Author: अनंत पांगारकर

मुंबई दि. १७ : राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. १८ नोव्हेंबर) संध्याकाळी ६ वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू होणार आहे. मतदान संपेपर्यंतच्या ४८ तासांमध्ये, लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२६ अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास, उपस्थित राहण्यास अथवा सहभागी होण्यास मनाई आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निर्देश जारी केले आहेत.निवडणूक कालावधीत मुद्रित माध्यमांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या बाजूने किंवा विरोधात कोणतीही जाहिरात/ निवडणूकविषयक आशय-…

Read More

शनिवार, १७ नोव्हेंबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १२ वा स्मृतीदिन आहे आहे. दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत पोस्ट लिहून आदरांजली व्यक्त केली आहे. या पोस्टवर भाजप काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं की बाळासाहेब ठाकरेंसाठी दोन शब्द तरी राहुल गांधींकडून वदवून दाखवा. त्यामुळे राहुल गांधी यांची पोस्ट व्हायरल होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातले नेतेमंडळींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या समाधीस्थळी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे…

Read More

रविवार, १७ नोव्हेंबर येत्या २० तारखेला विधानसभा निवडणूक होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न होताना दिसतात. मात्र मतदानाच्या दिवशी मिळालेल्या सुट्ट्यांचा गैरफायदा घेत मतदान न करता अनेक जण बाहेरगावी सहलीसाठी जातात आणि त्याचा परिणाम मतदानावर होतो. निवडणुकीनंतर सध्याच्या राजकारणाला कंटाळल्याने मतदान न केल्याचे अनेक जण सांगतात. मात्र यामुळे निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरतो, त्यामुळे उमेदवार मान्य नसेल तर मतदान यंत्रावरील नोटाचे बटन दाबा मात्र मतदान आवश्य करा, मतदानाचे पवित्र कर्तव्य पूर्ण करा, असं आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक दीपक साळुंके यांनी केल आहे. बहुतेक मतदार संघात प्रमुख उमेदवारांच्या मतानंतर नोटाच्या मतांचा समावेश गेल्या काही निवडणुकांपासून…

Read More

विधानसभा निवडणूक स्पेशल अनंत पांगारकर राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचार येऊन ठेपला असतानाच आता संगमनेर मतदार संघात उभ्या असलेल्या विविध पक्षांच्या उमेदवारांच्या कोट्यावधीच्या निधीबाबत चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोट्यावधीच्या पेड न्यूजचे प्रकरण समोर आले असतानाच आता विविध उमेदवारांना मिळालेल्या निधीच्या चर्चा उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर विधानसभा मतदारसंघ निवडणूक आयोगाने आर्थिक संवेदनशील जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पथके मतदार संघात कार्यरत असली तरी अद्याप शहरात समोर आलेले हवालाचे एक प्रकरण वगळता या भरारी पथकाच्या हाती काहीही लागलेले नाही. अशातच निवडणुकीच्या शेवटच्या दोन-तीन…

Read More

नागपूर – मुस्लीम मतदारांना प्रभावित करून महाविकास आघाडी वोट जिहाद करीत असल्याचा आरोप करत आपल्याला एक होऊन त्या विरोधात धर्मयुद्ध पुकाराव लागेल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नागपूर मधून निवडणूक लढविणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरमध्ये प्रचार रॅली काढली होती. या रॅली त्यांनी पुन्हा एकदा वोट जिहाद संदर्भात पुनरुच्चार केला. फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस वोट जिहाद करीत असून ते खेदजनक आहे. निवडणुकीच्या काळात इतके लांगुलचालन यापूर्वी आम्ही कधी बघितले नव्हते. अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडी असले प्रकार करीत असेल तर त्याविरुद्ध आपल्याला एक व्हावे लागेल. धर्मयुद्ध पुकारावे लागेल. ऑल…

Read More

रविवार, १७ नोव्हेंबर  एवढी कामे करून मी दुसऱ्या मतदारसंघात उभा राहिला असतो तर निवडून आलो असतो, इतकी वर्षे काम करून देखील मला एवढा त्रास झाला नाही तो आता होत आहे. आता भावनिक झालात तर बारामतीला कोणी वाली राहणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्यांवरून बारामतीत काय होणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीकडे बारामती मतदारसंघात एवढे न फिरकणारे, दरवेळी समोरच्याचे डिपॉझिट जप्त करणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाऊले सध्या बारामतीतच खिळलेली दिसत आहेत. खुद्द शरद पवार यांनी अजित पवारांच्या पुतण्यालाच उभे केल्याने अजित पवार यांना बारामतीतच अडकून पडावे लागत आहे. कोणत्याही निवडणुकीत झाला नाही…

Read More

पायाखालची वाळू सरू लागली की माणूस सैरभैर होतो. काय करू, काय नको, असं त्याला होत असतं. राज्यात सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत संकटाची चाहूल लागलेले आतापासूनच वायफळ बडबड करू लागले आहेत. त्यांना कधी ‘व्होट जिहादची’ स्वप्न पडतात तर कधी त्यांना ‘बटेंगे तो कटेंगे’ची भीती वाटते. खरं तर यातलं काहीही होत नसतं. पण अशी भीती घातली की हिंदू मतदार आपल्याच मतदान करतील, अशी त्यांची मानसिकता बनते. या माणसांचं राज्यात धर्मा-धर्मात, जाती-जातीत कटूता निर्माण व्हावी, असं वर्तन असतं. त्यांच्या या वर्तनाला घरातूनच विरोध होतो, हे मात्र त्यातल्या त्यात चांगलं लक्षण म्हणता येईल. महाराष्ट्राची विधानसभा आणि विधानसभेतील बहुमत आपल्याच हाती असलं पाहिजे या मानसिकतेत…

Read More

भाजप महायुतीमुळे महागाईचा दहशतवाद वाढला खोटे बोलणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करा प्रियंका गांधी यांचा भाजपसह महायुतीवर हल्लाबोल शिर्डी /संगमनेर – प्रतिनिधी भाजप व महायुती सरकारने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असून त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेण्याची पात्रता यांची नाही. महाराष्ट्रात तोडून फोडून आलेले हे सरकार जनतेला मान्य नाही. महाराष्ट्रातील युवक बेरोजगार करून अनेक उद्योग या सरकारने गुजरातला पळवले असून देशात व राज्यात महागाईचा दहशतवाद वाढला असल्याची टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली असून खोट्या बोलणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करा, असे आवाहन जनतेला केले आहे. शिर्डी येथे शनिवारी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत…

Read More

शनिवार, १६ नोव्हेंबर संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लिमिटेडचा आठवा बॉयलर अग्नि प्रदीपन व गणित हंगामाचा शुभारंभ रविवारी (१७ नोव्हेंबर) होत आहे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन रवींद्र बिरोले आणि त्यांच्या पत्नी अश्विनी यांच्या हस्ते हा समारंभ होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या आणि पाण्याची पुरेशी उपलब्धता नसलेल्या कौठे मलकापूरच्या माळरानावर आठ वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्यातील पहिल्या खाजगी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी रोवली होती. गेल्या सात वर्षात कारखान्याने उत्तरोत्तर प्रगती साधली आहे. कारखान्याला दरवर्षी कार्यक्षेत्र बाहेरून मोठ्या प्रमाणात ऊस आणावा लागतो. यावर्षी देखील कारखाना व्यवस्थापनाने नव्या जोमाने गळीत हंगामाची तयारी…

Read More

संगमनेर – अनंत पांगारकर विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला आहे तरी देखील सर्वच पक्षाचे निष्ठावंत म्हणविले जाणारे अद्याप प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसत नाही. एकीकडे ऐनवेळी दिलेला उमेदवार आणि दुसरीकडे उमेदवाराभोवती जमलेला लाभार्थ्यांचा मेळा यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्याची मोठी गोची झाली आहे. वर्षानुवर्ष विरोधात राहिल्यानंतर आता राजकीय तडजोडीमुळे ज्याला विरोध केला याचाच प्रचार करायची वेळ घेऊन ठेपल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेत स्वतःला विक्रीस काढले आहे. “साहेब, कार्यकर्ता विकणे आहे” अशा मिष्कील शब्दात राजकीय पक्षांचे निष्ठावंत (नाव न छापण्याच्या अटीवर) आपले दुःख व्यक्त करत आहे. राज्यात गेल्या पाच वर्षात राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलले आहे. कोणत्या…

Read More