Author: अनंत पांगारकर
संगमनेर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावान युवा कार्यकर्ते आणि युवासेना विधानसभा प्रमुख अमोल राजेंद्र डुकरे यांनी संगमनेर नगर पालिका निवडणूकीसाठी शनिवारी, (दि. १५) प्रभाग क्र. १३ (सर्वसाधारण पुरुष गट) मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. डुकरे हे संगमनेर शहराचा मानाचा पहिला गणपती असलेल्या श्री सोमेश्वर रंगारगल्ली मित्र मंडळाचे उपाध्यक्ष असून, माजी नगरसेवक स्व. दत्तात्रय डुकरे (पाथरवट) यांचे नातू आहेत. यामुळे स्थानिक नागरिक व युवा-वयस्कर नागरिकांमध्ये त्यांची चांगली ओळख आहे. अमोल डुकरे पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रम, मोर्चा आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतात. त्यांनी संगमनेर शहर व प्रभाग १३ मधील रंगारगल्ली, चव्हाणपुरा, साळीवाडा, पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा यांसह इतर भागांमध्ये…
संगमनेर – ग्रामीण भागामध्ये बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याची सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याची माहिती दिली. डिग्रस येथील जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, सरपंच अशोक खेमनर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले की, बिबट्यांकडून हल्ले होण्याच्या वाढत्या घटनांमुळे आणि अनेक विद्यार्थी लांबून एकटे येत असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी शाळांच्या वेळा बदलण्याचा प्रयत्न आहे. याचबरोबर, त्यांनी स्थानिक पातळीवर लांबच्या विद्यार्थ्यांसाठी वाहनाची व्यवस्था करणे आणि ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचा पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यांनी शाळा इमारतीच्या कामाचे कौतुक…
संगमनेर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत, संगमनेर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नेमलेल्या स्थायी सर्वेक्षण पथकाने (SST) जुन्या महामार्गावरील तपासणी नाक्यावर एका कारमधून तब्बल एक कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१५ नोव्हेंबर २०२५) दुपारच्या सुमारास खांडगावनजीकच्या तपासणी नाक्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली. रायतेवाडीकडून संगमनेरच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर (क्र. MH 25 AS 8851) कारची तपासणी करत असताना, पथकाला एका बॅगेत ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात असलेली एक कोटी रुपयांची रोकड आढळून आली. निवडणुकीमध्ये पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने नेमलेल्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. निवडणुकीच्या काळात एवढी मोठी…
संगमनेर – संगमनेर नगर परिषद निवडणुकीसाठी अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी प्रभाग क्रमांक ११ ब मध्ये शेहबाज शेख या एकमेव उमेदवाराचा अर्ज दाखल झाला होता तर मंगळवारी नगराध्यक्षपदासह सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एकूण उमेदवारांची संख्या आठवर गेली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.साधारणत: वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर संगमनेरच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले असून आता नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर ‘हॉट’ बनले आहे. यामुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले असून अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार जाहीर झाल्या नसल्याने व उमेदवारी अर्ज…
संगमनेर – प्रतिनिधी “संगमनेरमध्ये दररोज दिवसातून दोन वेळा पाणी येतं, जे संगमनेरला जमलं ते कोपरगावला का नाही?” कोपरगाव शहरात लागलेल्या या थेट फलकांनी सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू केली आहे. राजकारणात अनेकदा ४० वर्षात काय केलं, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातो. मात्र, संगमनेरच्या पाणी प्रश्नाची कायमस्वरूपी सोडवणूक करणाऱ्या आणि शहराला ‘टँकरमुक्त’ करणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्या कार्याची पोचपावती खुद्द कोपरगावच्या नागरिकांनीच दिल्याचं चित्र आहे. यामुळे संगमनेरची ही अभूतपूर्व पाणी योजना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. संगमनेर म्हणजे ‘पाण्याची राजधानी! – महाराष्ट्रातील अनेक शहरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. रात्री-अपरात्री पाणी येणं, मातीमिश्रित किंवा अस्वच्छ पाणी मिळणं ही समस्या नित्याची आहे.…
मेष (Aries) – आजचा दिवस अनावश्यक घाई टाळा आणि मानसिक संतुलन राखा. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल, पण दिखाऊपणा किंवा अनावश्यक खर्च टाळा. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वृषभ (Taurus) – आज तुमचा रखडलेला काम पुढे जाईल. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसून येईल. मात्र, आरोग्यासाठी आजचा दिवस चांगला नाही, त्यामुळे वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. मिथुन (Gemini)- कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाबद्दल कौतुक होईल. नवविवाहित जोडप्यांसाठी दिवस चांगला आहे. सर्जनशील कामामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होतील आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील. कर्क (Cancer)- आज संपत्ती प्राप्तीचे योग आहेत. नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. मात्र, वादविवादापासून सावध…
संगमनेर – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.अपर पोलीस अधीक्षक तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर चाललेल्या महत्त्वाच्या ‘चॅप्टर केसेस’च्या सुनावणीनंतर तब्बल १६ गैरअर्जदार/प्रतिवादींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. अपर पोलीस अधीक्षकांना सरकारकडून कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. यानुसार अपर पोलीस अधीक्षक तथा दंडाधिकारी यांच्यासमोर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ ते १२९ खालील ‘चॅप्टर केसेस’चे कामकाज चालते. यात प्रामुख्याने चांगल्या वर्तणुकीसाठी बंधपत्र घेणे आणि समाजविघातक व्यक्तींकडून हमीपत्र घेण्याची कारवाई केली जाते. या १६ व्यक्तींवर करण्यात आलेल्या कारवाईमागे दोन प्रमुख कारणे आहेत, यामुळे त्यांच्यावर कठोर पाऊल उचलण्यात आले. काही गैरअर्जदारांनी पूर्वी ‘चांगल्या वर्तणुकीचे’…
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला स्पष्ट बहुमत मिळालं असून, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधून त्यांचे आभार व्यक्त केले. त्यांनी म्हटलं की, विकसित आणि समृद्ध बिहारसाठी जनतेने NDA ला २०१० नंतरचा सर्वात मोठा जनादेश दिला आहे. मोदींनी लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांना नमन करून बिहारच्या विकासाला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच, त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत, पक्षाकडे देशासाठी सकारात्मक दृष्टिकोन नसल्याचं सांगितलं आणि नकारात्मक राजकारण केल्याचा आरोप केला. या संवादात, सरकारने छठ पूजेला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं नमूद केलं, ज्यामुळे…
मुंबई: ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची नात आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्या पुतणी सौ. गिरीजा पिचड-म्हात्रे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेस पक्षाची विचारधारा मान्य करून गिरीजा पिचड यांनी पक्षात प्रवेश केला, यावेळी सपकाळ आणि थोरात यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गिरीजा पिचड यांच्या पक्षप्रवेशामुळे आदिवासी समाजाला एक नवे आणि सक्षम नेतृत्व मिळाल्याचे मत व्यक्त केले. त्या आदिवासी समाजाच्या न्याय-हक्काची लढाई लढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी…
संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर तसेच अनेक शैक्षणिक संस्थांना जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल कोणाच्या चुकीमुळे कोसळला, हे संगमनेर शहर आणि पंचक्रोशीतील सुजाण नागरिकांना चांगलेच ठाऊक आहे. तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या हट्टापायी आणि नियोजनशून्य कारभारामुळे ही दुर्घटना घडली. जनतेचा तीव्र विरोध असतानाही, सत्ताधाऱ्यांनी एस.टी.पी (STP) गटारीचा जो वादग्रस्त आराखडा तयार केला, त्यातूनच या समस्येने मूळ धरले असल्याचे टीका शिवसेनेचे (शिंदे गट) शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केली आहे. सध्या पालिका निवडणुकीचे वातावरण तापत आहे या पार्श्वभूमीवर सूर्यवंशी म्हणाले, तत्कालीन खासदार स्व. बाळासाहेब विखे साहेब यांच्या निधीतून बांधलेल्या, अतिशय सुस्थितीत असलेल्या या पुलाचे गटारीचे…
