Author: अनंत पांगारकर
मंगळवार, २ जुलै नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली. किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि महाविकास आघाडीचे ॲड. संदीप गुळवे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार ॲड. महेंद्र भावसार यांचा पराभव केला. कोल्हे दुसऱ्या स्थानी राहिले. दराडे (शिवसेना) यांना तिसऱ्या फेरी अखेर २६ हजार ४७६ मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६ इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा १९ व्या फेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची ५ हजार ६० मते मिळवून ३२ हजार…
हृदयविकार, कॅन्सर, मूत्रविकार, मेंदू व मनकेविकार शस्रक्रिया पूर्णपणे मोफत तीन दिवस औषधोपचारांसह बाह्यरुग्ण तपासणी पूर्णपणे मोफत शासकीय योजनेत न बसणाऱ्या शस्रक्रिया अल्पदरात उपलब्ध सोमवार, ०१ जुलै राज्यात सर्वात मोठ्या म्हणून गणल्या जाणाऱ्या तसेच सर्वसामान्य दर्जेदार उपचार मिळावे या हेतूने सुरू करण्यात आलेल्या आरोग्य साधना शिबिरास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते शुभारंभ करत आज एसएमबीटीमध्ये सुरुवात झाली. शिबिरात बाह्य रुग्ण तपासणी सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, हृदय उपचार, खुबा व गुडघा प्रत्यारोपण, सिझेरियन व नॉर्मल प्रसूती पूर्णतः मोफत करण्यात आली. याशिवाय तीन दिवस औषधोपचारासह बाह्य रुग्ण तपासणी देखील मोफत केली जाणार असून राज्यातील सर्वात मोठ्या या आरोग्य शिबिरात सलग तीन महिने…
सोमवार, १ जुलै विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज पाच नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजप नेत्या आणि लोकसभा निवडणुकीत बीड मतदार संघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांच्या नावाचाही यात समावेश आहे. विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून कोणाला संधी द्यावयाची याबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बैठकांचे सत्र सुरू होते. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून अनेक इच्छुकांची नावे देखील समोर आली होती. मात्र पक्षात वारंवार डावलले जात असल्याने नाराज असलेल्या तसेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा देखील यात समावेश होता. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेत संधी द्यावी यासाठी आग्रही मागणी केली जात होती.…
मागणी अयोग्य असेल, लॅबचे रिपोर्ट चुकीचे असतील तर माझ्यासह लॅबवर गुन्हा दाखल करा श्याम ऑइल मिल, भंडारी ॲग्रो आणि एस. व्ही. आसावा या तीन तेल विक्रेत्या कंपन्यांना पाठीशी कोण घालतंय? सोमवार १ जुलै संगमनेरमधील भेसळयुक्त तेल कंपन्यांविरुद्ध अनेकदा तक्रारी करून निवेदने देऊन देखील शासन स्तरावर कोणतीही कारवाई न झाल्याने अखेरीस या तेल कंपन्या सील करून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते, सुनील घुले यांनी प्रशासकीय इमारतीबाहेर उपोषण सुरू केले आहे. संगमनेरमध्ये खाद्य तेलात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याने हे तेल खाण्यास अयोग्य आहे. आर्थिक फायद्यासाठी स्वतःची संपत्ती वाढविण्यासाठी लोकांचे जीव गेले तरी चालतील अशा वृत्तीने येथील व्यापारी खाद्य तेलात भेसळ…
३० टेबलवर होणार मतमोजणी, अधिकारी व कर्मचारी यांचे मतमोजणी प्रशिक्षण पूर्ण रविवार, ३० जून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी दि. १ जुलैला केंद्रीय वखार महामंडळ, गोदाम अंबड येथे होणार आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांचे मतमोजणी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ६४ हजार ८४८ मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणीच्या अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळ गोदामात ३० टेबलवर होणार आहे. मतमोजणी केंद्राची पाहणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली. तसेच मतमोजणी संदर्भातील आवश्यक सूचना त्यांनी यावेळी संबंधित…
रविवार ३० जून वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्तेपदी सहा जणांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यात नुकतीच शिर्डी लोकसभा निवडणूक लढविलेल्या उत्कर्षा रुपवते यांचा समावेश करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. यात रूपवते यांच्यासह दिशा पिंकी शेख, अरुण जाधव, सिद्धार्थ मोकळे व तय्यब जाफर यांचा समावेश आहे. रुपवते यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत तब्बल ९० हजारावर मते मिळविली. सुरुवातीला काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या रूपवते यांच्यासाठी महाविकास आघाडीकडून ही जागा सुटू शकली नाही. माजी खासदारांना पुन्हा उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे प्रवेश देत त्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर रूपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश…
रविवार, ३० जून राज्याचा इतिहासात मुख्य सचिवपदी प्रथमताच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून आयएएस असलेल्या सुजाता सौनिक पहिल्या मुख्य महिला सचिव झाल्या आहेत. त्यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे. सुजाता सौनिक या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ लाभणार असून जून २०२५ मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. आज संध्याकाळी मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्या सूत्रे हाती घेतील. करीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला होता. तो कालावधी संपल्यानंतर आता या पदावर सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक…
रविवार, ३० जून शिधापत्रिकेच्या माध्यमातून धान्याचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका धारकाला संपूर्ण कुटुंबाची ई-केवायसी करणे रविवारपर्यंत बंधनकारक करण्यात आले होते. मात्र या प्रक्रियेत आलेल्या अडचणी लक्षात घेता लाभार्थ्यांना आणखी वेळ देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली. या अनुषंगाने आरपीआयचे (आठवले) शहराध्यक्ष कैलास कासार यांनी रविवारी तहसीलदार मांजरे यांची भेट घेत या प्रक्रियेतील अडचणीमुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी धान्य प्रक्रियेतून मुकण्याची शक्यता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी तहसीलदारांनी या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांना दिली. रविवारपर्यंत लाभार्थी कुटुंबांनी ई-केवायसी केली नाही तर एक जुलैपासून त्यांना मिळणारे धान्य बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र ई-केवायसी…
रविवार, ३० जून ब्रिटिश काळात बनवलेले कायदे बदलण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तीन नवीन फौजदारी कायदे आणले होते. हे कायदे आता लागू होणार आहेत. या तिन्ही फौजदारी कायद्यांबाबत या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राजपत्रात अधिसूचना जारी करण्यात आली होती. सोमवारपासून (१ जुलै) देशात तीन नवीन फौजदारी कायदे लागू होत आहेत, हे तीनही नवीन कायदे सध्या लागू असलेल्या ब्रिटीशकालीन भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि १८७२ च्या भारतीय पुरावा कायद्याची जागा घेणार आहेत. या कायद्यांची नावे आहेत – भारतीय न्यायिक संहिता (BNS), भारतीय नागरी संरक्षण संहिता (BNSS) आणि भारतीय पुरावा कायदा (BSA). अशा परिस्थितीत या कायद्यांतून कोणते बदल होणार आहेत…
रविवार ३० जून बँकेच्या भरण्यामध्ये पाचशे रुपयांच्या तेरा बनावट मोठा आढळून आल्याने बँकेच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर (नाशिक) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील हॉस्पिटलमधून मेडिक्लेमचे पैसे भरताना अज्ञात व्यक्तीने या नोटा दिल्याची माहिती समोर येत असून पोलीस तपास करत आहेत. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेचे शाखा व्यवस्थापक स्वप्निल सुनील नगरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या शाखेमध्ये सुबोध सुधीर रत्नपारखे (रा. वडाळा-पाथर्डी रोड) हे सकाळी पैशांचा भरणा करण्यासाठी आले. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या भरण्यात ५०० रुपयांच्या १३ बनावट नोटा असल्याचे निदर्शनास आले. या नोटा त्यांना नगर जिल्ह्यातील अकोले येथील हॉस्पिटलमधून मेडिक्लेमचे पैसे भरताना अज्ञात व्यक्तीने…
