Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क रात्रीच्या वेळी घराच्या पडवीमध्ये जेवण करत असताना घराचे छत अंगावर पडल्याने चुलत्याचा व पुतणीचा मृत्यू झाला आहे. याशिवाय वृद्ध महिला गंभीर जखमी झाले असून तिच्यावर रुग्णालयात उच्चार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. लक्ष्मण चंद्रभान सोनवणे (वय 42 वर्ष) व सानिका एकनाथ सोनवणे (वय 8 वर्ष) असे मृत झालेल्या चुलत्या-पुतणीचे नाव आहे. तर मृत लक्ष्मण सोनवणे यांची आई वैजयंतीबाई चंद्रकांत सोनवणे (वय 65 वर्ष) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.वेल्हाळे येथे शुक्रवारी रात्री सोनवणे कुटुंबीय आपल्या बंगल्याशेजारी असलेल्या पत्र्याच्या पडवीमध्ये रात्री जेवण…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत सत्यजीत तांबे विजयी झाले आहेत. कॉग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विजयानंतर त्यांची पुढील वाटचाल कशी असेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतांनाच एकीकडे भारतीय जनता पक्षाने त्यांना थेट पक्षात येण्याची ऑफर दिली असतांनाच दुसरीकडे कॉग्रेसचेही दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सत्यजीत तांबेंना एक महत्वाचा राजकीय सल्ला दिला आहे. अजित पवार म्हणाले, इतके दिवस चेंडू कॉग्रेसच्या कोर्टात होता. सत्यजीत अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्याला कॉग्रेस, भाजपा त्यांच्याकडे बोलाविण्याचा प्रयत्न करणार. आता पुढे त्याला बरीच…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवीन आमदार म्हणून निवडून आले आहेत. या मतदारसंघावर सलग चौथ्या निवडणुकीतही तांबे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. सत्यजित तांबे यांनी अपेक्षित मतांचा कोठा पूर्ण केला. त्यांनी महाविकास आघाडीने परस्पर केलेल्या शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे. राजकीय घडामोडींमुळे रंगतदार ठरलेल्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात कोण गुलाल उधळणार याविषयी आता राजकीय चर्चांना जोर आला होता. महाविकास आघाडीची उमेदवारी मिळून देखील आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजित तांबे याचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मुदतीत एबी फॉर्म न मिळाल्याने तांबे यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विधान परिषदेच्या औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचा निकाल जाहीर झाला असून या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांचा विजय झाला आहे. त्यामुळे औरंगाबादवर राष्ट्रवादी काँग्रेसने तर नागपूरवर काँग्रेसने विजय मिळवत आपले खाते उघडले आहे. भाजपला कोकणातून विजय मिळाला आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या निकालामध्ये महाविकास आघाडीला दोन जागा तर भारतीय जनता पार्टीला एक जागा मिळाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी एकेका जागेवर विजय मिळविला असून चुरशीच्या ठरलेल्या नाशिकच्या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे दुसऱ्या फेरी अखेर आघाडी घेऊन असले तरी अद्याप तीन फेऱ्या बाकी आहेत. औरंगाबादच्या लढतीकडे राज्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नासिक पदवीधर मतदार संघाची मतमोजणी सुरू असून दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे दुसऱ्या फेरी अखेर 15000 पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहे. दुसऱ्या फेरीनंतर तांबे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केले असल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मतमोजणी परिसरात मोठा जल्लोष सुरू केला आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत दिसत आहे. असे असले तरी या पदवीधर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पदवीधरांनी आपली मते बाद केली आहेत. बाद मतांचे प्रमाण लक्षात घेता पदवीधरांनी असे का केले असावे अशी शंका निर्माण होते. दुसऱ्या फेरी अखेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कोकण शिक्षक मतदार संघातून भाजपने विजयी सलामी दिल्यानंतर त्या पाठोपाठ सत्ताधारी भाजपसाठी महत्त्वपूर्ण असलेला फडणवीस-गडकरी यांचा बालेकिल्ला नागपूरचा गड मात्र महाविकास आघाडीने आपल्या ताब्यात घेतला आहे. नागपूर शिक्षक मतदार संघातून काँग्रेसचे सुधाकर आडबाले मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करणाऱ्या सुधाकर आडबाले यांच्या विजयाची घोषणा करण्यात आले असून महाविकास आघाडीचा पहिला विजयी उमेदवार जाहीर झाला आहे. सुधाकर आडबाले यांनी भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार नागो गाणार यांचा पराभव केला. नागपूर मतदार संघ हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हक्काचा बालेकिल्ला मानला जातो या बालेकिल्लातून काँग्रेसचा पर्यायाने महाविकास आघाडीचा उमेदवार…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी महसूल मंत्री, लोकनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (5 फेब्रुवारी) सायंकाळी साडेसात वाजता जाणता राजा मैदान येथे आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शिंदेशाही बाणा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात हे गोरगरीब व सर्वसामान्यांचे नेते असून महाराष्ट्रातील सुसंस्कृत नेतृत्व म्हणून लोकप्रिय आहेत. महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक सलग आठ वेळा निवडून येत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण ,पाटबंधारे ,रोजगार हमी योजना, खारजमीन, राजशिष्टाचार, जलसंधारण या विभागांची खाती सांभाळली आहेत. महसूल विभागाला हायटेक बनवताना लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून शालेय शिक्षण विभाग…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विधान परिषद निवडणुकीतील निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून कोकण विभागीय शिक्षक मतदार संघातील पहिला कल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आला आहे. या मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजय झाले असून त्यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. 30 जानेवारीला नाशिक अमरावती पदवीधरसह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक झाली. पदवीधर मतदार संघाच्या पाचही जागांसाठी गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरुवात झाली असून नाशिक पदवीधर मतदार संघाच्या प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात होण्यास दुपार उजाडली होती. नाशिकचे मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच कोकण विभागीय शिक्षक मतदार संघाचा पहिला निकाल समोर आला आहे. कोकण विभागीय शिक्षक मतदार संघातील मतदानाची…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लोणी : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून ग्रामीण भारताच्या विकासाचा नवा मार्ग दृष्टीक्षेपात आला आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या कराबाबत घेतलेला महत्वपूर्ण निर्णय हा सहकार चळवळीच्या आर्थिक स्थैर्यासाठी मिळालेले मोठा पाठबळ असल्याची प्रतिक्रीया महसूल, पंशुसंवर्धन आणि दूग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पावर भाष्य करताना विखे पाटील म्हणाले की, सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पामध्ये विकासाचे सात प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आल्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागाच्या विकासाचा नवा रोडमॅप आता स्पष्ट झाला आहे. ग्रामीण भागात कृषि क्षेत्राला पाठबळ देतानाच सेंद्रीय शेतीला या अर्थसंकल्पामध्ये दिलेला प्राधान्यक्रम हा निश्चितच महत्वचा असल्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक / अहमदनगर नाशिक पदवीधर मतदार संघाची मतमोजणी गुरुवारी (ता. 2 फेब्रुवारी) नाशिकच्या सय्यद पिंपरी येथे होत आहे. त्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे मतमोजणी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून 28 टेबलवर मतमोजणी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. सय्यद पिंप्री येथील गोदामात मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून गुरुवारी सकाळी मतमोजणी केली जाणार आहे. अशी आहे मतमोजणी प्रकिया नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण 1 लाख 29 हजार 456 मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणी सय्यद पिंप्री येथील गोदामात 28 टेबलवर होणार आहे. एका टेबलावर…
