Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात येणारा मेधा महोत्सव विश्वास पाटील, कृष्णप्रकाश, प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसह सिने कलाकारांच्या उपस्थितीत रंगणार आहे. महाविद्यालयीन वर्तुळात राज्यात नावाजलेल्या हा मेधा महोत्सव गुरुवारी (23 फेब्रुवारी) सुरू होत असून त्याचा समारोप शनिवारी (25 फेब्रुवारी) होणार असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख यांनी दिली. अधिक माहिती देताना देशमुख म्हणाल्या, युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून मागील सहा वर्षापासून अमृतवाहिनीत मेधा महोत्सव होत असतो. यामध्ये डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, सिने अभिनेता विवेक ओबेराय, सिने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार राऊत यांनी नाशिक मध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी आक्षेप घेण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बेलदार यांच्या तक्रारीवरून खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणून त्यांची बदनामी केल्याचा आरोप…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पुण्यासारख्या मोठ्या शहरात होणारी महसूल परिषद यावर्षी पुण्यामध्ये न होता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून पहिल्यांदाच ग्रामीण भागात लोणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये होत आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांना नवीन कायदे आणि सरकारी धोरणाबाबत प्रशिक्षण देण्यासाठी दरवर्षी महसूल परिषद घेतली जात असते. यावर्षी येत्या 22 आणि 23 फेब्रुवारी असे दोन दिवस ही परिषद होत असून या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल. महसूल विभागाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दोन्ही दिवस या परिषदेला उपस्थित राहणार आहे. याशिवाय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी चोरी करताना शिक्षिकेला मारहाण करत सोन्याचे दागिने आणि रोकड रकमेसह ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेत पोबारा केल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील बोटा गावामध्ये समोर आला आहे. याशिवाय चोरट्यांनी आजूबाजूच्या तीन-चार घरांमध्ये देखील चोरीचा प्रयत्न केला. संगमनेर शहर व तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. चोरटे, गुन्हेगारांनी तालुक्यात उच्छाद मांडला असून गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवर असलेला वचक संपला असून त्यामुळे पोलीस यंत्रणा नेमके काय करते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंगलबाई पांडुरंग फटांगरे असे मारहाण झालेल्या शिक्षिकेचे नाव असून त्या विद्यानगर (बोटा) येथे राहतात. शनिवारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी ‘दैनिक लोकआवाज’चे विठ्ठल लांडगे यांची, तर ‘नगर स्वतंत्र’चे सुभाष मुदळ यांची सरचिटणीसपदी एकमताने निवड करण्यात आले असून कार्यकारिणीमध्ये 13 जणांचा समावेश करण्यात आला आहे. प्रेस क्लब अहमदनगर (नोंदणी क्र. एफ/२०८७/९२) या नोंदणीकृत संस्थेची कार्यकारिणी रविवारी (१९ फेब्रुवारी) २०२३ झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने निवडण्यात आली. अहमदनगर प्रेस क्लबचे संस्थापक उपाध्यक्ष सतीश डेरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला व्यासपिठावर अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाषशेठ गुंदेचा, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी उपस्थित होते. तर, सभेला सुमारे ९० सभासद उपस्थित होते. सुमारे ३० वर्षानंतर अहमदनगर प्रेस क्लब अहमदनगर (नोंदणी क्र. एफ/२०८७/९२)…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रविवारी संगमनेर नगर परिषदेमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक देखील काढण्यात आली होती. शहरातील बाजारपेठ, तेलीखुंट चौक, सय्यद बाबा चौक, मेन रोड, चावडी, अशोक चौक या प्रमुख मार्गावरुन ही मिरवणूक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापाशी आली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सांगता झाली. प्रारंभी संगमनेर नगर परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या एका व्यासपीठावर संगमनेर नगर परिषदेचे प्रशासक डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याधिकारी राहुल वाघ, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव, शहर अभियंता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेरच्या मालपाणी परिवाने गेली कित्येक वर्ष यशस्वी उद्योगासह लोकहिताचे विविध उपक्रम राबविण्याची परंपरा जोपासली आहे. आपल्या औद्योगिक विस्ताराच्या माध्यमातून हजारों परिवारांना रोजगार मिळवून दिला आहे. औद्योगिक, शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या व्यापक विस्तारातून पदोपदी प्रभू श्रीरामाच्या कार्याचे दर्शन घडते, असे गौरवोद्गार विश्वविख्यात रामकथा मर्मज्ञ, युगवक्ता डॉ. कुमार विश्वास यांनी काढले. उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मालपाणी परिवाराने त्यांच्या दोन दिवशीय रामकथेचे संगमनेरात आयोजन केले आहे. या कार्यक्रमा वेळी विश्वास बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी सभापती, आमदार दिलीप वळसे पाटील, माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, भाजपचे नेते श्याम जाजू, माजी नगराध्यक्षा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भाजपाचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेल्या दोन दिवसांपासून पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी आणि रविवारी त्यांच्या उपस्थितीत दोन कार्यक्रम झाले. या दौऱ्या दरम्यान त्यांनी पोट निवडणूक प्रचारात सहभाग घेतला नाही यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रदेश भाजपविरोधातील असंतोष आणि संभाव्य ‘निकाल’ त्यांनीही हेरला असावा, असे ट्विट करत शहा आणि भाजपला कोपरखळी मारली. पुढच्या रविवारी पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे, आपल्या दौऱ्या दरम्यान अमित शहा यांनी निवडणूक प्रचारात सहभाग घेतला नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेलं ‘हे खूप काही सांगून जाणारं आहे,’ ट्वीट चर्चेत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढला असून आता शिंदे गटातील मंत्र्यानेच उद्धव आणि आदित्य ठाकरेंना शिवसेना प्रवेशाची खोचक ऑफर दिली आहे. खऱ्या खोट्या शिवसेनेतील वाद वाढीस लागला असतानाच पक्षात आता फक्त बापलेकच शिल्लक राहिल्याची टीका करत उद्धव ठाकरे गटाच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. ज्यांच्या विरोधात बंड केलं, त्यांनाच आता आपल्या गटाकडे म्हणजेच शिवसेनेकडे बोलावत शिवसेनेचे शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे यांनी ठाकरे यांना ही ऑफर दिली आहे. शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांवर सातत्याने टीका केली जात आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला…

Read More

रविवार विशेष ॥ प्रवीण पुरो अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचा निकाल लागला. निवडणूक आयोगाने शिवसेनेची मालकी एकनाथ शिंदेंकडे असल्याचा निर्णय दिला आणि धनुष्यबाण ही निशाणीही शिंदेंच्या पारड्यात टाकत आपला विवेकही विकून टाकला. खरी सेना कोणाची, हे निवडणूक आयुक्त जाणत नसतील तर ते आयुक्त कसले? शिवसेनेला दिलेल्या मान्यतेविषयी आयोग अनभिज्ञ असेल तर गंभीरच म्हटलं पाहिजे.  टी.एन.शेषन होते तोवर आयोग विवेकाने काम करत होता. ते निवृत्त झाले आणि आयोगाची गरीमा लयाला गेली. आता तर हा आयोग भाजपच्या रखेलीचं काम करू लागला आहे. आयोगाने काहीही निर्णय दिला असला तरी शिवसेनेचे खरे वारसदार कोण, शिवसेना कोणाची, हे सुर्य प्रकाशाइतकं स्पष्ट आहे. पण या निमित्ताने लोकशाहीवर निष्ठा व्यक्त…

Read More