Author: अनंत पांगारकर

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळाच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (30 सप्टेंबर) केली आहे. यासोबतच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीची मदत आणि दीर्घकालीन उपाययोजना दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकसानीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 60 लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, पहिल्या टप्प्यात 2 हजार 215 कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. ही मदत देण्यासाठी केवायसीच्या अटी शिथिल करून ॲग्री स्ट्रक्चर रेकॉर्डच्या आधारे दिली…

Read More

संगमनेर – यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ढाकणी या गावी एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या दुःखद घटनेत पीडित मुलीचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली आहे. या क्रूर कृत्याविरोधात संगमनेरच्या पद्मशाली समाज मंडळ, आणि महिला पद्माशाली समाज मंडळच्यावतीने सोमवारी तीव्र संताप आणि निषेध व्यक्त करण्यात आला. समाज बांधवांमध्ये या घटनेमुळे प्रचंड रोष असून, दोषी आरोपीला फाशीची कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हा निषेध नोंदविण्यात आला. पद्मशाली समाज मंडळाचे अध्यक्ष गणेश सायन्ना मादास आणि महिला पद्माशाली समाज मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मी दत्तात्रय इटप यांच्या नेतृत्वाखालील…

Read More

संगमनेर – ब्रिटन आणि जपानलाही मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था २०२५ च्या मध्यात ४ ट्रिलियनचा टप्पा ओलांडून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याने भारत एक आश्वासक गुंतवणूक केंद्र बनला आहे. याच बळावर, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) नुसार म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता (AUM) ७५.१९ लाख कोटींवर पोहोचली असून, महिन्याला एसआयपी (SIP) द्वारे येणारी रक्कम २८,२६५ कोटी असल्याने, हा उद्योग लवकरच शंभर लाख कोटींच्या उंबरठ्यावर असेल, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन अर्थतज्ज्ञ सुनील कडलग यांनी केले. ‘सहकारातून समृद्धी’ या अभियानांतर्गत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘चला अर्थसाक्षर होऊयात’ या विशेष अर्थसाक्षरता कार्यशाळेचे सोमवारी…

Read More

संगमनेर – मत चोरी ही संविधानद्रोही कृती असल्याचा आरोप करत, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली “मत चोर, गद्दी छोड” स्वाक्षरी अभियान देशभरात सुरू केले आहे. या अभियानाचा शुभारंभ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेरमधून सोमवारी करण्यात आला. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सी.डब्ल्यू.सी.चे (वर्किंग कमिटी) सदस्य आणि राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागातर्फे ही सुरुवात करण्यात आली आहे.  यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. काँग्रेसच्यावतीने हाती घेतलेल्या या अभियानामुळे आगामी काळात मत चोरीच्या मुद्द्यावरून राज्यात आणि देशात काँग्रेसकडून तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बंटी यादव, प्रदेश महासचिव…

Read More

मेष – आजचा दिवस मिश्र फलदायी राहील. आरोग्याच्या तक्रारी किंवा तणाव जाणवू शकतो. संताप वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामात अडथळे येऊ शकतात. प्रवासाचा योग आहे. वृषभ – आजचा दिवस काळजीपूर्वक राहण्याचा आहे. नवीन कामे सुरू करणे टाळावे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल. जोडीदाराच्या उत्तम साथीमुळे घरातील वातावरण आनंदी राहील. मिथुन – आजचा दिवस उत्तम जाईल. घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमचा सहभाग महत्त्वपूर्ण असेल. कर्क – आजचा दिवस काहीसा तणावयुक्त जाऊ शकतो. नोकरीत अधिकारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सिंह – आज नियोजनबद्ध काम झाल्यामुळे समाधानी राहाल. महिलांना थोडी अधिक कामे करावी लागतील. कन्या – आज तुम्हाला उत्तम गृहसौख्य लाभेल.…

Read More

संगमनेर – आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आय लव संगमनेरच्या वतीने नवरात्रीनिमित्त आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम २४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या चार दिवसांच्या कालावधीत शहरातील तब्बल १६ ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमांमध्ये हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगमनेर शहरातील महिलांना खेळ, स्पर्धा, प्रश्नोत्तरे आणि लकी ड्रॉ अशा मजेदार उपक्रमांचा आनंद घेता आला. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यात प्रामुख्याने राजेशाही पैठणी, कुकर, मिक्सर, गृहउपयोगी साहित्य व इतर आकर्षक भेटवस्तू यांचा समावेश होता. यावेळी शहरातील सर्व कार्यक्रमांना माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, शरयूताई देशमुख, डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिलीताई तांबे हे आवर्जून उपस्थित राहिले.…

Read More

माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती संगमनेर – सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने जयहिंद लोक चळवळीच्यावतीने संगमनेर शहरात भव्य प्रभात फेरी आणि सामूहिक भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी, (2 ऑक्टोबर) होणाऱ्या या कार्यक्रमात महात्मा गांधीजी यांची वेशभूषा केलेले 200 विद्यार्थी प्रभात फेरीत सहभागी होणार आहेत, तर विविध शाळांमधील 600 विद्यार्थी सामूहिक भजन सादर करून राष्ट्रपित्यांना आदरांजली वाहतील. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या गांधीजींची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या निमित्ताने, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी माहिती दिली की,…

Read More

मेष – आज तुम्हाला थकवा आणि आळस जाणवू शकतो. उत्साह कमी राहील. प्रत्येक गोष्टीवर राग येण्याची शक्यता असल्याने कामे बिघडू शकतात. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात तुमच्यामुळे कोणाचे मन दुखावणार नाही, याची काळजी घ्या. वृषभ – आज तुम्हाला शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. अशा परिस्थितीत कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल, आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. शक्यतो प्रवास टाळावेत. मिथुन – भागीदारीच्या व्यवसायात सुयश लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. दाम्पत्य जीवन आनंदी राहील. कर्क – काहींचा कल मनोरंजनाकडे राहील. हितशत्रूंचा त्रास संभवतो, त्यामुळे सावधगिरी बाळगा. सिंह – आर्थिक क्षेत्रात धाडस…

Read More

संगमनेर – संगमनेर तालुक्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणगाव, शिवापूर, मेंढवन आणि सावरगाव तळ परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ओढ्यांवरील बंधाऱ्यांमधून पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेती पाण्याखाली गेली आहे, तसेच दोन शेतकऱ्यांच्या घरांच्या भिंती कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या संसाराला मोठा धक्का बसला आहे. या नुकसानग्रस्त भागाची आमदार अमोल खताळ यांनी तातडीने पाहणी करत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार खताळ यांना कोकणगाव येथील संजय भोसले यांच्या घराची भिंत पावसाने कोसळल्याची माहिती मिळताच, त्यांनी कोणताही विलंब न करता अधिकाऱ्यांसमवेत कोकणगाव आणि शिवापूर येथील संजय भोसले यांच्या…

Read More

संगमनेर – परतीच्या पावसाने अहिल्यानगर व मराठवाडा विभागामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी राज्याचे माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली असून नुकसानीने बाधित नागरिकांना धीर दिला. आता पंचनामे व इतर फार्स न करता तातडीने शेतकऱ्यांना मोठी मदत करा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी त्यांनी केली आहे. थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील सादतपूर, निमगाव जाळी येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत सोमनाथ जोंधळे, विवेक तांबे, अनिल थेटे, तानाजी जोंधळे, चिंचपूरचे सरपंच सागर तांबे, संदीप कडलग, लक्ष्मण डेंगळे, अनिल तळोले, विजय हिंगे, थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह ग्रामस्थ व पदाधिकारी…

Read More