Author: अनंत पांगारकर
गुरुवार, २० जून दोन मुलांचा शेततळ्यात टाकून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी या मुलांच्या आईसह तिच्या प्रियकराला अटक केली असून दोन्ही आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कविता सारंगधर पावसे व सचिन बाबाजी गाडे अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. तब्बल दोन महिन्यानंतर या खून प्रकरणाला वाचा फुटली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस यंत्रणेवर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव वाढविल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास करत प्रत्यक्षदर्शीच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळते. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे राम नवमीच्या दिवशी १७ एप्रिल रोजी शेततळ्यात दोन शाळकरी मुलांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…
गुरुवार, २० जून मेडिकल शिक्षणाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट- २०२४ या परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार झाला असून भाजपशासित राज्यातील विद्यार्थ्यांना ग्रेसमार्क देण्यात आले आहे. यामुळे प्रामाणिक व पात्र विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला असून या विरोधात युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली असून दोषींवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी विविध परीक्षांमधील गोंधळ, नीट परीक्षेतील गैरप्रकार, नुकतीच रद्द झालेली यूजीसीची-नेट परीक्षा, याचबरोबर पोलीसभरतीसह इतर स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकाराबाबत तरुणांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर प्रांताधिकारी…
गुरुवार, दि. २० जून राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्टयुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. या महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष उद्या शुक्रवारी (२१ जून) राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी सकाळी ११.०० वाजता सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करून भाजपाप्रणित सरकारचा निषेध करणार आहे. राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे.…
गुरुवार, २० जून बिहारमध्ये आरक्षणाची व्याप्ती वाढवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. आरक्षणाची व्याप्ती ५० टक्क्यांवरून ६५ टक्के करण्याचा राज्य सरकारचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला आहे. शिक्षण संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये एससी, एसटी, ईबीसी आणि इतर मागासवर्गीयांसाठी राज्य सरकारच्या ६५ टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. राज्य सरकारने आणलेला कायदा रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्ते गौरव कुमार आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी पूर्ण केल्यानंतर ११ मार्च रोजी निर्णय राखून ठेवला होता, त्यावर पाटणा उच्च न्यायालयाने आज निर्णय दिला.
गुरुवार, २० जून लोकसभा निवडणुकीनंतर १२ जुलैला राज्यात ११ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक पार पडणार आहे. मात्र तत्पूर्वीच ठाकरे गटाने ही निवडणूक स्थगित करण्याची मागणी केली आहे. यासाठी ठाकरे गट आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून ही तयारी अंतिम टप्प्यात आहे. आशा परिस्थितीत आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हाती आलेला नसताना या निवडणुका घेणं हे घटनाबाह्य असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे निवडणुका स्थगित करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. दरम्यान, यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची आज बैठक घेऊन ठाकरे गटाच्या वतीने या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे.…
गुरुवार, २० जून भरधाव वेगाने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तलाठी महिलेच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण ओढून नेल्याची घटना संगमनेर मध्ये समनापुर गावच्या शिवारात घडली. शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात चंदनापुरी (संगमनेर) येथे कार्यरत असलेल्या तलाठी भारती अशोक भुरके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी (१८ जून) सायंकाळी स्टाफच्या मैत्रिणी समवेत संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथे जात होत्या. यावेळी त्या त्यांच्या दुचाकी वर एकटाच असताना कोल्हार-घोटी मार्गावर समनापुर गावचे हद्दीत किसान ट्रॅक्टरच्या समोरून जात असताना पाठीमागून एका मोटरसायकलवर आलेल्या दोघा अनोळखी व्यक्ती पैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादीच्या गळ्यातील मिनी गंठण ओढून तोडून घेऊन भरधाव…
गुरुवार, २० जून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून यांचा २९ हजार ३१७ मतांनी पराभूत झालेल्या माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विखे पाटील यांच्यासह अनेक पराभूत उमेदवारांनी अशा प्रकारचा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला असून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM)आणि वोटर वेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल युनिटची (VVPAT) चौकशी करण्याची मागणी केली. या संदर्भात इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची चौकशी करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला एकूण १० अर्ज मिळाले आहेत. यातील बहुतांश उमेदवारांनी…
बुधवार, १९ जून दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र हे प्रकरण संशयास्पद असल्याने गावकऱ्यांनी वाढविलेल्या दबावानंतर या भावंडांचा शेततळ्यात बुडून नव्हे तर घातपात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहेत. आई आणि तिच्या प्रियकराने हे खून केल्याचे निष्पन्न झाले. या भावंडांचा खून आई कविता सारंगधर पावसे व सचिन बाबाची गाडे यांनी केला असून याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी सचिन बाबाजी गाडे याला अटक केली असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पाटील यांनी दिली. १७ एप्रिल रोजी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शेततळ्यात बुडून रितेश सारंगधर पावसे (वय…
बुधवार, १९ जून महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर संस्थेच्या नाशिक येथे झालेल्या निवडणुकीत अहमदनगर जिल्हा गव्हर्निंग कौन्सिलपदी संगमनेर मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश विश्वनाथ कलंत्री व उद्योजक निलेश चव्हाण यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेठ वालचंद प्रगती पॅनलने ९० पैकी ८५ जागांवर विजय मिळवला असून ललित गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. प्रकाश कलंत्री यांनी यापूर्वी संगमनेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविले आहे. कृषी व व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चरच्या माध्यमातून आम्ही विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रकाश कलंत्री व निलेश चव्हान यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शीबोलताना सांगितले.…
बुधवार, १९ जून न्यायालयीन कामकाजा दरम्यान ओळख निर्माण करत वृद्धत्व आणि आजारपणाचा गैरफायदा घेत शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या वृद्ध समाजसेविकेची जमिनीच्या व्यवहारात दोन कोटीची फसवणूक करत दहा लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी पुण्यात एका वकिलासह सहा जणांवर भादवि ४०६, ४२०, ३८५, ३८६, ३८७, ५०६, १२० (बी) ३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲड. रवी सुरेश जाधव (रा. लेन नं. ५, कोरेगाव पार्क), चंद्रकांत गजानन पोकळे, चिंतामणी अंकुश पोकळे (दोघे रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, धायरी), तरूणराज संजीव कुसाळकर, करण संजीव कुसाळकर (दोघे रा. गुलमोहर पार्क, औंध) आणि अभिजीत (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या…
