Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री लेजंड एंटरटेनमेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आल्यानंतर तो रद्द करण्याची आफत संयोजकांवर ओढवली आहे. नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या मालपाणी लॉन्स येथे लेजंड एंटरटेनमेंट या ग्रुपने नववर्ष स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या युवक-युवतींना इंस्टाग्रामवरील स्टारचे आकर्षण दाखवून व युवकांना २०० रुपये फी आकारून महिला-युवतींना विनामूल्य प्रवेश देत या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. मात्र या कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या संबंधित विभागाकडून घेतल्या नसल्याचा तसेच सदर कार्यक्रमाची तिकीट विक्री महाविद्यालयात जाऊन युवक-युवतींना पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण दाखवून केली जात असल्याचा आक्षेप घेत या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याची मागणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील मेधा संस्कृतिक महोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू ठरला असून या सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत झालेल्या ‘स्वरामृत’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केलेले गायन व वादन हे संस्मरणीय ठरले. या कार्यक्रमामुळे अमृतवाहिनीतील वातावरण संगीतमय झाले होते. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने गायन व वादन कलेची स्वरामृत म्युझिकल नाईट पार पडली. यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख, झी मराठी सारेगमपचा उपविजेता सारंग भालके, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, डॉ. बी. एम. लोंढे, मेधाचे समन्वयक प्रा. जी.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये सुरु असलेल्या तिसर्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या तिसर्या दिवशी रात्री मंचावर खास महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. ही चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहताना देशभरातील २९ राज्यांमधून आलेल्या स्पर्धकांसह प्रेक्षकांमध्येही वीरश्री संचारली. शक्ती आणि चपळता यांचा संगम असलेल्या साहसी खेळांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. यावेळी भारत माता की जय आणि वंदे मातरच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मंगळवारपासून (२७ डिसेंबर) संगमनेरात राष्ट्रीय योगासन स्पर्धा सुरु आहे. शुक्रवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. देशातील २९ राज्यांमधून आलेले स्पर्धक, प्रशिक्षक, पंच, पालक या सर्वांच्या मनोरंजनासाठी गुरुवारी रात्री विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : उत्तर नगर भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने “अटल डिबेटिंग क्लब” अंतर्गत संगमनेर मध्ये गुरुवारी घेण्यात आलेल्या अटल वकृत्व स्पर्धेत ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. १२ जानेवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय अटल वकृत्व स्पर्धेसाठी विजेत्यांमधून स्पर्धक निवडले गेले. भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने २५ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्यंत राज्यभरात “अटल युवा पर्व”चे आयोजना अंतर्गत भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची लोकांशी संवाद साधण्याची कला आणि अतुलनीय वक्तृत्व हे राष्ट्र व युवकांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वाचा वारसा जपण्यासाठी व वक्तृत्वाची कला अंगी असणाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्याच्या हेतूने भारतीय जनता युवा मोर्चामार्फत वक्तृत्व…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अकोले : पंचायत समिती सभागृहात झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय ग्राहक दिनात ग्राहक, नागरिकांनी विविध तक्रारी उपस्थित केल्या. याबाबत तहसीलदारांनी संबंधित खात्यांना सुचना देऊन त्वरीत योग्य सेवा देण्यास सांगितले जाईल असे सांगितले. ग्राहक दिनात विविध विषयावर सखोल चर्चा होऊन ग्राहकांनी अनेक तक्रारी मांडल्या. यात प्रामुख्याने अकोले, देवठाण, सिन्नर रस्त्याचे रूंदीकरणाचे कामात खडीवर माती टाकल्याचे फोटो अधिकार्यांना दाखविण्यात आले. तर कोल्हार घोटी राज्य मार्गाचे काम अत्यंत संथगतीने चालु असल्याची तक्रार देखील माडण्यात आली. शिवाय रस्त्याच्या कामाचा दर्जा देखील निकृष्ट असल्याचे सांगण्यात आले. याबाबत तहसिलदार सतीश थेटे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांना तातडीने सुचना दिल्या. याशिवाय अकोले तालुक्यातील आदिवासी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयातील कॅन्टीन चालकाच्या हलगर्जीपणामुळे एमबीबीएस शाखेत शिकणाऱ्या दीडशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. बाधित विद्यार्थ्यांवर एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. नामांकित महाविद्यालयात विषबाधेची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथे असलेल्या नामांकित एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात ही घटना घडली. महाविद्यालयाच्या कॅन्टीन मध्ये बुधवारी (दि.२८) रात्री विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर त्यांना त्रास झाल्याची माहिती समोर येत आहे. एकूण दीडशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. महाविद्यालयात असलेल्या कॅन्टीनच्या चालकाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अशी घटना घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान या प्रकाराला एसएमबीटीकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. असाच काहीसा प्रकार काही महिण्यापूर्वी इगतपुरी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिकमधील सुश्रुत हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. प्राची पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कारण फरार हल्लेखोरांना पकडल्यानंतर समोर आले आहे. प्राथमिक चौकशीत कोवीड काळात झालेल्या आत्याच्या मृत्युचा राग मनात धरून हा हल्ला केल्याच हल्लेखोरांनी सांगितल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिली. राष्ट्रवादीच्या नेत्या असलेल्या डॉ. प्राची पवार ह्या नाशिकचे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते डॉ. वसंत पवार आणि मविप्र संस्थेच्या माजी सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार यांच्या कन्या आहेत. डॉ. प्राची पवार यांच्यावर १३ डिसेंबर रोजी गोवर्धन शिवारात जीवघेणा हल्ला झाला होता. पवार यांच्यावर कोणी आणि कशासाठी हल्ला केला याचा उलगडा होत नव्हता. अखेर बुधवारी रात्री नाशिक ग्रामीण पोलिसांना हल्लेखोरांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर येथील देवांग कोष्टी समाजाच्या युवक अध्यक्षपदी विशाल भारत ढोले यांची उपाध्यक्षपदी अक्षय भागवत यांची, श्री चौंडेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी दिपाली खोजे, उपाध्यक्षपदी संगीता भंडारे यांची निवड करण्यात आली. संगमनेर येथील मेनरोडवर असलेल्या देवांग कोष्टी समाजाचे चौंडेश्वरी देवीचे मंदिरामध्ये कोष्टी समाजाची युवक समितीची नूतन कार्यकारिणी निवडीसाठी नुकतीच बैठक पार पडली. यावेळी देवांग कोष्टी समाज पदाधिकारी यांनी युवक व महिला यांची एक समिती नेमण्यात यावी यासाठी प्रयत्न केले. त्यांनतर ही समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये देवांग कोष्टी समाजाच्या युवक अध्यक्षपदी विशाल भारत ढोले, उपाध्यक्षपदी अक्षय भागवत, कार्याध्यक्षपदी आलेख कुदळ, खजिनदारपदी स्वप्नील खोजे, सचिवपदी अजित बडदे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे गुणवत्तेवर याचा मोठा परिणाम होत असल्याने जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांच्या जागा तातडीने भरजे गरजेचे असून सरकारने शिक्षकांच्या सर्व जागांसाठी तातडीने भरती करावी, अशी आग्रही मागणी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रासह विविध मागण्याही त्यांनी आग्रहपूर्वक मांडल्या आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे आमदार डॉ. तांबे मागणी करताना म्हणाले की, राज्यात आज मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषद शाळेमध्ये या रिक्त असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या जागा त्वरित भरणे आवश्यक आहेत. हजारो…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : रस्त्यावर दुकान टाकून बॅग विकण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाची परिणती थेट चाँपरचा वापर करत हल्ल्यापर्यंत जाऊन पोहोचली. यात एक जण जखमी झाल्याने शहर पोलीस ठाण्यात दहा ते अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेर मेहबूब पारवे असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर निखिल मुर्तडक, श्याम अरगडे, नयन मुर्तडक, सुनील धात्रक, सागर (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यासह आणखी पाच ते सहा जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात जखमी युवकाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी सायंकाळी फिर्यादीचा मुलगा आणि आरोपींमध्ये बॅग विकण्याच्या कारणावरून वाद झाला होता. फिर्यादीचा मुलगा व त्याचे मित्र रात्री…
