Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : राष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेच्या दुसर्या दिवस अखेर महाराष्ट्र संघाने चमकदार कामगिरी करून उपांत्य फेरीत भक्कम आघाडी घेतली आहे. २७ डिसेंबर पासून ध्रुव ग्लोबल स्कुलच्या क्रीडा संकुलात तिसरी राष्ट्रीय योगासन स्पर्धा सुरू आहे. देशातील २९ राज्यातील ७८९ योगासनपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राला प्रथमच राष्ट्रीयस्तरावरील योगासन स्पर्धा आयोजित करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. महाराष्ट्र संघातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने उपांत्य फेरीत जोरदार आघाडी घेतली आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल असणार्या तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, हरयाणा, कर्नाटक इत्यादी राज्यांच्या खेळाडूंमध्ये अंतिम फेरीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. योगासनांचे पारंपरिक (ट्रॅडिशनल) सादरीकरण, त्याचप्रमाणे संगीतमय कलात्मक (आर्टिस्टिक) सादरीकरण, तालात्मक…
अवैध ठिकाणी मद्यप्राशन कराल तर होईल कारवाई महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत मोठया उत्साहाने केले जाते. या कालावधीमध्ये अवैध, परराज्यातील, बनावट मद्यविक्रीची शक्यता लक्षात घेता ते रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत नियोजन करण्यात आलेले असून या अवैध मद्य विक्री, वाहतूक तसेच अवैध ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कार्यकारी अधिकारी व भरारी पथके तसेच अकार्यकारी घटकावरील काही अधिकारी यांची आठ विशेष पथके जिल्हयात नेमली असून त्यांच्या कार्यक्षेत्रात सातत्याने रात्रगस्त घालण्यात येणार आहे. या पथकाद्वारे रात्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : पदवीधर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय व निमशासकीय, अशासकीय कर्मचारी, यांच्या विविध प्रश्नांसाठी विधानपरिषदेत सातत्याने पाठपुरावा करणारे, ‘नेता नव्हे मित्र’ अशी ओळख असलेले नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांची विधानपरिषदेच्या काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. आमदार डॉ. तांबे यांनी बी. जे. मेडिकल सारख्या देशातील नावाजलेल्या महाविद्यालयातून एम. एस. शिक्षण घेतल्यानंतर संगमनेरमध्ये चार दशके गोरगरिबांना आरोग्य सेवा दिली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरच्या सहकार, शिक्षण, समाजकारण, कृषी अशा विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देताना आदिवासी, अपंग व मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी मोठे काम केले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : पोस्टर फाडण्याचा राग मनात धरून राजकीय वर्चस्व वादातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोघा तरुणांची गोळ्या घालून हत्या केल्याप्रकरणी आरोपी गोविंद दत्तात्रय गायकवाड याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर उर्वरित 13 आरोपींची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची साडेचार वर्षांपूर्वी २८ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळच्या वेळी बीड रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोर एका हॉटेलमध्ये चहा पीत असताना या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. राजकीय वर्चस्ववादातून झालेल्या या दुहेरी हत्याकांड प्रकरणी तत्कालीन पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अनंत पांगारकर संगमनेर : म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरानंतर स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर, गंगामाई घाटाकडे जाणारा पूल खचल्याने तब्बल अडीच महिन्याच्या कालावधीनंतर देखील त्याची दुरुस्ती प्रशासनाला करता आलेली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना या पुलावरून जीवघेणी कसरत करावी लागत आहे. पुलावरील शॉर्टकट प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत. या धोकादायक शॉर्टकटचा व्हिडिओ येथील नागरिकांनी महाराष्ट्र संवाद न्यूजला पाठवला आहे. यावर्षी म्हाळुंगी नदी वारंवार आणि दीर्घकाळ प्रवाही राहिली आहे. त्यातच झालेल्या पावसामुळे नदीला पूर आल्याने नदीवरील घोडेकर मळ्याकडे जाणारा कच्चा फुल वाहून गेला. मात्र या लगतच असलेला साई मंदिर, पंपिंग स्टेशन, गंगामाई घाट, घोडेकर मळा, वेताळेश्वर महादेव…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर साहित्य परिषद आणि पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत १० तालुक्यातील ७३ विद्यालयामधील २४६ स्पर्धकांच्या सहभागामुळे या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे हे बारावे वर्ष होते. परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख आणि संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांच्या उपस्थितीत केलेल्या दीप प्रज्वलनाने स्पर्धेची सुरुवात झाली. यावेळी माजी प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे, डॉ. जी. पी. शेख, डॉ. हनुमंत मोटेगावकर, प्रा. शशांक गंधे, नंदकुमार बेल्हेकर, प्रकल्प सचिव कैलास काळे, सुरेश ठोंबरे, माजी गटशिक्षणाधिकारी सुभाष पवार, प्राचार्य मुकुंद डांगे, स्वाती देशमुख, प्रकल्पप्रमुख बाळकृष्ण महाजन, विभागप्रमुख ललित शेळके…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन नगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा आणि नगरहून सरळ पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन दिवसांसाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर ते २ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत आदेश काढले आहेत. अहमदनगरकडून पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावरून जाणाऱ्या वाहन धारकांसाठी पर्यायी मार्ग.. बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी बेलवंडी फाटा, दैवदैठण, ढवळगाव, पिंपरी कोळंडर, उक्कडगाव, बेलवंडी, नगर-दौंड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ, मढेवडगाव, काष्टी, दौंड-सोलापूर-पुणे महामार्गामार्गे पुण्याकडे जावे लागेल. तर नगरकडून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्य शासनाने आधार प्रमाणीकरण करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. माजी महसूल मंत्री विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून दुसऱ्या यादीमध्ये संगमनेर तालुक्यातील ७४१६ शेतकऱ्यांची नावे असून त्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात व तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना विनाअट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली होती. तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. राज्याचे तत्कालीन…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कोकमठाण : आपत्तीच्या काळात मानवतेच्या दृष्टीकोनातून केलेली मदत समाजाला एकसंघ ठेवण्याचे काम करते. असे प्रतिपादन कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी केले. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २६ डिसेंबर २०२२ ते ६ जोनवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या १२ दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कोकमठाण येथील आत्मा मलिक ध्यानपीठ येथे सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे, अहमदनगर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर मिसाळ,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : खून, दरोडे, चोऱ्या संगमनेरमध्ये नित्याची बाब बनले आहे. सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घुलेवाडीमधील खाबीया अॅब्रोसिया या पॉश निवासी संकुलात एकाचवेळी काही घरांमध्ये चोरीचा प्रयत्न केला. एका बंद घरातून सुमारे पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला असल्याचे समोर आले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे आरोपी शोधण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे चोरटे, दरोडेखोर स्थानिक पोलीस यंत्रणेला दररोज नवनवे आव्हान देताना दिसतात. शहराच्या काही भागात नागरिकांना चोर, दरोडेखोरांचे दर्शन देखील झाल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील प्रभारी पोलिस राज संपवून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संगमनेरसाठी खमके अधिकारी देण्याची गरज व्यक्त होत आहे.…
