Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : विधान परिषद पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक नियमांचा व कायद्याचा बारकाईने अभ्यास करून ही निवडणूक मुक्त, निर्भय, निष्पक्ष व अत्यंत शिस्तबद्धरीतीने पार पाडावी. तसेच या निवडणुकीच्या कामात कुठल्याही प्रकारचा कसूर खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी भोसले यांच्या उपस्थितीत पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोसले बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, राज्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेची संगमनेर तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली असून अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे शेखर पानसरे, उपाध्यक्षपदी दैनिक सकाळचे आनंद गायकवाड आणि दैनिक सार्वमतचे राजू नरवडे यांची तर कार्याध्यक्षपदी गोरक्ष नेहे यांची निवड करण्यात आल्याची माहिती उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली. मराठी पत्रकार परिषदेची संगमनेर तालुक्याची अन्य कार्यकारिणी पुढीप्रमाणे:- चिटणीस संदीप इटप (लोकमंथन), सहचिटणीस मंगेश सालपे (नगर सह्याद्री), खजिनदार सुनील महाले (सायं.आनंद), संपर्क प्रमुख संजय अहिरे (युवावार्ता) व नीलिमा घाडगे (केसरी), प्रसिद्धी प्रमुख भारत रेघाटे (दैनिक भास्कर), संघटक धिरज ठाकूर (प्रवरातीर), मार्गदर्शक किसनभाऊ हासे, राजेंद्रसिंह चौहान, शिवपाल ठाकूर, कार्यकारिणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून सुरू झालेला साकुरमधील वाद नववर्षाच्या सुरुवातीपासूनच उफाळून आलेला असताना आता थेट घरातील व्यक्तीवर हल्ले करून विनयभंग करण्यापर्यंत पोहोचला आहे. या संदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात विनयभंग, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमाद्वारे सुमारे १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष बाजीराव खेमनर (निवृत्त कृषी अधिकारी), बुवाजी भागा खेमनर, किशोर बाजीराव खेमनर, इसाक अब्दुल पटेल, विश्वजीत सुभाष खेमनर, बबलु ऊर्फ आदिक बाळासाहेब शेंडगे, सद्दाम मन्सुर चौगुले यांच्यासह आणखी दहा जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून गुरुवारी दुपारी घारगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्ह्याची नोंद करण्यात आली…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : तरुणीच्या श्वासनलिकेत अडकलेली कानातील सोन्याची रिंग दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करत काढण्यात आणि तरुणीचे प्राण वाचविण्यात संगमनेरमधील डॉक्टरांना यश आले आहे. श्वसन विकार व छाती रोग तज्ञ डॉ. अमेय अनिल देशमुख यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. फुफ्फुसाच्या संसर्गाने अत्यवस्थ असलेल्या तरुणीला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे तिला उपचारासाठी येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तरुणीची प्रकृती खालावत चालल्याने हॉस्पिटल प्रशासनाने येथील श्वसन विकार व छाती रोग तज्ञ अमेय देशमुख यांना संपर्क केला होता. देशमुख यांनी रुग्णालयात रुग्णाची प्राथमिक तपासणी केली. मात्र त्यातून निदान होत नसल्याने सिटीस्कॅन तपासणी करण्याचे ठरले. तपासणीअंती रुग्णाच्या उजव्या फुफ्फुसामध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात मागील वर्षी अंगणवाडी, प्राथमिक शाळा खोल्या विविध रस्ते यांसह विविध विकास कामांच्या केलेल्या मागणीतून व पाठपुराव्यातून जिल्हा विकास नियोजनमधून या कामांना ६ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तत्कालीन सरकारमध्ये मंत्री असलेल्या थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून घेत ही कामे रात्रंदिवस सुरू ठेवली होती. याचबरोबर तालुक्यातील रस्ते, अंगणवाडी, प्राथमिक शाळा खोल्या व विविध विकास कामांसाठी देखील मोठ्या निधीची मागणी केली होती. मात्र सत्ता बदल झाला आणि अनेक विकास कामांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयांमध्ये आंतरशालेय विज्ञान-गणित प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या ७२ उपकरणांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. आजच्या प्रगतीच्या, धावपळीच्या विज्ञान युगात तसेच स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकून राहायचे असेल तरं त्यांच्यामध्ये विज्ञानवादी दृष्टीकोन विकसित होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने देवगड विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणजे नुकतेच पार पडलेले विज्ञान गणित प्रदर्शन होय. विद्यार्थ्यांमधील सुप्त विज्ञानवादी विचारांना चालना मिळण्यासाठी, त्यांच्यातही एक शास्रज्ञ लपलेला आहे याची त्यांना जाणीव करून देण्याच्या अनुषंगाने प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनाचा शुभारंभ देवगड विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : पावसाळ्यात झालेल्या जास्तीच्या पावसामुळे स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिराकडे जाणाऱ्या पुलाच्या पायाच्या स्लॅबचा राफ्ट तुटल्यामुळे म्हाळुंगी नदीवरील पूल खचला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी या पुलाच्या नवीन उभारणीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांच्या माध्यमातून लवकरच या पुलाची उभारणी केली जाणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी दिली. विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरात अनेक मोठमोठे विकास कामे मार्गी लागली असून गेल्या काही वर्षात या शहराने जलदरीत्या विकासाचे शिखर गाठले आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरात अनेक विकासाच्या योजना राबवल्या गेल्या. मोठमोठ्या वैभवशाली इमारतींसह हायटेक बसस्थानक हे शहराचे वैशिष्ट्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : स्नेहालय संचलित रेडिओ नगर ९०.४ एफएमचा १३ जानेवारीला१२ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्या निमित्ताने रेडिओ उद्धघोषक स्पर्धा (RJ कॉन्टेस्ट) आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तीन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ९०११११२३९० या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावयाचा आहे. स्पर्धकांना रेडिओ नगर केंद्रावर आल्यानंतर दोन ते तीन मिनिटात स्क्रिप्टचे वाचन सादर करावयाचे आहे. स्पर्धेचा निकाल १३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाणार असून विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. विजेत्यांसाठी रेडिओवर स्पेशल शो आयोजित करण्यात येईल.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर शहरातील मंगेश सुरेश घुले या वाळूतस्कराला एक वर्षासाठी प्रांताधिकारी नगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. तसे आदेश प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी काढले आहे. यापूर्वी प्रांताधिकार्यांनी दोघा तस्करांचे हद्दपारीचे आदेश काढले होते, त्यात आणखी एकाची भर पडली आहे. मंगेश घुले यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. वाळू तस्करी करणाऱ्या घुले याच्या विरोधात शहर पोलिसांमार्फत हद्दपारचा प्रस्ताव प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. प्राथमिक चौकशीसाठी प्रांताधिकार्यांनी पोलीस उपाधीक्षकांना आदेश दिले होते. पोलीस उपाधीक्षकांनी आपला चौकशी अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे सादर करत घुले याला दोन वर्षासाठी नगर, नाशिक व पुणे या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : चोऱ्या, घरफोडी, दरोडे आणि खुनापाठोपाठ आता संगमनेरमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमधील डिझेलची देखील चोरी सुरू झाली आहे. नासिक-पुणे महामार्गावर सायखिंडी शिवारात उभ्या असलेल्या एका ट्रकच्या डिझेल टाकीतून अडीचशे लिटर डिझेल अज्ञात चोरट्याने काढून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात अमोल भाऊसाहेब गायकवाड राहणार सायखिंडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध गुन्ह्यांचा तपास लावण्यात अपयशी ठरलेल्या शहर पोलिसांना नव्या वर्षात आता वाहनांतील डिझेल चोरांचा देखील शोध घ्यावा लागणार आहे. गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी (४ जानेवारी) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास नासिक-पुणे महामार्गावरील…
