Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी परिवाराच्या पुढाकाराने व महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा आणि संगमनेरमधील माहेश्वरी समाज यांच्या सहकार्याने आयोजित केले जाणारे विवाहयोग्य युवक-युवती परिचय संमेलन मागील दहा वर्षांपासून माहेश्वरी समाजाला वरदान ठरले आहे. हे संमेलन म्हणजे व्यवस्थापन कौशल्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण असल्याचे गौरवोद्गार प्रसिध्द व्यवस्थापन गुरु डॉ. वसंत बंग यांनी काढले. अखिल भारतीय माहेश्वरी विवाहयोग्य युवक-युवती परिचय संमेलनाचा उद्घाटनावेळी ते बोलत होते. राजस्थान मंडळाचे अध्यक्ष मनिष मालपाणी, स्वागताध्यक्ष राजेश मालपाणी, उद्योजक विजय आसावा, अजय लाहोटी, मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित मणियार, प्रकल्प प्रमुख ओम इंदाणी, उपाध्यक्ष सम्राट भंडारी, संगमनेर तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष अतुल झंवर, कोषाध्यक्ष उमेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : मानवी जीवनात विज्ञानाचे मोठे महत्त्व आहे. मानवाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचे काम विज्ञान करत असते. त्यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी विज्ञानाची कास धरणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते हिरालाल पगडाल यांनी केले. ४७ वे संगमनेर तालुका विज्ञान गणित प्रदर्शन ५ ते ७ जानेवारी दरम्यान तालुक्यातील चिखली येथील नूतन माध्यमिक विद्यालयात पार पडले. प्रदर्शनाचे उद्घाटन पगडाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल नागणे होते. गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष सोपान सहाने, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख नंदकुमार हासे आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी नागणे म्हणाले,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षण झाल्यानंतर आपल्याकडे मराठी माणूस नोकरीला प्राधान्य देतो. व्यवसाय करण्याचे धाडस तो दाखवत नाही. असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित १८ व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये ते बोलत होते. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार, पी. डी. पाटील, संमेलनाध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे आधी व्यासपीठावर उपस्थित होते. मराठी टक्का आणि मराठी माणसाविषयी चिंता व्यक्त करत पाटील म्हणाले, राजकारणात मराठी माणूस येण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. निवडणुकांमध्ये उमेदवारी देऊ नका, असं मराठी माणूस म्हणू लागला आहे. विश्लेषकांमध्ये देखील मराठी नाव फारसे सापडत नाही. यात अमराठी व्यक्ती अधिक संख्येने आहेत. मराठी माणसाची ही…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : शुक्रवारी मध्यरात्री तीन बिबट्यांनी एकत्रित पोल्ट्री फार्ममध्ये धुमाकूळ घालत सुमारे चारशेहून अधिक कोंबड्या फस्त केल्या तर अनेक कोंबड्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. अकोले तालुक्यातील मेहेंदुरी येथील शेतकरी सुधीर दगडू बंगाळ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये ही घटना घडली आहे. अनेक कोंबड्या भयभीत झाल्याने आणखी काही कोंबड्या दगावण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील मेहेंदुरी परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांचा या परिसरात नेहमीच वावर असतो. बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून हा भाग परिचित आहे. त्यामुळे या परिसरात अनेक बिबटे दिवस-रात्र संचार करीत आहेत. यातून मानवांवर हल्ल्याचे प्रकार देखील घडले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री १…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : धांदरफळच्या देशमुख मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका वृषाली सुनील कडलग यांच्या प्रदूषण विरहित सिग्नल झोन या उपकरणास प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. संगमनेर तालुक्यातील चिखली येथे ५ ते ७ जानेवारी दरम्यान झालेल्या ४७ व्या तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन पार पडले. इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी असे दोन गट त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक गट, माध्यमिक शिक्षक गट, परिचर गट अशा विविध गटांमधून शालेय साहित्यांची स्पर्धा झाली. संगमनेर तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थी शिक्षक परिचारक यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला. प्राथमिक शिक्षक गटात “कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे सिग्नल परिसरातील नियंत्रण” या विषयावरील मॉडेलला प्रथम…
विकास प्रक्रियेत माध्यमांचा सहभाग आवश्यक महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लोणी : जिल्ह्याकडे आजपर्यंत फक्त राजकीय दृष्टीकोनातून पाहिले गेले. पालकमंत्री बाहेरचेच देण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न झाल्यामुळेच जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा कधी मांडला गेला नाही. ही परिस्थिती सर्वांच्या सहकार्याने बदलविण्याचा आपला प्रयत्न आहे. पर्यटनाबरोबरच औद्योगिक विकासासाठी हा जिल्हा आता सर्वांना साद घालत आहे. माध्यमांनी सुध्दा या विकास प्रक्रीयेत सहभागी होवून मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून प्रवरा परिवाराच्यावतीने माध्यम प्रतिनिधींशी स्नेह संवादाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मंत्री विखे पाटील यांनी सविस्तर भाष्य करुन, जिल्ह्याच्या तयार करण्यात…
रविवार विशेष 🔸 प्रवीण पुरो राज्य विधिमंडळाच्या नागपूरमध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजांना स्वराज्यरक्षक म्हणून संबोधल्याच्या कारणास्तव भारतीय जनता पक्षाने राज्यभर त्यांचा निदर्शनं करून निषेध केला. झोपी गेलेला जागा झाला, असाच हा आंदोलनाचा प्रकार होता. स्वराज्यरक्षक अशी उपाधी दिल्याने अजित पवार यांनी संभाजी राजांचा जणू अवमानच केला असा प्रचार भाजपच्या धर्माभिमान्यांनी सुरू केला. वास्तविक पवार यांनी ते राज्याचे अर्थमंत्री असताना संभाजी राजांचा स्वराज्यरक्षक असा उल्लेख मागल्यावर्षी अर्थसंकल्प मांडताना जवळपास १० वेळा केला. राज्याच्या अर्थसंकल्पाची पूर्वतयारी ही वित्तमंत्रालयाच्या संबंधित अधिकार्यांकडून होत असते. अर्थसंकल्प जाहीर झाला त्यातील संभाजी राजांविषयीची टिपण्णं ही अधिकार्यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : गोवंश जनावरांच्या कत्तलीस बंदी असली तरी संगमनेरात मात्र या कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन सुरूच आहे. शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून येथील सुरू असलेल्या एका कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीचे गोवंश जनावराचे मांस ताब्यात घेत नष्ट केले. संगमनेर शहरातील मोगलपुरा भागातील खाटीक गल्लीमध्ये गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा टाकला असता तेथे पोलिसांना मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे तेथे आढळलेल्या मांसावरून निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे साडेआठशे किलो मांस ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिसांची छाप्याची कारवाई सुरू असताना सालेम साटम कुरेशी…
खोके सरकार, बोके सरकार आणि द्वेषाने वागणाऱ्या महसूलमंत्र्यांमुळे आमची उपासमार महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : आपण अनेक वर्ष महसूल मंत्रीपद उपभोगले आहे. मात्र आपण कधीही अशा प्रकारचे राजकारण केले नाही. प्रत्येकाला मदत करण्याची भूमिका होती. मात्र काही लोक आता आपल्या तालुक्याचे नुकसान करायला निघाले आहे. त्यांना येथील विकास बघवत नाही. तालुक्याचा विकास थांबविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. दहशतीचे राजकारण त्यांना आपल्या तालुक्यात व जिल्ह्यात करावयाचे आहे. मात्र संगमनेर तालुका आणि नगर जिल्हा हे कदापिही होऊ देणार नाही. असा थेट इशारा माजी महसूल मंत्री व काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ४ व ५ जानेवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत विविध उद्योजकांची भेट घेतली. या उद्योजकांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी डावोसला जात असल्याने यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. रोहित पवार यांनी एका ट्विट द्वारे सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले आणि ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन गेले. पण महाराष्ट्रात सगळ्या पायाभूत सुविधा असतानाही गुंतवणूकदारांना भेटून त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करायला लावावी,…
