Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क  संगमनेर : योग साधना ही भारताने विश्वाला दिलेली अमूल्य देणगी आहे. अखिल मानवजातीला भारतामुळे लाभलेले हे वरदान आहे. भारताला विश्वगुरू बनविण्याचे सामर्थ्य योगामध्ये दडलेले आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी केले. संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सुसज्ज क्रीडा नगरीत तिसर्‍या राष्ट्रीय सब ज्युनिअर आणि ज्युनिअर योगासन अजिंक्यपद स्पर्धेचा शानदार शुभारंभ सोहळा आज पार पडला. याप्रसंगी डॉ. मालपाणी बोलत होते. व्यासपीठावर उद्घाटक व खेलो इंडियाचे निरीक्षक शब्बीर शिकलकर, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर, तांत्रिक समितीचे संचालक रचित कौशिक, स्पर्धा व्यवस्थापक निरंजन मूर्ती, सतीश मोहगावकर, विश्व योगासन प्रतिनिधी अ‍ॅड. उमेश नारंग,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क  संगमनेर : शेतकरी व बांधकाम व्यावसायिकांसाठी माफक दरात सेवा देणाऱ्या संगमनेरमधील शॅम्प्रो या संस्थेने नव्याने तयार केलेल्या सन २०२३ च्या अद्यावत दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना कार्यस्थळावर या अद्यावत दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक इंद्रजित थोरात, शॅम्प्रो संस्थेचे अध्यक्ष आर. एम. कातोरे, उपाध्यक्ष सुभाष सांगळे, अरुण ताजणे, शांताराम डुबे, वसंत साबळे, भारत वर्पे, तान्हाजी आहेर, दगडू लांडगे, भिमा राहींज, राधाकिसन देशमुख, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सचिव किरण कानवडे, बबनराव सावंत,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : शारीरिक सुदृढतेसाठी आवश्यक असलेल्या आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या आंतर शालेय क्रीडा स्पर्धा संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडल्या. तीन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी सामूहिक खो-खो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. दुसऱ्या दिवशी वैयक्तिक क्रीडा प्रकारात 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, स्लो सायकल, कुस्ती स्पर्धा पार पडल्या. तर समारोपाच्या तिसऱ्या दिवशी संगीत खुर्ची, क्रिकेट, फनी गेम्समध्ये पोता शर्यत, तीन पायी शर्यत आदी स्पर्धा पार पडल्या. या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये मुलांसोबत मुलींनीदेखील मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क  नाशिक : घराची परिस्थिती हलाखीची. त्यातच दुष्काळात तेरावा म्हणतात तसे अचानक दोन्ही पायाचे खुबे अकाली निकामी झालेले. अनेक दवाखान्यांत घिरट्या घातल्या मात्र कुठे खर्च परवडेनासा तर कुठे निदान होत नव्हते. अखेर कंटाळून पुन्हा ते घरी परतले. यानंतर एसएमबीटी रुग्णालयात दाखल झालेल्या या रुग्णाचे दोन्हीही पायाच्या खुब्यांवर यशस्वी सांधेरोपण करण्यात आले. विशेष म्हणजे रुग्ण आता हालचालदेखील करू शकत असून नेहमीप्रमाणे चालू शकतो आहे. या रुग्णावर यशस्वी शस्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांचे रेखाटलेले हुबेहूब छायाचित्र भेट देऊन या रुग्णाने अनोखे आभारप्रदर्शन केले. घटना आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील मूळ रहिवाशी असलेले संदीप मुरलीधर बोधडे यांची. बोधडे सध्या कुटुंबीयांसोबत नाशिक जिल्ह्यातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना पाय घसरून पडल्याने त्यांच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी विशेष विमानाने नागपूरहून त्यांना मुंबईला आणण्यात येत असल्याची माहिती मिळते. https://twitter.com/bb_thorat/status/1607287654697295876?t=0RxvLgFB82zgejUx8xVgfQ&s=19 सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून थोरात अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आहे. सोमवारी सकाळी ते मॉर्निंग वॉक करत असताना पाय घसरून खाली पडले. यावेळी त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळत असून त्यांची तातडीने अधिवेशनासाठी तैनात असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यानंतर त्यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे थोरात यांची वैद्यकीय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : कुंभार समाजाला वीटभट्टी व्यवसाय सुलभरीत्या करता येईल, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे आश्वासन अहमदनगरचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीटभट्टी व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळाच्या वतीने यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शासनाने लाभलेल्या विविध जाचक अटी आणि वीट भट्टी चालकांच्या प्रश्नासंदर्भात पालकमंत्री विखे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यासह वीटभट्टी चालक उपस्थित होते. वीट भट्टी व्यवसाय संदर्भात येणाऱ्या अनेक अडचणी, माती वाहतूक, बिगर शेती अट, कामगारांचे प्रश्न यावेळी मंत्री महोदयांसमोर शिष्टमंडळाने उपस्थित केले. यातून मार्ग काढून हा व्यवसाय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पठाण चित्रपटाबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. चित्रपटावर सर्वत्र टीका जरी होत असली तरी या चित्रपटाचे ओटीटी हक्क खूपच मोठ्या म्हणजेच तब्बल दोनशे कोटी किमतीला विकले गेले आहेत. वादाच्या भोवऱ्यात अडकूनही एवढ्या मोठ्या किमतीला ‘पठाण’चे ओटीटी अधिकार विकले गेल्याने अनेक जण थक्क झाले आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण हा चित्रपट यामुळे पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे. हा चित्रपट नव्या वर्षात २५ जानेवारी रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यातील गाण्यामुळे वादात अडकला. त्यामुळे बायकॉट पठाणचे नारे सुरू असताना त्याचे ओटीपी हक्क मात्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क  संगमनेर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळांतर्गत मुलींच्या पंधरा वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात मूळची देवकौठेची असलेली सुहानी भारत कहांडळ हिची उपकर्णधारपदी निवड झाली असून रांची व जयपूर येथे खेळल्या जाणाऱ्या नॅशनल लिगमध्ये ती महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारत नवनाथ कहांडळ हे पुणे येथे आयटी कंपनीमध्ये नोकरी करत आहेत. त्यांची सुहानी कन्या आहे. लहानपणापासून सुहानीला क्रिकेटची आवड होती. तिच्यातील कलागुण हेरून भारत कहांडळ व चुलते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ यांनी तिला क्रिकेटसाठी प्रोत्साहित केले. इयत्ता नववीमध्ये शिकणारी सुहानी ही सलामीची आक्रमक फलंदाज असून उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करते. सुहानी सध्या…

Read More

रविवार विशेष | प्रवीण पुरो मराठी शब्दकोषात निर्लज्जपणा या शब्दाचा अर्थ निलाजरेपणा असा निघतो. लायक नसलेला म्हणजे नालायक. पण त्याला नालायक म्हणू नये. निलाजरेपणा चालेल पण निर्लज्ज म्हणू नये. निलाजरेपणा हा त्यातल्या त्यात सौम्यता दर्शवतो. दोन्हींचा अर्थ सारखाच. पण तो उच्चारण्याची पध्दत त्याची तीव्रता दर्शवत असते. वेळ आणि काळानुसार त्या शब्दांची तीव्रता नोंदली जाते. गरजेप्रमाणे असे शब्द वापरले जावेत. मुळात असंसदीय असलेले असे शब्द संसदीय की असंसदीय हे त्या त्या परिस्थितीनुसार ठरतात. राज्य विधानमंडळात असंसदीय असूनही अशा शब्दांचा वापर सर्रास केला जातो. जयंत पाटलांचं निलंबन करण्याची मागणी करणार्‍या प्रत्येकाच्या तोंडी याहून कठोर असंसदीय शब्द उच्चारले गेलेत. मुंबईला सोन्याची अंडी देणारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : युवा सेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील मुस्लिम मावळा म्हणून गौरविलेल्या संगमनेरमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखाप्रमुखाला अज्ञात व्यक्तीने दिलेल्या एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात भारतीय दंड संहितेच्या कलम 507 नुसार नुसार अज्ञात व्यक्ती विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शाखाप्रमुख अजित याकूब मोमीन यांनी संगमनेर शहर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका अज्ञात इसमाने मोमीनपुरा येथील घरी एक पत्र आणून दिले असल्याची माहिती मोमीन यांच्या मोठ्या भावाने त्यांना मोबाईलवर दिली. फिर्यादी मोमीन यांनी सदरचे पत्र बघितले असता त्याचे पाकीट…

Read More