Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: बनावट कागदपत्रे वापरून एका महिलेने महिला बचत गटातील सदस्यांच्या नावाने ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली असून लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे महिला बचत गटांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी, एका महिलेविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फसवणूक झालेली महिला, फरीन खान मोहम्मद शेख, यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. शेख यांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित महिलेने तक्रारदार महिलेच्या नकळत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड मिळवले. त्यानंतर, त्यांची खोटी सही करून ‘आयेशा महिला बचत गट’ आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर, प्रतिनिधी: वेगळा विषयांवरील सामाजिक सलोखा राखणाऱ्या देखाव्यांची परंपरा असलेल्या संगमनेरच्या महाराणा प्रताप युवक मंडळ आणि महाराणा प्रताप महिला मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त एका भव्य आणि आकर्षक देखाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  संगमनेरच्या चव्हाणपुरा येथे मंडळाकडून यावर्षी उभारण्यात आलेल्या २५ बाय ४० फुटांच्या प्रशस्त मंडपात यंदा ‘नवदुर्गा मंदिर’ या विषयावर आधारित मनमोहक देखावा सादर करण्यात येत आहे. या देखाव्यात देवीच्या नऊ अवतारांचे विस्मयकारक दर्शन घडवण्यात आले असून, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच हा देखावा सर्व गणेशभक्तांसाठी खुला करण्यात येत आहे.  मंडळाची आकर्षक देखाव्यांची परंपरा कायम राखत, हा देखावा संगमनेरकरांचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. यासाठी या वर्षीचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: शहरातील मालदाड रोड परिसरात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात चोरीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सुमारे दोन लाख रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. शहर पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मालदाड रोड परिसरात माऊली कॉलनीमध्ये सेवानिवृत्त अधिकारी रामनाथ म्हातारबा सातपुते (वय ६५) हे आपल्या पत्नीसह राहतात. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरात ही घटना घडली. चोरट्यांनी वॉल कंपाउंड वरून उडी मारून घराच्या दरवाजाचा कडे कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व ९६…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  लैंगिक अत्याचारासाठी आपल्या लॉज, हॉटेल किंवा कॅफेचा वापर करण्यास परवानगी देणाऱ्या मालकांवर आता कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (POCSO) मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या सह-आरोपींनाही तितकीच शिक्षा होते. त्यामुळे, अल्पवयीन मुला-मुलींच्या लैंगिक शोषणासाठी जागा उपलब्ध करून देणारे लॉज, हॉटेल चालक, मालक किंवा कॅफे मालक हेही आता कायद्यानुसार गुन्हेगार मानले जातील. काही दिवसांपूर्वी राहुरी पोलीस ठाण्यात एक बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात असे समोर आले की, आरोपीने पीडित मुलीला दोन वेगवेगळ्या लॉजमध्ये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामामध्ये प्रगती होईल आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus): आज तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, परंतु तुम्ही त्यावर मात कराल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. मिथुन (Gemini): आज तुम्हाला अनपेक्षितपणे धनलाभ होऊ शकतो. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नवीन लोकांशी संपर्क साधाल, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. कर्क (Cancer): आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहराच्या विकासाबाबत नवीन लोकप्रतिनिधींकडून अपूर्ण माहिती दिली जात असून, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप माजी पाणीपुरवठा सभापती सोमेश्वर दिवटे यांनी केला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून शहराला निळवंडे धरणातून थेट पाणीपुरवठा होत असून, जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी २३ कोटी रुपयांचा निधीही यापूर्वीच महाविकास आघाडीतील तत्कालीन नगर विकास मंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच कार्यकाळात मंजूर झाल्याचे व प्रशासकीय काळात हे काम रखडल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महायुतीच्या आभार सभेत नवीन लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर पवार आणि नितीन अभंग यांनी सोमवारी एकत्रित पत्रकार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: आरोग्याला बाधा निर्माण होऊन देखील शहरातील गुळातील भेसळीच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत संगमनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शंकर रावसाहेब ढमाले गुरुवारपासून (२८ ऑगस्ट) प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करणार आहे. ढमाले यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना सांगितले की, शहरातील सिद्धी गुळ नैसर्गिक गुळ नावाने विकल्या जाणाऱ्या मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्या दुकानातून मी गुळ खरेदी केला होता. तो खाल्ल्यानंतर माझ्या घरात दोन व्यक्ती आजारी पडल्या आणि त्यांना रुग्णालयात ॲडमिट करावे लागले. त्यामुळे या गुळात भेसळ असल्याचा संशय आल्याने मी नगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी घेऊन येणारा ‘संगमनेर फेस्टिवल’ येत्या गुरुवारपासून (२८ ऑगस्ट) सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये विविध लोकप्रिय नाटकांसह संगीत आणि विनोदी कार्यक्रमांचा संगम साधण्यात आला आहे. राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.  यंदा फेस्टिवलचे १७ वे वर्ष असून राजस्थान युवक मंडळाच्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष देखील आहे. फेस्टिवल मध्ये सादर होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती अशी, गुरुवार, २८ ऑगस्ट: सायंकाळी ६:३० वाजता सुप्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांचा गाजलेला एकपात्री प्रयोग ‘वर्‍हाड निघालंय लंडनला’ सादर होईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. शुक्रवार, २९ ऑगस्ट: सायंकाळी ७ वाजता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन आनंदी राहील. वृषभ आज तुम्हाला काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते, परंतु तुम्ही त्यावर यशस्वीपणे मात कराल. आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. मिथुन आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक आहे. नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कर्क आज तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर असाल. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध सुधारतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. सिंह आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. कन्या आज तुम्हाला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेरमध्ये ४० वर्षांची मक्तेदारी उलथवून टाकणाऱ्या मतदारांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर आभार मानले. अमोल खताळ हे ‘जायंट किलर’ असले तरी, खरे ‘जायंट किलर’ तुम्ही मतदार आहात, असे सांगत शिंदे यांनी मतदारांचे कौतुक केले.  काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून शिवसेनेचे खताळ निवडून आल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदे संगमनेरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी थोरात यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. शिंदे म्हणाले, हेलिकॉप्टरमधून यायला तीन तास लागले, पण संगमनेरमध्ये लोटलेला जनसागर पाहता भगवं वादळ इथे आल्याचं जाणवतं. अमोल खताळ हा सर्वसामान्य कार्यकर्ता असून त्याने संधीचं सोनं केलं आहे. त्याला निवडून देणारे तुम्ही मतदारच खरे…

Read More