Author: अनंत पांगारकर
मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्य सरकारने मंगळवारी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यात अवघ्या दोन महिन्यांपूर्वी राज्याच्या आरोग्य आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेल्या तुकाराम मुंढे, शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्यासह आणखी काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दुपारी काढण्यात आलेल्या आदेशामध्ये तुकाराम मुंढे यांना ‘कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची वाट पहा’ असे आदेश देण्यात आले असले तरी, त्यांची नियुक्ती शिर्डी संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली असल्याचे दैनिक सामनाने म्हटले आहे. तर शिर्डी संस्थांनच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची बदली नागपूरला सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ या पदावर करण्यात आली आहे. अवघ्या दोन महिन्यात मुंढे यांची बदली…
महाराष्ट्र संवाद न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली पाच वर्षे उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडकडे लक्ष द्यावे. त्या राज्यांमधील लोकं घरदार सोडून दुसऱ्या राज्यात जातात, त्यावेळी दुसऱ्या राज्यांना त्याचा त्रास होतो. महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. सर्व राज्यांची प्रगती झाली तर देश प्रगत होतो. मोदीजी, तुम्ही गुजरात गुजरात करू नका, प्रत्येक राज्य तुमचं अपत्य आहे, त्या प्रत्येक राज्याकडे समान पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राबाहेर जात असलेल्या उद्योगधंद्यावरुन पंतप्रधान मोदींना सुनावले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगावमधील नेस्को सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधीत केले, त्यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बुलढाण्यातील सभेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे यांच्या आरोपाचा समाचार घेतानाच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फ्रिज मधून खोके कोठे गेले… याचा आपण शोध घेणार असल्याचा इशारा ठाकरेंना दिला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-ठाकरे गटातील वाद थांबावयास तयार नाही. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील चिखली येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात शिंदे गटातील आमदार आणि खासदारांवर टीका केली होती. “बोक्यांना खोके हवे होते, म्हणून ते भाजपाला मिळाले”, तुम्ही खोके घेतले असतील तर त्यातील थोडे शेतकऱ्यांना देखील द्या, तुम्ही खोके घेतलेत हे मी म्हणत नाही तर तुमच्याच गटाचे आमदार सांगत…
महाराष्ट्र संवाद न्यूज “आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहेत. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाहीत. तो व्हिडीओ जुना आहे. विचारांचे खंडन-मंडन करावे लागते. राणेंच्या मुलांचा अभ्यास कमी आहे. मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत,” असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. एका जुन्या व्हिडीओचा आधार घेत भाजपाचे नेते नितेश राणे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला अंधारे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे. याशिवाय त्यांनी शिंदे गटात नाराज आमदारांची संख्या वाढत असल्याने लवकरच शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे म्हटले आहे. सुषमा अंधारे यांनी थेट नावे घेत सांगितले की, “नाशिकमधील सुहास कांदे…
महाराष्ट्र संवाद न्यूज गुजरातमध्ये सरकार कोणाचे असेल हे येत्या ८ डिसेंबरला ठरणार आहे. पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी एक डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात पाच डिसेंबरला मतदान होत आहे. ८९ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत करोडपती असलेल्या उमेदवारांचा भरणा सर्वाधिक आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल २११ करोडपती उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष या वेळच्या निवडणुकीत उतरला असल्याने गुजरातची निवडणूक प्रामुख्याने भाजपा, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस या तीन मोठ्या पक्षात होत आहे. सुरुवातीपासूनच चुरशीच्या बनलेल्या या निवडणुकीत सत्ता कोणाच्या हाती राहणार याची उत्सुकता असली तरी देखील ही निवडणूक सामान्य माणसाची राहिलेली नाही. निवडणुकीच्या पहिल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज अक्षय (नाव बदललेले) तो आदिवासी समाजातील, साधारणपणे वय १९ वर्ष, त्याचे आई-वडिल मोठया बागायतदाराकडे १० ते १२ वर्षांपासून शेतमजूर म्हणून काम करायचे, तो ८ वीत गेल्यावर आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण बंद झाले होते, मालकाचे घरी गोठ्यावर शेण-कुराचे काम करू लागला, सातत्याने त्याचा मालकाचे घराशी संपर्क येऊ लागला, मालकांचे घरात सर्वात मोठी तरुण मुलगी ती साधारणपणे साडेसतरा वर्षाची, घास कापणी आणि इतर गोठयावरील कामात तिचा आणि त्याचा संपर्क वाढला, वयाचे अंतर फार जास्त नसल्याने प्रेम वाढत गेले. मुलगी लग्नासाठी जास्तच दबाव आणत होती. सामाजिक दडपणामुळे त्याला ह्या सर्वांची भीती वाटत होती. दोघांत संबंध वाढल्याने मुलीने लग्न केले नाहीतर, आत्महत्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नवभारत माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र फौडेशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी संगमनेरमधील वैशाली डावखरे, जिल्हा उपाध्यक्षपदी कल्पना काळे यांची व मंजू माचरेकर यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष कौसर हुसेन शेख यांनी या पदाधिकाऱ्यांच्या नांवाच्या घोषणा केली. संगमनेरमध्ये नवभारत माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र फौडेशनच्या माध्यमातून हजारो नागरिकांना न्याय मिळवून दिल्याचे सांगितले जाते. अहमदनगरच्या शासकीय विश्रामगृहात संघटनेची आढावा बैठक झाली. श्रीमती भारती मनसावले यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. भारतीय संविधानाला अभिप्रेत शाश्वत विकासासाठी सामाजिक न्याय हक्कासाठी नव्या पदाधिकाऱ्यांनी कार्यरत राहण्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. बैठकीसाठी संघटनेचे रमेश शिंदे, मझहर खान,…
महाराष्ट्र संवाद न्यूज माणसाने किती कोडगं असावं, हे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून शिकावं. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेली व्यक्ती राज्यपाल म्हणून सर्वाधिक यशस्वी ठरते, असं म्हटलं जातं. मात्र तो राज्यपाल म्हणून स्वत:शी आणि त्या राज्याशी प्रामाणिक असायला हवा. त्याच्या डोक्यात राजकारण शिरलं तर राज्यपाल पदाची तो गरिमा घालवून बसतो. महाराष्ट्राच्या राज्यपालाने अशीच राज्याची लाज घालवली आहे. मुख्यमंत्री पद उपभोगूनही राज्यपाल म्हणून कोश्यारी महाराष्ट्रात प्रभाव पाडू शकले नाहीत. उलट राज्यपाल कसा नसावा, याचे धडेच त्यांनी देशाला दिले आहेत. कोश्यारी हे महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहेत, हे तमाम महाराष्ट्रवासीयांचं दुर्देवं म्हटलं पाहिजे. कार्यरत माणसांकडून काहीबाही चुका होणं हे समजून घेण्यासारखं असतं.…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विनाअनुदानित शिक्षकांसाठी तब्बल ११६० कोटींचा निधी जाहीर केला आहे. आमच्या या सर्व पाठपुराव्याला, प्रयत्नांना तसेच शिक्षक बांधवांनी केलेल्या आंदोलनाला मिळालेले हे खूप मोठे यश असल्याचे सांगत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी शिक्षण मंत्र्यांचे आभार मानले आहे. तांबे म्हणाले, शिक्षकांच्या अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या प्रश्नांसाठी आझाद मैदानावर सर्व शिक्षक संघटनांनी मोठे आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनात सामील होत आमदार सुधीर तांबे यांनी सातत्याने विधिमंडळामध्ये शिक्षकांच्या प्रश्नाचा पाठपुरावा चालू होता. तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला होता. शिक्षक संघटनांसह आमच्या या सर्व पाठपुराव्याला, प्रयत्नांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर रोटरी क्लब आणि मुंबईच्या रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अपंग व्यक्तींसाठी यांत्रिक हात, जयपुर फुट, कॅलिपर्स, क्रचेस आदींचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक संतोष करवा, उद्योजक आर. एम. कातोरे, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे सहाय्यक प्रांतपाल गौरव भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरात एकूण २४२ दिव्यांग व्यक्तींना हाथ, पाय, कुबड्या, कॅलीपरचे उपस्थितांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना संतोष करवा म्हणाले, संगमनेर रोटरी क्लब करीत असलेले काम कौतुकास्पद आहे ज्यामुळे दिव्यांग बंधू भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करता आला. कातोरे म्हणाले, सामाजिक उपक्रम राबविणार्या रोटरी क्लबचे कार्य देवत्वाची प्रचिती देणारे आहे. यावेळी त्यांनी रोटरीसाठी…
