Author: अनंत पांगारकर

संगमनेर – प्रतिनिधी सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यात वीज पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. या समस्यांबाबत महावितरणाने तात्काळ उपाययोजना करून ह्या प्रश्नाबाबत तातडीने मार्ग काढावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. तालुक्यातील नागरिकांच्यावतीने वीज वितरण कंपनीला हे निवेदन देण्यात आले असून यावेळी अरुण गुंजाळ, नामदेव शिंदे, वीरधवल साबळे, दीपक शिंदे, सुहास आहेर, प्रीतम साबळे, सुनील काळे, विजय राहणे, भाऊराव रहाणे, ताराचंद शिंदे, विलास मोरे आदींसह शेतकरी संख्येने उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, रोटेशन कालावधीमध्ये यापूर्वी प्रवरा नदीच्या काठावरील शेतकऱ्यांना अखंडित व…

Read More

संगमनेर, दि. ४ मार्च महावितरण कडून विजेचा सुरू असलेला खेळ खंडोबा शेतकऱ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्ण दाबाने वीज दिली जात नसल्याने शेतकऱ्यांसमोर शेतीचे प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे दिवसा सलग आठ तास वीज मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शनिवारी (८ मार्च) महावितरण विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणगाव, शिवापूर, मेंढवन परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी महावितरण च्या कार्यकारी अभियंतांना आपल्या मागणीचे निवेदन दिले असून महावितरण कंपनीने विजेचा प्रश्न सोडविला नाही आणि शेतकऱ्यांच्या जीवितास वन्य प्राण्यापासून धोका निर्माण झाल्यास याला सर्वस्वी महावितरण कंपनी जबाबदार असेल असा इशारा दिला आहे. निवेदनात ग्रामस्थांनी शेतीपंपासाठी दोन हप्ते दिवसा, एक हप्ता रात्री तसेच शक्य…

Read More

मुंबई – लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता मार्चमध्ये दिला जाणार आहे. ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हा हप्ता लाभार्थी बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे. या महिन्यात सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून हे अधिवेशन संपल्यानंतर मार्च महिन्याचा हप्ता देखील मार्च अखेर दिला जाणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानभवनात पत्रकारांना ही माहिती दिली. लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता म्हणजेच महिला दिनाचे गिफ्ट असणार आहे. फेब्रुवारी महिना संपला तरीदेखील फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या लाभार्थी बहिणीच्या खात्यावर जमा न झाल्याने बहिणींमध्ये चलबिचल सुरू होती. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तीन आरोपी अजून फरार आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या पुतण्याचाही समावेश आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची मुक्ताईनगरमधील कोथळी गावातील संत मुक्ताई जत्रेत छेडछाड काढण्यात आली. रविवारी ही घटना समोर आल्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि मुलीचे आजोबा माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे आक्रमक झाले. घटनेला दोन दिवस झाले तरी आरोपींवर साधी कारवाई देखील करण्यात…

Read More

मुंबई, दि. ३ मार्च  विधान परिषदेच्या पाच जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विधान परिषदेतील पाच सदस्य विधानसभा निवडणुकीत निवडून गेल्याने विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या होत्या. विशेष म्हणजे या पाचही जागा महायुतीच्या आहेत. रिक्त झालेल्या पाच जागेवर कोणाची वर्णी लागते याची आता राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे. विधान परिषद निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराला १० मार्च ते १७ मार्चपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत आहे. तर २० तारखेला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. या पाच जागांसाठी २७ मार्चला निवडणूक होईल. यासाठी केंद्रीय निवडणुक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गट एक, अजित पवार…

Read More

संगमनेर, दि. ३ मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्याची तोडफोड करण्याच्या उद्देशाने आश्वी बुद्रुक येथे प्रस्तावित केलेल्या अप्पर तहसील कार्यालयाला संपूर्ण संगमनेर तालुक्यातून मोठा विरोध होत आहे. जोर्वे येथील ग्रामसभेत या तहसील कार्यालयातला कडकडून विरोध करण्याचा ठराव एकमताने संबंध झाला. यावेळी विखे समर्थकांनी आश्वी येथेच कार्यालय करण्याची मागणी केली. यावर संपूर्ण गावातील नागरिक महिला व युवक आक्रमक झाल्याने विखे समर्थकांनी पळ काढला. जोर्वे येथील ग्रामपंचायतच्यावतीने जुने गावातील पारावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या ग्रामसभेत एकमताने आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अपर तहसील कार्यालयाला विरोधाचा ठराव मांडण्यात आला. याला सर्व गावाने झालेल्या मतदानातून संमती दर्शवली. मात्र तालुक्याच्या आणि जोर्वे गावच्या कायम…

Read More

संगमनेर, दि. ३ मार्च संगमनेर तालुक्याचे महसुली विभाजन करून आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय निर्मितीचा घाट घातला गेला आहे. यावरून तालुक्यात वाद निर्माण झालेला असतानाच आता पालकमंत्री समर्थकांनी प्रस्तावित असलेले आश्वी बुद्रुक अपर तहसील कार्यालय तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्या प्रतिनिधींना दिले आहे. हे कार्यालय तातडीने सुरू करून या भागातील ग्रामस्थ, शेतकरी, महीला, विद्यार्थ्यांची अडचण दूर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पंचक्रोशीतील नागरीकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यामुळे तालुक्यातील अपर तहसील कार्यालयाचा वाद आता आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पद्मश्रीं डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, प्रवरा बँकेचे…

Read More

संगमनेर, दि. ३ मार्च आपली समिती आपली ताकद हे ब्रीद असलेल्या शिवजयंती उत्सव युवक समितीच्या अध्यक्षपदी रोहित वाळके यांची सर्वांनूमध्ये निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष रोहित बागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नव्याने पदाधिकारी निवडी करण्यात आल्या आहे. समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाते याची दरवर्षी कार्यकर्त्यांना उत्सुकता असते. ग्रामदैवत असलेल्या चंद्रशेखर चौकातील मारुती मंदिरामध्ये झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. एक वर्षासाठी या निवडी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कामाची प्रेरणा घेऊन संगमनेरमध्ये सर्वपक्षीय तरुणांनी एकत्रित येत अकरा वर्षांपूर्वी शिवजयंती उत्सव युवक समितीची स्थापना केली होती. समितीच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असून तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते.…

Read More

सोमवार, दि. ३ मार्च सोमवारी विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून विधानभवनात दाखल झाले. थेट बेड्या घालून आलेल्या आव्हाड यांच्यामुळे काही वेळ नेमकं काय घडलं याची चर्चा सुरू होती. आव्हाड यांनी याचं स्पष्टीकरण देत सांगितले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकारकडून घाला घातला जात आहे. गुन्हे दाखल केले जात आहेत. मूलभूत अधिकार शाबूत राहिले पाहिजे. यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. अमेरिकेत भारतीय नागरिकांवर अन्याय करण्यात आला आहे. त्यांना विमानात कोंबून भारतात पाठवल्या जाणं म्हणजे अपमानित करण्याचा प्रकार आहे. लोक भोगत असलेल्या यातना या बेड्यांपेक्षा कमी नाही, असं देखील ते म्हणाले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे, दि. ३ मार्च – पुणे स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपीने गुन्ह्याची कबुली देण्याऐवजी उलट पीडित तरुणीवर खळबळजनक आरोप केले होते. पीडित तरुणीला शरीर संबंधासाठी साडेसात हजार रुपये दिल्याचा आरोप करणाऱ्या आरोपीच्या बँक खात्याची पोलिसांनी तपासणी केली आहे. २६ वर्षीय तरुणीवर स्वारगेट बस स्थानकामध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली होती तसेच यंत्रणेविरोधात राज्यभर संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी नराधम दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्याला पकडून देण्यासाठी लाखभर रुपयांचे बक्षीस देखील पोलिसांनी जाहीर केले होते. आरोपी गाडे याच्या वकिलांनी पीडित तरुणीवर तरुणीवर कुठलीही…

Read More