Author: Annant Ppangarkar

विशेष प्रतिनिधी / मुंबई  महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेल्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला काल (मंगळवार) अटक करण्यात आली होती. तसेच त्याच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आज पनवेल सेशन्स कोर्टाकडून त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे. यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणाने राज्याला हादरवून ठेवले आहे. तसेच आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, यासाठी रविवारी उरणमध्ये नागरिकांनी आंदोलन केले होते. यशश्री एका खासगी कंपनीत कार्यरत होती. गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडताना आपण आपल्या मैत्रिणीच्या घरी चाललो आहोत, असे तिने तिच्या घरात सांगितले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी आलीच…

Read More

बुधवार, ३१ जुलै  गुन्ह्यातील सहभागाबद्दल स्वतंत्र असा सबळ पुरावा पोलिसांनी उपलब्ध न केल्याने संगमनेरमधील एका खून प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीला तब्बल दोन महिन्यानंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी जामीन मंजूर केला आहे. मोहम्मद इम्रान निसार सिद्दिकी असे न्यायालयाने जामीन मंजूर केलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या आठवड्यात न्यायालयाने हा जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आली. संशयित आरोपी मोहम्मद इम्रान निसार सिद्दिकी याच्या विरोधात आहतेशाम अन्सारी यांच्या खुनाचा आरोप असून त्याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०२, १२०बी, २०१, ५०६ सह ३४ नुसार गुन्हा दाखल आहे. २४ एप्रिलला संगमनेर शहरालगत असलेल्या मालदाड येथील जंगलात…

Read More

बुधवार, ३१ जुलै घारगाव प्रकरणातील आरोपी युसुफ दादा चौघुले याच्या पोलीस कोठडीत बुधवारी ३ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी शादाब रशीद तांबोळी याच्यासह कुणाल विठ्ठल शिरोळे व आयाज अजीम पठाण हे अद्यापही फरार आहेत. फिर्यादी अल्पवयीन असल्याची माहिती असतानादेखील घटनेतील मुख्य आरोपी शादाब तांबोळी याच्यासोबत सलगी करण्यासाठी कुणाल शिरोळे, युसुफ चौगुले यांच्या मदतीने शादाब तांबोळी याने वेळोवेळी फिर्यादी मुलीचा पाठलाग करत तिला प्रेमाचे अमिष दाखवून तिच्यासोबत सलगी केली. तसेच शादाब तांबोळी व युसुफ चौघुले यांनी फिर्यादी तरुणीला फसवून मंचर येथे बोलावून घेत युसुफ चौघुले याच्या कारमधून फिर्यादीला पाण्यात गुंगीकारक औषध देऊन अर्धवट बेशुद्ध झाली असताना…

Read More

बुधवार ३१ जूलै महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने उभारल्या जाणाऱ्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी एमआयडीसीची निवड झाली असून सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज दिला. तसेच या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. यामुळे आता शिर्डी एमआयडीसीचा विकास जलद गतीने होऊन शिर्डीची देवस्थानाबरोबर आता औद्योगिक नगरी म्हणून नवी ओळख तयार होणार असल्याचा विश्वास अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. डिफेन्स क्लस्टर अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या उद्योगासाठी १००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना सवलतीच्या दरात २०० एकर जमीन देण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात आज…

Read More

बुधवार, ३१ जुलै गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली असून याबाबत लवकरच निर्णय करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ब्रिटीश कालवे म्हणून गोदावरी कलव्याची ओळख वर्षानूवर्ष जुन्या झालेल्या या कालव्यांना एकदाच नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्धता करून देण्यात आला होता. त्यानंतरही दुर्लक्षित झालेल्या गोदावरी कालव्यांची दुरूस्ती होत नसल्याने गोदावरी धरण समूहातून सोडण्यात येणारे आवर्तन लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यत पोहचण्यास मोठा कालावधी लागतो. यावरून पाण्याचे संघर्षही निर्माण होत असून शेतकऱ्यांचा संपूर्ण रोष विभागावर आणि सरकारवर येतो ही वास्तविकता मंत्री विखे यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. कालव्याच्या…

Read More

बुधवार, ३१ जुलै  भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून यामुळे धरणात पाण्याची आवक होत आहे. बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत धरणाचा पाणीसाठा ९१ टक्केपर्यंत गेल्याने धरणातून प्रवरा नदी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. बुधवारपासून धरणात एक हजार क्युसेकने पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे भंडारदरा धरण ते निळवंडे धरणापर्यंतच्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक देखील सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा नियंत्रित राखण्यासाठी अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन कक्षाला कळविण्यात आली आहे. बुधवारी सकाळी सहा…

Read More

बुधवार, ३१ जुलै  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. बैठकीत झालेले निर्णय पुढीलप्रमाणे… १) गृह विभाग महाराष्ट्रातील कारागृहे होणार अद्ययावत सुधारणांसाठी अध्यादेश काढणार महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवेसाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारने कारागृहातील बंद्यांमध्ये सुधारणा व पुनर्वसनाचा विचार करून मॉडेल प्रिझन्स ॲक्ट २०२३ तयार केला आहे. तसेच सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशानी देखील या संदर्भात आवश्यक वाटतील त्या सुधारणा करण्याचे म्हटले आहे. या अनुषंगाने कारागृह विभागाच्या प्रमुखाचे नामाभिधान महासंचालक, कारागृह व सुधारसेवा…

Read More

मंगळवार, ३० जुलै विशेष प्रतिनिधी / मुंबई उरण हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी दाऊद शेखला कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली. दाऊदचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दाऊदचे मित्र, नातेवाईकांची मदत घेतल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकारांना सांगितलं. मुख्य संशयित आरोपी दाऊदच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके कर्नाटकात पाठवण्यात आली होती. उरणमध्ये एका २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी संशयित आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला कसं पकडलं याची माहिती दिली. यासह पीडितेची हत्या कशी झाली, यावरही पोलिसांनीही भाष्य केल. तरुणी तसंच आरोपी यांच्यात मैत्री होती. मृत तरुणीचा आरोपीशी गेल्या तीन-चार वर्षांपासून संपर्क नव्हता. त्यातूनच…

Read More

मंगळवार, ३० जुलै  खासदार निलेश लंके यांच्या उपोषणानंतर अहमदनगर जिल्ह्यात नगरच्या पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचा भ्रष्टाचार समोर आला असतानाच आता एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे देखील हप्तेखोरी समोर आली असून या भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे. एस टी महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हप्ते घेऊन संगमनेर तालुक्यात व नगर जिल्ह्यात हॉटेल, ढाब्यांवर एसटी बसेससाठी अनधिकृत थांबे तयार केले आहेत. या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करत आहे. हप्ते घेऊन बेकायदेशीररित्या सुरू असलेले अनधिकृत थांबे त्वरित बंद करून अधिकारी, कर्मचारी, बस चालकांवर कारवाई करण्याची मागणी कतारी यांनी केली आहे. संगमनेर तालुक्यात…

Read More

मंगळवार, ३० जुलै  अवैध धंद्यांवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली असल्याचे वृत्त असून अहमदनगर एलसीबीने १६ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात २२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकीकडे पोलीस ॲक्शन मोडवर आले असले तरी, दुसरीकडे मात्र संगमनेरमध्ये सर्व काही आलबेल असून येथील अवैध धंदे नियमितपणे सुरळीत सुरू आहेत. या धंद्यांवर कारवाईसाठी पोलिस नावाच्या यंत्रणेकडे वेळ नसल्याचे दिसते. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी पोलिस ठाण्यांना भेटी देऊन कारवायांचा आढावा घेतला आहे. पोलिस ठाण्यांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र अवैध धंद्यांवरील कारवाईचे…

Read More

मंगळवार, ३० जुलै  सर्वत्र डिजेला बंदी आहे, तरीही संगमनेरमध्ये जमिनीला हादरे देणारे कर्णकर्कश आवाजाचे डीजे सर्रासपणे दणदणाट करत आहे. बंदी असलेल्या या डीजेच्या आवाज बंद करण्याची मागणी संगमनेरमधील जेष्ठ नागरिकांनी पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ज्येष्ठ नागरिकांनी म्हटले आहे की, शहर व तालुक्यातील अनेक गावात डीजेचा दणदणात सुरू असल्याने त्याच्या कर्कश आवाजाने नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. लहान मुले, आजारी असलेले नागरिक यामुळे त्रस्त झाले आहे. सरकारने ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत कायदा करून देखील सर्व नियम धाब्यावर बसवून परिसरात…

Read More

मंगळवार, ३० जुलै मोठ्या आवाजातील फटाके फोडणारे सायलेन्सर, कंटाळा बसविणारे सायलेन्सर, चित्रविचित्र हॉर्न वाजवत रस्त्यावर स्टंटबाजी करत रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचविण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या हुल्लडबाजांवर संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी कारवाईचा हिसका दाखविला आहे. सोमवारी संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृह ते अमृतवाहिनी कॉलेज पर्यंतच्या जुन्या मार्गावर दोन मोटरसायकलस्वारांनी स्टंटबाजी करत आपल्या दुचाकी भरधाव वेगाने नेल्या होत्या. याच दरम्यान या रस्त्यावरून जाणाऱ्या काही दक्ष नागरिकांनी या हुल्लडबाज, स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचे फोटोग्राफ्स, व्हिडिओ काढून ते संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांना व्हाट्सअपवर पाठविले होते. बघा व्हिडिओ… वाघचौरे यांनी हे व्हिडिओ फोटोग्राफ्स बघितल्यानंतर ताबडतोब दोन्ही मोटर सायकलस्वार तरुणांचा शोध घेण्याच्या…

Read More

मंगळवार, ३० जुलै  विशेष प्रतिनिधी / मुंबई – राज्यातील उद्योगधंदे हे त्या राज्यातील तरुण-तरुणी यांच्या हाताला काम देतात. रोजगार देतात. परिणामी त्या राज्यातील बेकारी कमी होऊन तरुणांच्या हाताला रोजगार मिळतो. मात्र कोरोनाच्या महामारीनंतर म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि महायुतीच्या सरकारमध्ये जुलै २०२० ते जुलै २०२४ या मागील चार वर्षांत राज्यातील बारा हजार लघुउद्योग बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात मागील अडीच वर्षांपासून महायुतीचे सरकार आहे. या अडीच वर्षांत राज्यातील अनेक उद्योगधंदे हे परराज्यात गेले. गुजरातमध्ये उद्योगधंदे पळवल्याची ओरड विरोधकांकडून होत आहे आणि हे सरकार गुजरात धार्जिने, महाराष्ट्र विरोधी असल्याची टीका विरोधकांकडून होत होती. मात्र या अडीच वर्षातच नाही…

Read More

सोमवार, २९ जुलै अहमदनगर – नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये अहमदनगर जिल्हा तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये ६४ हजार ७२२ प्रकरणे निकाली निघाली असून यामध्ये १ अब्ज ३८ कोटी २२ लाख ५१ हजार ३०४ रुपयांची वसुली झाली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा सरकारी वकील ॲड. सतीश पाटील, अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नरेश गुगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधिक्षक (गृह) हरीश खेडकर, ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. विक्रम वाडेकर, ॲड. सागर पादिर, ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. पिंटू…

Read More

सोमवार, २९ जुलै अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी एलसीबीतील भ्रष्टाचाराविरोधात एल्गार देत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण केले. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या आश्वासनामुळे लंके यांनी आपले उपोषण मागे घेतले असले तरी संगमनेरमधील अवैध धंदे सुरूच आहे. लंके यांच्या उपोषणाकडे पाठ फिरविणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांकडे देखील दुर्लक्ष केले की काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अवैध धंद्याच्या माध्यमातून एलसीबी भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. खासदार लंके यांनी उपोषणादरम्यान जाहीर केलेल्या या भ्रष्ट शाखेच्या रेटकार्डचा जर विचार केला तर तब्बल तीस कोटी रुपयांचा हप्ता दरमहा एलसीबी गोळा करते. या रेडकार्ड मध्ये लंकेंकडून राहिलेली…

Read More

सोमवार, २९ जुलै – प्रतिनिधी घराबाहेर खेळणाऱ्या पाच-सहा लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने या संबंधीचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांची धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पालिका प्रशासनाला धन्यवाद दिले आहे. संगमनेर शहरात दहशत निर्माण केलेल्या मोकाट कुत्र्यांनी शुक्रवारी रात्री नाशिक-पुणे महामार्गालगतच्या मोगलपुरा (राजवाडा) भागात घराबाहेर खेळणाऱ्या लहान मुलांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात पाच ते आठ वर्षे वयोगटातील पाच सहा लहान मुले गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यात पाच-सहा लहान बालके गंभीर जखमी झाल्याचे वृत्त महाराष्ट्र संवाद न्यूजने आपल्या वेब पोर्टलवर…

Read More

सोमवार, २९ जुलै पोलीस इन्स्पेक्टर बोलतोय, “माझा माणूस दुकानात येईल, त्याला जी वस्तू हवी ती द्या,” असे सांगत दुकानदारांना लुटणाऱ्या दोघांपैकी पोलीस असलेल्या तोतयाला अटक करण्यात आली असून तोतया पोलीस इन्स्पेक्टरचा शोध सुरू आहे. नितीन बोराडे असे तोतया पोलिसाचे नाव असून त्याचा साथीदार गणेश पुजारी याचा शोध सुरू आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गणेश पुजारी हा दुकानदारांना फोन करत “मी पोलीस इन्स्पेक्टर बोलत आहे, माझा माणूस दुकानात येईल. त्याला जी वस्तू हवी आहे ती द्या”, असे सांगत असे. त्यानंतर नितीन बोराडे त्या दुकानात जायचा. वस्तू घ्यायचा, पैसे साहेब देतील, असे सांगून तेथून निघून जात असे. गणेश पुजारी…

Read More

सोमवार, २९ जुलै  अंगणवाडी बांधकामाचे बिल काढण्यासाठी लाच घेताना अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि सहाय्यक लेखाधिकार्‍यास न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचखोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या टक्केवारीच्या मागणीबाबत चर्चा सुरू आहे. अक्कलकुवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय लोंढे (वय ३९) व सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र सुखदेव लाडे (वय ४७) अशी पोलीस कोठडी देण्यात आलेल्या लाचखोर आरोपींची नावे आहे. अंगणवाडी बांधकामाचे बिल काढण्यासाठी लाच घेताना नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले होते. दोन्ही लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात लाच लुचपत विभागाच्या कारवाईनंतर अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read More

सोमवार, २९ जुलै  शेतामध्ये गवत कापत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने वयोवृद्ध महिलेवर हल्ला करत तिला शेतात ओढून नेत असताना नातवाच्या हा प्रकार लक्षात आल्याने बिबट्याच्या मागे धाव घेत बिबट्याच्या तावडीतून त्याने आजीचा जीव वाचविण्याची घटना समोर आली. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी महिलेवर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संगमनेर तालुक्यातील देवगाव गावामध्ये ही घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. भिमाबाई लक्ष्मण लामखडे (वय ७५, रा. देवगाव, संगमनेर) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीमाबाई लामखडे आपल्या शेतामध्ये गवताची कापणी करत होत्या. यावेळी जवळच बिबट्या दबा धरून बसला होता. जवळ असलेला…

Read More

रविवार, २८ जुलै मुंबई – नुकत्याच निवडून आलेल्या विधान परिषदेच्या ११ जागांवरील नवनिर्वाचित सदस्यांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज रविवारी (२८ जुलै) विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) दोन काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रत्येकी एक आमदाराचा समावेश आहे. निवडून आलेल्या योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव यांचा शपथ घेणाऱ्या सदस्यात समावेश आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले होते. निवडून आलेल्या या सर्व सदस्यांना…

Read More