाउंडेशनतर्फे आयोजित आरंभ या कृषी व्यावसायिक मित्रांच्या परिषदेत ते ‘नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी माऊली कृषी उद्योगाचे संचालक ज्ञानेश्वर उंडे उपस्थित होते. कडलग म्हणाले, सद्यस्थितीत भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. येत्या पाच ते सहा वर्षातच ती तिसऱ्या क्रमांकावर जाईल. बाजारातील अस्थिरता ही कधीही कायमस्वरूपी नसते. गुंतवणुकीची नवी संधी ती निर्माण करते,त्याचा लाभ गुंतवणूकारांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ‘पंचवीस वर्षांपासून मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने आयोजित केला जाणारा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सर्व धर्मीयांसाठी एक आदर्श उपक्रम आहे. जनहिताच्या या उपक्रमाचे अनुकरण सर्वत्र झाले पाहिजे. साधेपणाने लग्न समारंभ करण्याचा संदेश सर्वांनी मनावर घेतला तर कर्जबाजारीपणातून होणाऱ्या आत्महत्या होणार नाहीत’, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी येथे केले. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने मालपाणी लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आमदार तांबे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, कामगार नेते कॉम्रेड कारभारी उगले, कॉम्रेड माधवराव नेहे, कॉम्रेड ॲड. ज्ञानदेव सहाणे, मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, डॉ. संजय…
रविवार विशेष लेख महाराष्ट्र भूषण पुरस्काराची गरीमा रविवारच्या सोहळ्याने पुरती लोप पावली. खारघरमध्ये पार घडलेल्या या सोहळ्यानंतरच्या हादस्याने महाराष्ट्र शरमिंदा झाला. या सुधारलेल्या राज्याची देशभर छी-थू झाली. सरकार गाढवासारखं वागल्यावर वाट्याला निंदेशिवाय काय येणार? सारा देश ज्या राज्याच्याकडे आदर्शवत म्हणून पाहतो त्या राज्यात भूषण पुरस्कारात 14 जण मरतात हे लांच्छन कधीच पुसणारं नाही. पुरस्कारानंतर बाहेर येत असलेल्या क्लिप्स पाहिल्या की खारघरच्या मैदानावर मेंढरांचा बाजार भरला होता की काय या समजाला अधिक बळकटी येते. सरकारच बुध्दू असेल तर मैदानात बोलवलेल्यांची गत काय असू शकते? स्वत:ची पाठ थोपटण्यासाठी असले इव्हेंट करायचे आणि दुसर्याला राजकारण करू नका म्हणून शहाणपण शिकवायचा उद्योग सरकारमधल्या मंत्र्यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज अचानकपणे घराच्या उघड्या दरवाजातून आत आलेल्या बिबट्याने घरात टीव्ही पाहत असलेल्या 62 वर्षीय व्यक्तीवर हल्ला चढविला. अनपेक्षित झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात संगमनेर तालुक्यातील वडदरा (बोटा) येथील उत्तम बाळाजी कुऱ्हाडे यांचा मृत्यू झाला. शनिवारी संगमनेर तालुक्यातील घारगाव नजीकच्या वडदरा बोटा येथे रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर तालुक्यात मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे. मानवी वस्तीत घुसलेले बिबटे मानवावर हल्ला करत आहेत. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घराच्या उघड्या दरवाज्यातून आत आलेल्या बिबट्याने समोर टीव्ही पाहत असलेल्या उत्तम कुऱ्हाडे यांच्यावर त्यांना काही समजण्यापूर्वीच हल्ला चढविला. गंभीर जखमी झालेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्य सरकारने नुकताच गेलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि पुरस्काराची रक्कम डॉ. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी सरकारला परत करणार आहेत. तसेच त्यांनी या पत्राद्वारे इथून पुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान न करण्याचे आवाहन श्री सेवकांना केले आहे. या अनुषंगाने धर्माधिकारी यांचे पत्र समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. मात्र हे पत्र बनावट असल्याचे धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणा दरम्यान श्री सदस्यांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यूवरून राजकारण तापले असतानाच आता महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने शनिवारी समाज माध्यमांमध्ये एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या पत्रात राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज तब्बल सात महिने उलटून गेल्यानंतर देखील स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिराला जोडणाऱ्या म्हाळुंगी नदीतील खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रशासन अद्यापही करू शकले नाही. पालिकेत सुरू असलेला प्रशासकीय कारभार आणि राजकीय श्रेय वादाच्या टोलवाटोलवीमध्ये या फुलाचा प्रश्न अडकला असल्याने आता या प्रश्नी स्थानिक नागरिक आणि संगमनेरकरांनी आपली वज्रमुठ आवळली असून आता आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (२४ एप्रिल) म्हाळुंगी नदीवरील पडलेल्या पुलाच्या दुरुस्ती करता आंदोलन करण्यात येणार असून तशा आशयाचे निवेदन तब्बल दीडशे लोकांनी प्रशासकीय अधिकारी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. या प्रश्नी संगमनेरकरांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या असल्याचे दिसते. या पुलावरून दररोज हजारो व्यक्तींची…
महाराष्ट्र संवाद न्यूज रमजान ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिम समाजातील दोन गटात झालेल्या दंगलीमुळे ईदच्या सणाला संगमनेरमध्ये गालबोट लागले आहे. शहर पोलिसांनी नगरसेवकासह निष्पन्न झालेल्या आठ जणांसह 28 जणांविरोधात दंगल, विनयभंग आणि शस्त्राचा वापर आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील एकास अटक केल्याची माहिती समोर येत आहे. दोन गटातील वादाची परिणती प्राणघातक हल्ल्यात झाली. शहरातील नाईकवाडपुरा भागात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. हाणामारीमध्ये तलवार, चाकू, हॉकी स्टिकचा वापर करण्यात आल्याने चार जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रात्री नाईकवाडपुरा भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी रमजान ईदच्या पवित्र सणाला…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तयार करून देण्याच्या मोबदल्यात तब्बल चाळीस हजाराची लाच मागणारा तलाठी आणि त्या तलाठ्यासाठी छत्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारणारा खासगी एजंट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. धनराज नरसिंग राठोड (वय ४० वर्ष) असे लाचखोर तलाठ्याचे तर योगेश विठ्ठल काशीद (वय ३३ रा. घुलेवाडी फाटा, ता. संगमनेर) असे लाचखोर खासगी एजंटचे नाव आहे. संगमनेर मध्ये शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळापुर येथील बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तसेच त्यावर वडील व इतर ११ जणांची नावे असलेला हा उतारा तक्रारदार व्यक्तीला हवा होता. त्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज समाजामध्ये महिला बालकांवर होणारे अन्याय अत्याचार तसेच बालविवाहासारख्या चुकीच्या प्रथांवर प्रतिबंध आणणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी प्रशासन व सर्व समाज घटकांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी केले. संगमनेर तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व मुख्य प्रशासकीय विभागांच्या प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या. नायब तहसीलदार गणेश तळेकर व राजेश पऊल, शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे, संगमनेर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी गोर्डे, ॲड. रंजना गवांदे आदी उपस्थित…
